Sakshi Murdered : साक्षीची एक्स बॉयफ्रेंडसोबत ‘बाईक राईड’ अन् साहिलने…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Sakshi was stabbed to death by Sahil. Sakshi was maintaining her relationship with Sahil as well as with Praveen.
Sakshi was stabbed to death by Sahil. Sakshi was maintaining her relationship with Sahil as well as with Praveen.
social share
google news

Sakshi murdered by sahil news : दिल्लीच्या शाहबाद डेअरी भागात झालेल्या साक्षी हत्या प्रकरणाच्या तपासात गुंतलेल्या पोलिसांच्या हाती नवीन माहिती लागली आहे. साक्षी तिच्या एक्स बॉयफ्रेंडसोबत बाईक राईड करायची आणि साहिलकडे बाईक नव्हती आणि हीच गोष्ट त्याच्या जिव्हारी लागली होती.

ADVERTISEMENT

What is Sahil and Sakshi case : साक्षी आणि साहिल ही दोनच नावे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. साहिलने साक्षीची चाकूचे वार करून हत्या केली. या घटनेच्या दृश्यांनी सगळ्यांचाच थरकाप उडाला. ही घटना समोर आल्यानंतर काही तासांतच साहिललाही दिल्ली पोलिसांनी पकडले. आणि तेव्हापासून साहिल आणि साक्षीमध्ये असं काय घडलं होतं, याचा तपास पोलीस घेत आहेत. असं काय घडलं की साहिलने साक्षीला इतक्या क्रूरपणे मारले, हे समजून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. (Why Sakshi was killed?)

साक्षी आणि साहिलच्या भूतकाळात पोलिसांना काय सापडलं?

साक्षी आणि साहिलच्या आयुष्यात डोकावल्यानंतर दोघांमधील मैत्रीही उघड झाली. यासोबतच दोघांच्या अशा काही मित्रांबद्दलही आम्हाला माहिती मिळाली, ज्यांचे मैत्री पलिकडचे नाते आहे. पण एका महत्त्वाच्या गोष्टीने पोलिसांनाही आश्चर्याचा धक्का बसला आणि या प्रकरणाचा सखोल तपास करणार्‍या तपास यंत्रणांनीही डोकं पकडलं.

हे वाचलं का?

प्रेमाचा त्रिकोण प्रकरण

खुनाची ही घटना उघडकीस आल्यानंतर अवघ्या काही वेळातच साक्षीच्या हत्येच्या या प्रकरणात प्रेम त्रिकोण असू शकतो, हे उघड झाले. कारण साक्षीच्या मित्रांनीच पोलीस चौकशीत स्पष्ट केले होते की, साक्षीची प्रवीणसोबतही मैत्री होती आणि प्रवीणसोबत ब्रेकअप झाल्यानंतरच साक्षीच्या आयुष्यात साहिलची एन्ट्री झाली होती. पण, नंतर साक्षीने साहिलसोबतच प्रवीणसोबतही तिचे रिलेशन सुरू ठेवले.

हेही वाचा >> Viral Video: क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं! गणपतीपुळेतील ‘ही’ लाट ‘बिपरजॉय’मुळे?

साहिल, साक्षी आणि प्रवीण

जेव्हा पोलिसांना हे कळले तेव्हा त्यांनी या प्रकरणाचा आणखी खोलात जाऊन तपास सुरू केला. प्रविणसोबतच्या नात्यावरून साहिल आणि साक्षीत वाद झालेला असतानाही तिने साहिलबरोबरच प्रवीणसोबतही नाते काय ठेवण्यामागे असे कोणते कारण होते, याचा शोध पोलिसांनी सुरू केला. या प्रश्नाचा शोध घेताना पोलिसांना दोन उत्तरं मिळाली. प्रवीणला चिडवण्यासाठी साक्षीने साहिलशी मैत्री केल्याचे उघड झाले आहे. मात्र, समोर आलेल्या दुसऱ्या गोष्टीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

ADVERTISEMENT

काय आहे बाईक राईडचे सत्य?

एका पोलीस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, असे कळले की साहिल आणि प्रवीण दोघेही बाईक चालवायला जायचे, पण साक्षीनेच तिच्या मैत्रिणींना हे सांगितले की तिला प्रवीणसोबत बाईक चालवायला जास्त आवडते कारण प्रवीण खरोखरच बाइक चालवण्यामध्ये जास्त एक्सपर्ट होता, तर साहिलला बाईक चालवण्याचा इतका अनुभव नव्हता.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> Maharashtra : तसं बोलून फसले! अब्दूल सत्तारांची विकेट जाणार? ‘तो’ पीए कोण?

साहिल-साक्षीमध्ये वाद

साहिल आणि साक्षीमध्ये प्रवीणवरून अनेकदा जोरदार वाद झाल्याचेही समोर आले आहे. साहिलने साक्षीला अनेकदा ताकीद दिली होती की तिने असे करू नये आणि त्याचा वापर करणे थांबवावं, पण साक्षीने साहिलच्या बोलण्याची खिल्ली उडवली. तिने त्यांच्या कॉमन फ्रेंड्समध्ये बसून साहिलची खिल्ली उडवायला सुरुवात केली होती.

मस्करी जिव्हारी लागली अन्…

हत्येच्या एक दिवस अगोदरही साहिल आणि साक्षीमध्ये काहीतरी वाद झाला होता. साक्षीची एक मैत्रीण आणि साहिलचा मित्र अजय उर्फ झाब्रू यांनी साहिलची कशावरून तरी खिल्ली उडवली होती. यानंतरच साहिलने खून करण्याचा कट रचला आणि तिघांपैकी जो प्रथम दिसेल त्याला ठार मारण्याचा प्लान केलेला होता. त्यात साक्षी आधी दिसली आणि त्याने तिलाच संपवलं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT