“पती आणि दीर 10 महिन्यांपासून माझ्यासोबत…”, नवविवाहितेने सांगितली आपबीती

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

A married woman harassed for dowry by her mother-in-law, sister-in-law and brother-in-law.
A married woman harassed for dowry by her mother-in-law, sister-in-law and brother-in-law.
social share
google news

Crime news in Marathi : लग्न झालं. वैवाहिक आयुष्यात पाऊल ठेवल्यानंतर ती पतीसोबत सुखी आयुष्याचे स्वप्न रंगवत होती. पण, घडलं उलटच. लग्नानंतर काही दिवसांनी सासरच्यांनी तिचा छळ करण्यास सुरूवात केली. पती तिला जबरदस्ती दारू पाजायला लागला. पण, कळस तर तेव्हा झाला, जेव्हा लष्करात असलेल्या दिराने थेट हत्या करण्याची धमकी दिली. 10 महिने शारीरिक आणि मानसिक छळ सुरू होता. अखेर सर्व काही असह्य झालं आणि तिने पोलीस ठाणे गाठले. (A married woman Told how her in-laws harassed her for dowry for 10 months from the day of her marriage)

ADVERTISEMENT

उत्तर प्रदेशातील बांदा येथे सासरच्यांनी नवविवाहितेचा हुंड्यासाठी इतका छळ केला की ती पोलीस ठाण्यात गेली. लग्नाच्या दिवसापासूनच सासरच्यांनी हुंड्यासाठी तिचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरू केल्याचा आरोप नवविवाहितेने केला आहे. नवरा तिला दारू पिण्यास भाग पाडतो. मद्य प्राशन केले नाही तर जेवण देत नाही. दीर लष्करात शिपाई आहे. तो जवान असल्याचे सांगून जीवे मारण्याची धमकी देतो, अशी आपबीती विवाहितेने पोलिसांना सांगितली.

पती, दिरासह सासरच्या मंडळींना छळ करणं भोवलं, कारण…

पती, दिरासह सासरच्यांकडून छळ सुरू राहिल्याने ती मदतीसाठी पोलीस ठाण्यात पोहोचली. नववधूच्या तक्रारीवरून पोलिसांनी पतीसह सासरच्या चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. हे प्रकरण चिल्ला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. पोलीस ठाण्यात तक्रारीदरम्यान, नवविवाहित महिलेने सांगितले की, तिच्या वडिलांनी नोव्हेंबर 2022 मध्ये कानपूरच्या नौबस्ता येथे तिचे लग्न केले होते.

हेही वाचा >> Lalit Patil : एक कॉल अन् ललित पाटीलचा झाला ‘गेम’; मुंबई पोलिसांनी कसं पकडलं?

महिलेचा आरोप आहे की, लग्नानंतर सासरच्या घरी गेल्यावर तिची सासू, नणंद आणि दिराने 2 लाख रुपये हुंडा आणि बाईक मागायला सुरुवात केली. विवाहितेने त्याला नकार दिला. त्यानंतर त्यांनी टोमणे मारणे व त्रास देणे सुरू केले.

विवाहिनेते म्हटले आहे की, त्यानंतर सासरच्या लोकांनी तिला मारहाण करायला सुरुवात केली. दीर म्हणतो की, मी लष्करात आहे. तुला मारून टाकेन. आम्हाला कायदा माहिती आहे. कायदा आमच्या बाजूने आहे, अशा धमक्या दीर देत असल्याचे विवाहितेने पोलिसांना सांगितले.

ADVERTISEMENT

१० महिन्यानंतर घरातून हाकलले

पीडितेने पुढे सांगितले की, दारू पिऊन पती तिला मारहाण करतो. तो तिला दारू पिण्यास भाग पाडतो. नकार दिल्यावर तो जेवण देत नाहीत. 10 महिन्यांनंतर त्याला घरातून हाकलून देण्यात आले. तिला तिच्या माहेरच्या घरी जाण्यास भाग पाडले. त्यानंतर सासरच्या मंडळींच्या त्रासाला कंटाळून महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्याचवेळी याप्रकरणी सासरच्या मंडळींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, संपर्क होऊ शकला नाही.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> मुंबईत ऑनर किलिंग : आधी जावयाची सपासप वार करत हत्या, नंतर मुलीला ठेचून मारलं!

महिलेच्या तक्रारीवरून चिल्ला पोलीस ठाण्याचे प्रभारी मोनी निषाद यांनी सासरच्या चारही आरोपींविरुद्ध हुंड्यासाठी छळ, मारहाण आणि धमकावणे या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपासही सुरू केला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT