Ahmednagar Lok Sabha : सुजय विखेंविरुद्ध राष्ट्रवादी 'या' नेत्याला उतरवणार मैदानात!

प्रशांत गोमाणे

Ahmednagar Lok Sabha, Nilesh Lanke : ''निलेक लंके हे आमचे उमेदवार व्हावेत आणि त्याबाबतीत योग्य ते सोपस्कार आम्ही योग्य वेळी पूर्ण करू'', असे सूचक विधान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे.

ADVERTISEMENT

''निलेक लंके हे आमचे उमेदवार व्हावेत आणि त्याबाबतीत योग्य ते सोपस्कार आम्ही योग्य वेळी पूर्ण करू''
jayant patil big statement on ahamednagar lok sabha constituency nilesh lanke will be candidate sharad pawar vs ajit pawar
social share
google news

Ahmednagar Lok Sabha, Nilesh Lanke : अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या आठवड्याभरापासून सूरू आहे. मात्र अद्याप हा प्रवेश सोहळा होऊ शकला नाही. त्यात आता ''निलेक लंके हे आमचे उमेदवार व्हावेत आणि त्याबाबतीत योग्य ते सोपस्कार आम्ही योग्य वेळी पूर्ण करू'', असे सूचक विधान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे. त्यामुळे जयंत पाटलांच्या या विधानानंतर अहमदनगरमधून निलेश लंके यांची उमेदवारी पक्की मानली जात आहे.  (jayant patil big statement on ahamednagar lok sabha constituency nilesh lanke will be candidate sharad pawar vs ajit pawar) 

जयंत पाटील यांनी काही वेळापुर्वी शरद पवारांची भेट घेतली होती. या भेटीनंतर जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, 'निलेश लंके फार लोकप्रिय आहेत. शंभर टक्के ते निवडून येतील. म्हणून लंके आमचे उमेदवार व्हावेत या मताचे आम्ही आहोत. त्याबाबतीत योग्य ते सोपस्कार आम्ही योग्य वेळी पूर्ण करू, असे सूचक विधान जयंत पाटील यांनी केले आहे. 

हे ही वाचा : Uddhav Thackeray : राज ठाकरेंनी घेतली अमित शाहांची भेट; ठाकरे म्हणाले, "शेपूट हलवत..."

तसेच निलेश लंके यांनी तुतारी स्वीकारली की नाही, याबद्दल मी भाष्य करू इच्छित नाही. कारण लंकेंसाठी कोणतीही तांत्रिक अडचण तयार करण्याची माझी इच्छा नाही. योग्य वेळी आम्ही आमचा निर्णय कळवू,असे जयंत पाटील यांनी सांगितले. दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघात तुतारी वाजवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असे जयंत पाटील सांगितले. त्यामुळे आता  दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघात सुजय विखेंविरूद्ध निलेश लंके निवडणुकीच्या रिंगणार असणार आहे. 

अजित पवारांचा निलेश लंकेंना इशारा 

दरम्यान गेल्या गुरूवारी निलेश लंके यांच्या 'मी अनुभवलेला कोविड' या पुस्तकाचे पुण्यातील शरद पवारांच्या कार्यालयात प्रकाशन पार पडले होते. या कार्यक्रमा दरम्यान निलेश लंके शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. मात्र ऐनवेळी हा पक्षप्रवेश टळला होता. 

हे ही वाचा : 'मेला तर पुन्हा बाय इलेक्शन', अजित पवारांची शिवतारेंनी उडवली झोप

निलेश लंकेच्या या प्रवेशाच्या चर्चांवर अजित पवारांनी बारामतीत माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. या प्रतिक्रियेतून अजित पवारांनी निलेश लंकेंना इशारा दिला होता. ''निलेश लंके हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार आहे. त्याला जर वेगळाही काही निर्णय घ्यायचा असेल, तर त्यांनी घेऊ नये, हे माझे त्याला आव्हान आणि विनंती देखील आहे, असे अजित पवारांनी म्हटले होते. तसेच  बुधवारी तो (निलेश लंके) मला भेटला होता. त्याला जर निर्णय घ्यायचाचं झाला तर त्याला आमदारकी सोडावी लागेल, नाहीतर त्याची आमदारकी रद्द तरी होईल. एखाद्याने पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली, तर पक्ष कारवाई करू शकतो, असा इशारा देखील अजित पवारांनी निलेश लंकेंना दिला होता. 

हे वाचलं का?

    follow whatsapp