Nana Patole : ठाकरेंनी पटोलेंचा फोन टाळला? महाविकास आघाडीत काय घडतंय?
Nana Patole On Uddhav Thackeray : कोकण आणि नाशिकमध्ये आमची तयारी आहे. त्याप्रमाणे मी उमेदवार सांगितले. रमेश किर कोकण पदवीधर आणि शिक्षक मतदार संघात गुरवे अशी नावे सांगितले. पण गुरवेंना बोलावून त्यांचं शिवबंधन बांधून त्यांना तिकीट जाहीर केले, असे नाना पटोलेंनी सांगितले.
ADVERTISEMENT
Nana Patole On Uddhav Thackeray : लोकसभा निवडणुकीच्या निकालात महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष हा मोठा भाऊ ठरला आहे. कारण काँग्रेसने 13 जागा जिंकल्या आहेत. या निकालानंतर काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्याकडून मोठा भाऊ असा प्रचार सुरू झाला आहे. यामुळे ठाकरे आणि पवारांच्या पक्षात नाराजी असल्याची चर्चा आहे.या सर्वांत आता काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांचा फोन उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) टाळल्याचे वृत्त हाती आली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत बिनसल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे नेमकं पडद्यामागे काय घडतंय हे जाणून घेऊयात.(nana patole on udhhav thackeray vidhan parishad election 2024 maha vikas aghadi mahayuti maharashtra politics)
नाना पटोले आज पत्रकारांशी बोलत होते.यावेळी विधानपरिषदेच्या जागावरून बोलताना नाना पटोले म्हणाले, 'निवडणुका जाहीर होताच महाविकास आघाडीच्या नेतेमंडळींनी एकत्र बसून जागा जाहीर कराव्यात, अशी आमची अपेक्षा होती, मात्र उद्धव ठाकरेंनी मुंबईच्या दोन जागा जाहीर करून टाकल्या होत्या. त्यानंतर मी पुन्हा संपर्क साधला असता ते विदेशात होते', असे नाना पटोले यांनी सांगितले.
हे ही वाचा : "आमच्यामुळे भाजपच्या 18 जागा पडल्या", आंबेडकरांनी सांगितलं कारण
नाना पटोले पुढे म्हणाले, कोकण आणि नाशिकमध्ये आमची तयारी आहे. त्याप्रमाणे मी कोकण पदवीधरसाठी रमेश किर आणि शिक्षक मतदार संघासाठी संदीप गुळवे अशी नावे सांगितले. पण गुळवेंना बोलावून त्यांना शिवबंधन बांधून तिकीट जाहीर केल्याचा आरोप नाना पटोलेंनी यावेळी केला.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
'आपण बसून निर्णय घेतला असता तर चारही जागा जिंकता येतील. जूनही वेळ गेलेली नाही. उद्या अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. आम्ही मुंबईत अर्ज भरला नाही. काहींनी अपक्ष भरलाय आम्ही त्यांना तिकीट दिले नाही. या सगळ्या गोष्टी महाविकास आघाडी म्हणून व्हाव्यात आणि बसून निर्णय घेतले जावे', अशी काँग्रेसची मागणी असल्याचे नाना पटोलेंनी सांगितले आहे.
हे ही वाचा : ''प्रधानमंत्रीजी, हमे हिंदू राष्ट्र चाहिए'', अभिनेत्री केतकी चितळेची मोदींकडे मागणी
ADVERTISEMENT