Devendra Fadnavis Lok Sabha Results 2024 : "...तर भाजपा स्वबळावर 310 च्या पुढे गेली असती"

ADVERTISEMENT

महाराष्ट्रात भाजपला मानहानिकारक धक्का बसला आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला १३ जागा गमवाव्या लागल्या आहेत.
भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकीवर भाष्य केले.
social share
google news

Devendra fadnavis on Lok Sabha Elections Results 2024 : लोकसभा निवडणुकीत भाजपची पिछेहाट झाली असली, तरी एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. लोकसभा निवडणूक निकालानंतर उपमुख्यमंत्री तथा भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रासह तीन राज्यांचा उल्लेख करत भाजपला ३१० जागा मिळाल्या असत्या, असं म्हटलं आहे. 

देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर पोस्ट करत भाष्य व्यक्त केली. 

लोकसभा निवडणुकीनंतर फडणवीस काय म्हणाले?

फडणवीस यांनी म्हटलं आहे की, "पुन्हा एकदा देशातील जनतेने एनडीएला संपूर्ण बहुमत प्रदान केले आणि मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी सलग तिसर्‍यांदा भारताचे पंतप्रधान होणार आहेत. मी त्यांचे आणि देशभरातील सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो !" 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

इंडिया आघाडीतील पक्षांना टोला

"इंडी आघाडीतील सर्व पक्ष मिळून जितक्या जागांवर आघाडीवर आहेत, त्यापेक्षा अधिक जागा एकट्या भाजपाच्या वाट्याला आल्या आहेत. शिवाय, आंध्र प्रदेशात तेलगू देसम पार्टीच्या नेतृत्त्वात भाजपा युतीला, तर ओडिशात भाजपाच्या नेतृत्त्वात दणदणीत यश मिळाले. या दोन्ही राज्यातील कार्यकर्त्यांचे मी अभिनंदन करतो", असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

हेही वाचा >> अजित पवारांचा शरद पवारांकडून 'करेंक्ट कार्यक्रम'! 

"उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात आमच्या काही जागा कमी आल्या. पश्चिम बंगालमध्ये अधिक चांगले यश मिळेल, असे वाटत होते. असे झाले असते, तर भाजपा स्वबळावर 310 च्या पुढे गेली असती. देशातील जनतेने भक्कमपणे मोदीजींना साथ दिली आहे", असे फडणवीस यांनी म्हटले आहे. 

ADVERTISEMENT

विधानसभेला लोकसभेची कसर व्याजासह भरून काढू -फडणवीस

"संविधान बदलणार असा खोटा प्रचार करुन जागा जिंकण्याचा प्रयत्न झाला, हे या निकालाचे दुर्दैव आहे. पण, तरी निवडणुकीत जनतेचा जनादेश जसा असतो, तसाच स्वीकारायचा असतो. तो शिरसावंद्य मानायचा असतो. या निकालाचे सखोल चिंतन करुन विधानसभेत पुन्हा जनतेत जाऊन, या लोकसभेची कसर व्याजासह भरून काढू", असा निर्धार फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> महाराष्ट्रातील संपूर्ण 48 मतदारसंघांचा निकाल

"महाराष्ट्रातील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी आणि महायुतीतील सर्वच घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत प्रचंड परिश्रम घेतले आणि ते पुढेही करणार आहेत, मी त्यांचेही मन:पूर्वक आभार मानतो", असे भाष्य फडणवीस यांनी केले आहे. 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT