Kiran Mane : "उज्ज्वल निकम यांना लोकसभेत नव्हे जेलमध्ये पाठवायला हवं"

मुंबई तक

ADVERTISEMENT

kiran mane social media post ujjwal nikam mumbai north central lok sabha 2024 hemant karkare sm mushrif
एस.एम. मुश्रीफ यांनी रिटायरमेन्ट नंतर कुठल्या पक्षाची लाचारी करत आमदारकी खासदारकीची भिक नाही मागितली.
social share
google news

Kiran Mane Social Media Post : उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातून भापजने विद्यमान खासदार पूनम महाजन यांचे तिकीट कापून ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम (ujjwal nikam) यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे उत्तर मध्य मुंबईतून आता उज्ज्वल निकम महायुतीचे उमेदवार असणार आहेत. या उमेदवारीनंतर आता ठाकरे गटाचे नेते किरण माने  (Kiran Mane) यांनी एक खरमरीत पोस्ट केली आहे. या पोस्टमधून उज्ज्वल निकमांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. नेमक्या या पोस्टमध्ये काय आहे? हे जाणून घेऊयात. (kiran mane social media post ujjwal nikam mumbai north central lok sabha 2024 hemant karkare sm mushrif) 

ADVERTISEMENT

किरण मानेंची पोस्ट जशीच्या तशी.. 

"उज्ज्वल निकम यांना खरंतर लोकसभेत न पाठविता जेल मध्ये पाठवायला हवं." असं माजी पोलीस महानिरीक्षक एस.एम. मुश्रीफ म्हणाले ! का म्हणाले असतील?

पोलीस महानिरीक्षक हे साधं पद नाही भावांनो. या पदावरचा माणूस जे बोलतो ते हलक्यात घेण्यासारखं नसतं. एस.एम. मुश्रीफ यांनी रिटायरमेन्ट नंतर कुठल्या पक्षाची लाचारी करत आमदारकी खासदारकीची भिक नाही मागितली. त्यांनी एक पुस्तक लिहीलं... 'करकरेंना का व कोणी मारले?' 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा : ठाकरे, पवारांबद्दल सहानुभूतीची लाट दिसतेय का? मोदी म्हणाले...

त्या पुस्तकात त्यांनी काही सिक्रेटस् ओपन केली आहेत. मुश्रीफ साहेब म्हणतात, : "पाकिस्तानच्या लष्करे तोयबाच्या अतिरेक्यांची बोट मुंबईवर हल्ला करण्यासाठी निघाली आहे, याची डिटेल माहिती अमेरीकन गुप्तचर यंत्रणेकडून भारताच्या गुप्तचर यंत्रणेला 19 नोव्हेंबर 2008 रोजीच मिळाली होती. त्या बोटीचे अक्षांश व रेखांशही समजले होते. पुढील कारवाईसाठी ही माहिती मुंबई पोलीस, महाराष्ट्र शासन व पश्चिमी नौदल विभाग यांना कळवण्याची जबाबदारी गुप्तचर यंत्रणेचे तत्कालीन सहसंचालक प्रभाकर अलोक यांची होती. पण त्यांनी ती जाणीवपूर्वक कळविली नाही आणि हा हल्ला होऊ दिला. 

प्रभाकर अलोक यांच्या मनात नक्की काहीतरी कपट होतं. यात शेकडो निरपराध लोकांचे बळी गेले... तितकेच लोक जन्मभरासाठी अपंग झाले. त्यासाठी प्रभाकर अलोक हे संपूर्णपणे जबाबदार आहेत. पण विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी हा अत्यंत महत्वाचा मुद्दा कोर्टाच्या निदर्शनास आणला नाही, कारण त्यांना प्रभाकर अलोक यांना वाचवायचे होते... का??? तर उज्ज्वल निकम यांना माहीत होते की प्रभाकर अलोक हे आर.एस.एस.च्या आतल्या गोटातले आहेत !"

ADVERTISEMENT

हे ही वाचा : ''माढा मोहिते पाटलांच्या दहशतीतून मुक्त करणार''

पुढे ते सांगतात, : "हेमंत करकरेंच्या शरीरात मिळालेल्या गोळ्या या अजमल कसाब किंवा अबू इस्माईल यांच्या रायफलमधून उडविलेल्या नव्हत्या असे कोर्टाच्या सुनावणीमध्ये सिध्द झाले होते (मुंबई सेशन्स कोर्ट निकालपत्र पान नं. 920). त्याशिवाय करकरेंच्या पोस्ट मार्टेममध्ये स्पष्ट झाले होते की, त्यांच्या मानेपासून खाली पोटात रिव्हॉलव्हरने पाच गोळ्या मारल्या होत्या. त्यामुळे रिव्हॉलव्हरने गोळ्या मारणारा हा आरोपी कोण हे शोधून काढणे आवश्यक होते. पण उज्ज्वल निकम यांनी हा आरोपी शोधून काढण्यासाठी अधिक तपास करण्याचा आग्रह धरला नाही... कारण त्यांना माहीत होते की, मुंबई पोलीस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जाच्या संजय गोविलकर या अधिकाऱ्याने हे कृत्य केले आहे...आणि गोविलकर हा आर.एस.एस.शी संबंधीत आहे."

ADVERTISEMENT

आता ही ट्रोल्स पिलावळ मुश्रीफ यांनाही म्हणेल की "उज्ज्वल निकमांवर आरोप करायची तुझी लायकी आहे का?" या भक्तपिलावळीला फक्त भुंकायला सोडलंय हो. 'छ्छू' म्हटलं की सुटायचं. पण माझ्या भावांनो, आपल्या धडावर आपलंच डोकं आहे ना? विचार करा. बास एवढंच

    follow whatsapp

    ADVERTISEMENT