Crime: आरोपीच्या घरी गेलेल्या पोलिसांसमोरच महिलांनी उतरवले कपडे
Crime: मोबाइलच्या शोधात आरोपीच्या घरी गेलेल्या पोलिसांसमोरच महिलांनी कपडे काढल्याची विचित्र घटना कल्याणमध्ये घडल्याचं समोर आलं आहे. जाणून घ्या नेमकं प्रकरण काय आहे.
ADVERTISEMENT
Kalyan Crime News: कल्याण: मुंबईच्या नजीक असेलल्या कल्याणमध्ये रेल्वे पोलिसांनी एका मोबाइल चोराला अटक केली होती. यावेळी चोरट्याने सर्व मोबाइल आपल्या घरात लपवून ठेवले होते. त्यामुळे हे सर्व फोन पोलिसांना आपल्या ताब्यात घ्यायचे होते. यासाठीच पोलिसांची एक टीम थेट चोराच्या घरी पोहचली. पण यावेळी जे घडलं त्याने पोलीसही हबकून गेले. घरात अचानक पोलीस आल्याने मोबाइल चोराला हुसकावून लावण्यासाठी घरातील तीनही महिलांनी थेट पोलिसांसमोरच कपडे काढण्यास सुरुवात केली. हा संपूर्ण प्रकार अत्यंत अनपेक्षित असल्याने पोलीस देखील गोंधळून गेले. (women took off their clothes in front of police who went to house of the accused in search of mobile phone)
ADVERTISEMENT
महिलांनी कपडे काढून जेव्हा गोंधळ घालण्यास सुरुवात केली. तेव्हा शेजारी राहणाऱ्या लोकांनी येथे मोठ्या प्रमाणात गर्दी केली. पोलीस नेमकी काय कारवाई करत आहेत हे पाहण्यासाठी लोक जमा झाले होते. पण महिलांनी अचानक गडबड गोंधळ केल्याने येथील वातावरण काही काळ तापलं होतं. अखेर पोलिसांनी कसंबसं हे प्रकरण शांत केलं. मात्र, यावेळी झालेल्या गर्दीचा फायदा घेत त्या महिलांनी तेथून पळ काढला. दरम्यान, आता याप्रकरणी या तिन्ही महिलांविरुद्ध सरकारी कामात हस्तक्षेप केल्याचा गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला आहे.
अधिक वाचा- वासनांध बायकोचं नवऱ्यासोबत भयंकर कृत्य.. नेमकं घडलं तरी काय?
नेमकं प्रकरण काय?
◆ कल्याण रेल्वे स्थानकावर अनेकदा चोरीच्या घटना घडतात. अशीच एक घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. एका प्रवाशाचा मोबाइल चोरीला गेला होता. त्यामुळे या प्रवाशाने कल्याण जीआरपीकडे तक्रार केली होती. या तक्रारीनंतर कल्याण जीआरपीने तपास सुरू केला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून, सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिसांनी मोबाइल चोराला अटक केली.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
अधिक वाचा- Pune: मुलीने दिलेल्या नकारामुळे नेत्यांना जीवे मारण्याच्या धमक्या, पुण्यात नेमकं काय घडतंय?
◆ संजय भासले असे मोबाइल चोराचे नाव असून त्याला अटक केल्यानंतर पोलिसांनी चोरट्याला चोरीचा मोबाइल कुठे आहे असे विचारले असता त्याने चोरीचा मोबाइल माझ्या घरी असल्याचे सांगितले. यावेळी महिला पोलिसांचे एक पथक चोराच्या घरी पोहोचले. यावेळी महिला पोलिसांना पाहताच घरातील तीन महिलांनी गोंधळ सुरू केला आणि कपडे काढून जोरजोरात आरडाओरड करण्यास सुरुवात केली.
अधिक वाचा- आई बॉयफ्रेंडसोबत दिसली ‘त्या’ अवस्थेत; नंतर घडलं थरारक कांड
◆ या संपूर्ण घटनेची सुरुवात कल्याण रेल्वे यार्डपासून काही अंतरावर असलेल्या कर्पेवाडी परिसरात घडली असून पोलिसांनी हे प्रकरण कसेतरी शांत केले. मात्र गर्दीचा फायदा घेत या महिलांनी तेथून पळ काढला. सार्वजनिक ठिकाणी कपडे काढून शासकीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्या महिलांवर कल्याण जीआरपीने गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT