Lok Sabha 2024 : शिंदे-पवारांमुळेच भाजपवर राज ठाकरेंना सोबत घेण्याची वेळ आली?

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

राज ठाकरे यांची मनसे भाजप, सेना, राष्ट्रवादीच्या महायुतीमध्ये सामील होणार आहे.
राज ठाकरे यांनी अमित शाह यांच्यासोबत चर्चा केली.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

महायुतीमधील समीकरणे मनसेच्या एन्ट्रीने बदलणार!

point

महायुतीत नवा पेच

point

भाजपला चौथा पक्षाची गरज

Maharashtra Politics Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे क्षणाक्षणाला बदलताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून मनसे महायुतीत जाण्याबद्दल शक्यता व्यक्त केल्या जात होत्या. त्यावर आता शिक्कामोर्तब करण्याच्या हालचाली सुरू असून, एका रात्रीत महायुतीतील राजकारण बदलले आहे. पण, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचा पक्ष सोबत घेऊनही भाजपला राज ठाकरेंची गरज का निर्माण झाली आहे, हे जाणून घेऊयात.

ADVERTISEMENT

महाविकास आघाडीतील दोन प्रमुख पक्ष असलेली शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस भाजपने फोडली. त्यामुळे महाराष्ट्रात महायुती आकाराला आली. दोन पक्षांना भगदाड पाडून महाविकास आघाडी महायुतीसमोर आव्हान उभे करताना दिसत आहे. त्यामुळेच भाजपकडून बेरजेचे राजकारण सुरू आहे. 

देशात 400 पार, महाराष्ट्रात मिशन 45 

भाजपने लोकसभा निवडणुकीत ४०० पेक्षा जास्त जागा राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या जिंकून आणायच्या असे उद्दिष्ट ठेवले आहे. तर महाराष्ट्रात 45 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचे लक्ष्य आहे. उत्तर भारतात भाजपची कामगिरी चांगली राहणार असल्याचे ओपिनियन पोलचे अंदाज आहेत. पण, दक्षिण भारतात भाजपची निराशा होईल असे अंदाज आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशनंतर लोकसभेच्या सर्वाधिक जागा असलेल्या महाराष्ट्रावर भाजपची नजर आहे. 

हे वाचलं का?

गेल्या काही महिन्यात लोकसभा निवडणुकीचे ओपिनियन पोल आले, ज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊनही भाजपची महाराष्ट्रातील कामगिरी चांगली होताना दिसत आहे. शिंदे-पवारांना सोबत घेण्याचा फारसा फायदा महायुतीला होताना दिसत नाहीये.

हेही वाचा >> "आपली उमेदवारी फिक्स", काँग्रेसच्या धानोरकर-वडेट्टीवारांमध्ये 'संघर्ष'

फेब्रुवारीत आलेल्या इंडिया टुडे सी व्होटरच्या मूड ऑफ द नेशन ओपिनियन पोलनुसार महाविकास आघाडीला 26 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला. तर महायुतीला 22 जागा मिळतील, असे म्हटलेले होते. यात ठाकरेंची शिवसेना आणि पवारांच्या राष्ट्रवादीला 14 जागा मिळू शकतात, तर अजित पवारांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मिळून 6 जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त केला. 

ADVERTISEMENT

दुसरीकडे मार्चमध्येच आलेल्या एबीपी सी व्होटरच्या ओपिनियन पोलमध्येही महाविकास आघाडीला 20 जागा मिळण्याचा अंदाज आहे. यात काँग्रेसला 4 जागा, तर ठाकरेंची शिवसेना आणि पवारांची राष्ट्रवादीला मिळून 16 जागा मिळतील, असे अंदाज आहे.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> 'माझ्या कोर्टात नियम पाळावेच लागतील', सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा चढला पारा 

दुसरीकडे, महायुतीला 28 जागा मिळण्याचीच शक्यता वर्तवण्यात आली आहे. यात शिवसेना आणि राष्ट्रवादीला मिळून 6 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर भाजपला 22 जागा मिळू शकतात, असे पोलचे निष्कर्ष आहेत. आणि यामुळेच भाजपला शिंदे-पवारांवर अवलंबून राहणे महागात पडू शकते. 

भाजपला चौथा पक्षाची गरज

महाराष्ट्रात जास्त जागा जिंकायच्या असतील, तर महाविकास आघाडीला कमकुवत करण्याची गरज आहे. पण, आता कोणतीही संधी दिसत नाही. त्यामुळे भाजपने चौथा पक्ष सोबत घेण्याची भूमिका घेतली आहे. राज ठाकरे यांच्या मनसेला सोबत घेतल्यास मुंबई, पुणे, नाशिकसह इतर मतदारसंघात मदत होईल आहे. मुंबईतील मराठी मते राज ठाकरे यांच्यामुळे महायुतीच्या पारड्यात पडतील आणि भाजपला मुंबईत मदत होईल अशी आशा भाजपला आहे. त्याचबरोबर महायुतीत ठाकरे नावाची जी पोकळी निर्माण झाली आहे, ती राज ठाकरेंना सोबत घेऊन भरून काढण्याचा प्रयत्न भाजप करताना दिसत आहे.

महायुतीत नवा पेच

लोकसभेच्या महाराष्ट्रात 48जागा आहे. त्यात महायुतीमध्ये तीन पक्ष असून, त्यातील दावेदारही भरपूर आहे. तिन्ही पक्षांमध्ये अनेक मतदारसंघामध्ये पेच निर्माण झालेला आहे. अशात राज ठाकरे यांना महायुतीमध्ये घेतल्यास आता त्यांनाही एक ते दोन जागा द्यावा लागणार आहे. दक्षिण मुंबई किंवा शिर्डी अशा मतदारसंघावर मनसेचे लक्ष आहे. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेलाच त्याग करावा लागेल अशी स्थिती आहे. त्यामुळे मनसेच्या येण्याने आता नवा पेच निर्माण झाला आहे. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT