मुलीच्या परिस्थितीचा उठवला फायदा, तरुणीवर 3 पोलिसांचा वर्षभर बलात्कार
कायद्याचा धाक दाखवून 18 वर्षाच्या मुलीला तीन पोलिसांनी फसवून तिच्यावर वर्षभर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना राजस्थानमध्ये उघडकीस आली आहे. या प्रकरणी मुलीनेच थेट पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात जाऊन त्या तिघांविरोधात गुन्हा दाखल करून आपल्याला न्याय देण्याची मागणी केली आहे.
ADVERTISEMENT

Gang Rape : राजस्थानमधील अलवारमध्ये (Rajasthan Alwar) एक माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. तेथील 18 वर्षाच्या मुलीवर तीन पोलिसांनी (Three Police) बलात्कार (Rape Case) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेची माहिती स्वतः पोलिसांनी दिली असून त्याचा तपास सुरू करण्यात आला आहे. यावेळी पोलिसांनी सांगितले की, अलवार जिल्ह्यातील 18 वर्षाच्या मुलीवर एक वर्षापेक्षाही अधिक काळ तिच्यावर बलात्कार केल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. या प्रकरणी आता तीन कॉन्स्टेबलांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
भावाला खोट्या गुन्ह्यात
महिलेवर तीन पोलिसांनी बलात्कार झाल्याची घटना घडल्यानंतर शनिवारी संबंधित महिलेने तिघां पोलिसांविरोधात तक्रार दाखल केली आहे. संबंधित महिलेने सांगितले की, त्या तिघांविरोधात गुन्हा दाखल केल्या नंतर आपल्या भावाला खोट्या गुन्ह्यात गुंतवण्याची धमकीही देण्यात आली होती.
हे ही वाचा >> पत्नीसह दोन मुलांचं बॅटनं डोकं फोडलं, तिहेरी हत्याकांडानं ठाणे हादरलं
सामूहिक बलात्कार
संबंधित प्रकरणाची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, ज्या ठिकाणी त्यांना तैनात करण्यात आले होते, तिथून त्या पोलिसांना बोलवून आता अटक करण्यात आले आहे. यावेळी त्यांनी सांगितले की, सामूहिक बलात्कार आणि पॉक्सो गुन्ह्या अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तिघांविरोधात गुन्हा
ज्या पोलिसांनी महिलेवर बलात्कार केला आहे, त्यातील तीन पोलीस हे वेगवेगळ्या पोलीस स्थानकातील आहेत. रैणी, राजगड आणि मालखेडा येथली पोलीस स्थानकामध्ये हे तिघंही कार्यरत होते. पोलीस अधीक्षकांनी सांगितले की, पीडित महिलेने पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात येऊन त्या तिघांविरोधात बलात्कार गुन्हा दाखल केला आहे. त्यावेळी पीडित महिलेने सांगितले की, एक वर्षापेक्षाही अधिक काळ तिघा पोलिसांनी तिच्यावर बलात्कार केला होता.
पॉक्सो अंतर्गत गुन्हा
या प्रकरणी पॉक्सो कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला त्याचे स्पष्टीकरण देताना पोलिसांनी सांगितले की, पीडितेवर पहिल्यांदा बलात्कार करण्यात आला त्यावेळी संबंधित महिलेचे वय हे 18 वर्षेसुद्धा नव्हते. त्यामुळे संबंधित पोलिसांवर आता पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.