एग्जिट पोल

Solapur Lok Sabha : राम सातपुतेंबद्दल एक्झिट पोल काय सांगतो?

मुंबई तक

ADVERTISEMENT

exit poll 2024 solapur lok sabha election ram satpute vs praniti shinde rudra research and tv9 polstrat exit poll lok sabha election 2024
भाजपला यावेळेस जिंकून हँट्ट्रीक मारण्याची संधी आहे.
social share
google news

Solapur Lok Sabha Exit Poll : लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल आता हाती आले आहेत. या एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रात सर्वांत चर्चेच्या ठरलेल्या सोलापूर लोकसभा मतदार संघाचाही अंदाजही वर्तवण्यात आला आहे. या मतदार संघात भाजपचे उमेदवार राम सातपुते (Ram Satpute) आणि काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांच्यात काँटे की लढत होते. आता एक्झिट पोलच्या अंदाजानुसार या मतदार संघातून नेमकी कोण बाजी मारतेय? हे जाणून घेऊयात. (exit poll 2024 solapur lok sabha election ram satpute vs praniti shinde rudra research and tv9 polstrat exit poll lok sabha election 2024) 

रुद्र रिसर्च (Rudra Research) या संस्थेने केलेल्या एक्झिट पोल (Exit Poll) नुसार सोलापूर लोकसभा मतदार संघात काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे या जिंकू शकतात, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.  तर भाजपचे उमेदवार राम सातपुते पराभूत होण्याची शक्यता आहे. टीव्ही 9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलमध्ये सुद्धा सोलापूरात प्रणिती शिंदे आघाडीवर असल्याचा अंदाज आहे आणि राम सातपुते हे पिछाडीवर असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

हे ही वाचा : Mumbai Exit poll : मुंबईत कुणाची डरकाळी? 6 जागांचा निकाल कुणाच्या बाजूने?

सोलापूर लोकसभा मतदार संघात मागील दोन वेळेस भाजपने बाजी मारली होती. विशेष म्हणजे या दोन्ही वेळेस सध्याच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांचे वडील सुशील कुमार शिंदे यांना भाजपने पराभूत केले होते. याच पराभवाचा बदला घेण्यासाठी यावेळेस प्रणिती शिंदे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याची माहिती आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दरम्यान भाजपला यावेळेस जिंकून हँट्ट्रीक मारण्याची संधी आहे. आता ही हँट्टीक प्रणिती शिंदे रोखण्यास यशस्वी ठरतात की राम सातपुते ही हॅट्ट्रीक मारतात, हे आता 4 जूनला येणाऱ्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे. 

महाराष्ट्राचा निकाल काय? 

रुद्र रिसर्चच्या एक्झिट पोलनुसार, महाविकास आघाडीला राज्यात 48 पैकी तब्बल 34 जागा मिळू शकतील. ज्यामध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) 14 जागा जिंकू शकते, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस 8 जागा आणि काँग्रेसला 12 जागांवर विजय मिळू शकतो असा अंदाज वर्तवला आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Exit Poll : 'या' 5 राज्यांनी बिघडवलं INDIA आघाडीचं गणित, भाजपची मुसंडी?

तर महायुतीला राज्यात 48 पैकी केवळ 13 जागांवरच मिळू शकतो असा अंदाज रुद्र रिसर्चच्या एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आला आहे. ज्यामध्ये शिवसेना (शिंदे गट) यांना केवळ 3 जागा जिंकता येतील, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त एका जागेवर विजय मिळवता येईल. तर भाजपला फक्त 9 जागांवर विजय मिळेल असं एक्झिट पोलमध्ये म्हटलं आहे.या एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात महाविकास आघाडी 34 जागा, महायुती 13 जागा आणि एक जागा अपक्ष जिंकेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT