Amol Kolhe : मविआमध्ये पडली ठिणगी, कोल्हेंच्या कार्यक्रमात UBT कार्यकर्त्यांचा राडा

मुंबई तक

ADVERTISEMENT

amol kolhe rally shiv sena ubt worker angree pune manchar program maha vikas aghadi udhhav thackeray
उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी राडा घातल्याची घटना समोर आली आहे.
social share
google news

Amol Kolhe News : स्मिता शिंदे, जुन्नर : राज्याच्या राजकारणातली सर्वांत मोठी बातमी समोर आली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित खासदार अमोल कोल्हेंच्या नागरी सत्कार कार्यक्रमाचे आयोजन मंचरमध्ये करण्यात आले होते. या कार्यक्रमात उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी राडा घातल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडली आहे. पण नेमका हा राडा कशामुळे झाला होता? हे जाणून घेऊयात. (amol kolhe rally shiv sena ubt worker angree pune manchar program maha vikas aghadi udhhav thackeray) 

हे ही वाचा: शरद पवारांच्या 'या' खासदाराचा अजितदादांना फोन?, NCP मध्ये मोठी घडामोड!

मंचरमध्ये अमोल कोल्हेंच्या नागरी सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावरून बोलत असताना अमोल कोल्हे यांनी देवदत्त निकम यांचा भावी आमदार म्हणून उल्लेख केला होता. हा उल्लेख ऐकताच सभेतून ठाकरेंच्या शिवसेना कार्यकर्त्यांनी काढता पाय घेत, राडा घालायला सुरुवात केली. ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी यावेळी सभास्थळीच जोरदार घोषणाबाजी करायला सुरूवात केली. या घोषणाबाजीनंतर अमोल कोल्हेंनी भाषण आटपून ठाकरेंच्या कार्यकर्त्यांची संवाद साधत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला.  

हे ही वाचा: विधानसभेत महायुती, MVA 'एवढ्या' जागा जिंकतील? पाहा यादी!

मी कुठलीही उमेदवारी जाहीर केली नाही. जो भावी आमदार म्हणून उल्लेख केला त्याला पार्श्वभूमी आहे. ही या मतदार संघातील नेत्यांना ठाऊक आहे. दुदैवाने लगेच अजाण सुरू झाल्याने मला थांबाव लागलं त्यानंतर लगेच मी त्याचं स्पष्टीकरण देऊ शकलो नाही त्यामुळे थोडासा गैरसमज झाला, असे अमोल कोल्हे यांनी या घटनेवर सांगितले. तसेच जर शिवसैनिक या त्वेशाने लढता नसता तर ही निवडणूक शक्य नव्हती. मला उमेदवारी जाहीर करण्याचा अधिकार नाही आहे. आणि महाविकास आघाडीचे नेते जो निर्णय़ घेतील तो आम्हाला सगळ्यांनाच मान्य असेल, असे कोल्हे म्हणाले आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT