Lok Sabha Election 2024 : 'मी सत्तेसाठी हापापलेलो नाही...', अजित पवार भडकले

मुंबई तक

Ajit Pawar, Satara Lok Sabha Election 2024 : मी जाहिरनाम्यातही स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी केली आहे. थोडा उशीर झाला आहे.पण अनेक बड्या व्यक्तींना स्वर्गवासी झाल्यानंतर पुरस्कार मिळाले आहेत,असेही अजित पवार म्हणाले आहेत.

ADVERTISEMENT

 मी जाहिरनाम्यातही स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी केली आहे.
ajit pawar speech satara rally satara lok sabha election 2024 udyanraje bhosale mahayuti candidate yashwantrao chanvan sharad pawar
social share
google news

Ajit Pawar, Satara Lok Sabha Election 2024 : राष्ट्रवादीत बंडखोरी करून अजित पवार गट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाला होता.या घटनेला आता वर्षभराचा कालावधी पुर्ण होत आला असतानाच अजित पवार यांनी सत्तेत सहभागी होण्यामागच कारण सांगितलं आहे. ''बहुजन समाजाला जर तुम्हाला मदत करायची असेल, तर सरकारमध्ये जाऊनच मदत करता येते''', असे यशवंतराव चव्हाण यांनी त्यांच्या पुस्तकात लिहल्याचा दाखला देऊन आपण हा निर्णय घेतल्याचे अजित पवार यांनी सांगितले.  (ajit pawar speech satara rally satara lok sabha election 2024 udyanraje bhosale mahayuti candidate yashwantrao chanvan sharad pawar) 

महायुतीचे साताऱ्याचे उमेदवार उदयनराजे यांच्या प्रचारार्थ सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत अजित पवार बोलत होते. मी सत्तेला हापापलेला माणूस नाही आहे. पण चव्हाण साहेबांचा विचार, चव्हाण साहेबांनी दाखवलेला रस्ता...चव्हाण साहेबांवरही अनेक राजकीय संकटे आली, काही चढ-उतार आले. परंतू त्यांनी लिहलंय, बहुजन समाजाला जर तुम्हाला मदत करायची असेल, तर सरकारमध्ये जाऊनच मदत करता येते. त्यामुळे चव्हाणांचा संदर्भ देत अजित पवार यांनी सत्तेत सहभागी झाल्याचे सांगितले. 

हे ही वाचा : 'मोदींची कौटुंबिक पार्श्वभूमी अतिशय चिंताजनक', पवारांचा PM मोदींना टोमणा

मी जाहिरनाम्यातही स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी केली आहे. थोडा उशीर झाला आहे.पण अनेक बड्या व्यक्तींना स्वर्गवासी झाल्यानंतर पुरस्कार मिळाले आहेत,असेही अजित पवार म्हणाले आहेत.

2019 ला साहेबांनी सांगितलं आता उद्धव ठाकरेंसोबत जायचं, मी गपगुमाने राजीनामा देऊन उद्धव ठाकरेंसोबत गेलो. मला सांगितलं अजिबात तक्रार येता कामा नये. अडीच वर्ष अशी कामे केली, अजिबात तक्रार आली नाही. उलट  ते म्हणाले तु लय चांगला आहे. तुम्हाला नंतर कळलो हो. आधी कळाल असतं तर आपण कवाच कुठे गेलो. त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही गोष्टी केल्याचेही अजित पवारांनी सांगितलं. तसेच मी तुमच्याकडे विकासाकरता मते मागायला आलो आहे. मोदी साहेबांना देशात विकासपूरूष म्हणून ओळखले जाते, असे आवाहन देखील अजित पवार यांनी नागरीकांना केले. 

हे ही वाचा : मनसे नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल, कुणी केली तक्रार?

हे वाचलं का?

    follow whatsapp