Crime: 12 वर्षाच्या मुलीवर वासनांध बापाची घाणेरडी नजर, निर्जन स्थळी नेत पाशवी बलात्कार
उत्तर प्रदेशामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. सावत्र बापाबरोबर बाजारात भाजी विकण्यासाठी गेलेल्या 12 वर्षाच्या मुलीवर त्याच सावत्र बापाने निर्जनस्थळी घेऊन जाऊन तिच्यावर बलात्कार केला आहे. त्यामुळे कुटुंबीयांना धक्का बसला. या घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घरासमोर येत आरोपीला कठोराताील कठोर शिक्षा करण्याची मागणी केली.
ADVERTISEMENT
UP Rape Case: उत्तर प्रदेशातील हरदोईमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. 12 वर्षाची एक लहान मुलगी आपल्या सावत्र बापाच्या भयानक कृत्याला बळी पडली आहे. सावत्रबापाने एका निर्जनस्थळी घेऊन जाऊन तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना आता समोर आली. घटना घडल्याच्या दुसऱ्या दिवशी पीडित मुलीने आपल्या आईला घडलेली धक्कादायक घटना सांगितली. त्यानंतर त्या मुलीच्या आईने आरोपीविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली. तक्रार दाखल करताच आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
ADVERTISEMENT
घरी परतताना डाव साधला
उत्तर प्रदेशातील बेहटागोकुल पोलीस स्थानकाच्या हद्दीत ही घटना घडली आहे. या घटनेबद्दल तक्रार दिलेल्या पीडितेच्या आईने पोलिसांना सांगितले की, माझी मुलगी 7 ऑक्टोबर रोजी आपल्या बापाबरोबर भाजी विकण्यासाठी बाजारात गेली होती.
हे ही वाचा >> चिअर्स, आता खुशाल रिचवा पेग! सुप्रीम कोर्टाचा मोठा निकाल; म्हणाले, ‘दारू किती प्यायची हे…’
तुझा जीव घेईन
भाजी विकून घरी परतत असताना आरोपीने रात्रीचे आठ वाजले असताना सुखेता पुलियाजवळ आले असता निर्जनस्थळी घेऊन जाऊन आरोपीने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. सावत्र मुलीवर बलात्कार करुन ही घटना कोणालाही न सांगण्याची धमकी देण्यात आली. त्यामुळे मुलीने घाबरुन पहिल्या दिवशी काहीच सांगितले नाही.
हे वाचलं का?
काही तासातच ठोकल्या बेड्या
ही घटना घडल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या मुलीने आदल्या दिवशी घडलेली घटना आपल्या आईला व कुटुंबीयांना तिने सांगितली. त्यानंतर मुलीच्या आईने तात्काळ पोलीस स्टेशन गाठले व आरोपी सावत्र बापाविरुद्ध तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनीही आरोपीला बेड्या ठोकल्या. पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर मुलीला आता रुग्णालयात तपासणीसाठी पाठवले आहे.
हे ही वाचा >> MLA Disqualification: ‘2 महिन्यात निर्णय घेण्याचे आदेश द्यावे लागतील..’, कोर्टाने नार्वेकरांना झापलं!
मानसिक धक्का
या घटनेची माहिती गावातील नागरिकांना समजताच पीडित मुलीच्या घरासमोर हजारो नागरिक जमा झाले. त्यानंतर आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा करण्याची मागणी केली. यावेळी पोलिसांकडे नागरिकांनी मागणी केली या प्रकराचे गुन्हे करणाऱ्या आरोपींना ताब्यात घेऊन कडक शिक्षा देण्याची मागणीही ग्रामस्थांनी केली. घडलेल्या घटनेमुळे पीडित मुलीला मानसिक धक्का बसला आहे. त्यामुळे त्याबाबतही तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी सांगितले की, आरोपीने दोन लग्न झाली आहेत. ज्या मुलीवर अत्याचार करण्यात आला आहे ती त्याची सावत्र मुलगी असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT