Ratnagiri Sindhudurg Lok Sabha : किरण सामंतांची आधी माघार, नंतर पोस्ट का डिलीट केली?

मुंबई तक

ADVERTISEMENT

नारायण राणे यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघावर दावा केल्यानंतर किरण सामंत यांनी माघार घेतली.
किरण सामंत यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून माघार घेत असल्याची भूमिका जाहीर केली.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारस

point

नारायण राणे यांचा मतदारसंघावर दावा

point

शिवसेनेला आणखी एक मतदारसंघ सोडावा लागणार

Ratnagiri Sindhudurg Lok Sabha : महाविकास आघाडीने रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून उमेदवार जाहीर केला आहे. पण, महायुतीतीत या जागेवरून पेच निर्माण झाला आहे. भाजप आणि शिवसेना या जागेवर दावा करत असून, नारायण राणे यांनी ही जागा भाजपच लढणार, असा दावा केल्यानंतर शिवसेनेचे इच्छुक किरण सामंत यांनी माघार घेत असल्याचे जाहीर केले. पण, काही वेळातच ही पोस्ट डिलीट करण्यात आली. त्यामुळे उत्सुकता वाढली आहे. (Kiran Samant deleted post from social media)

ADVERTISEMENT

रायगडनंतर रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघही एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला गमवावा लागेल, अशीच परिस्थिती आहे. केंद्रीय मंत्री, भाजपचे नेते नारायण राणे यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर दावा केला आहे.

हेही वाचा >> भयंकर अग्नितांडव! एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू 

"खासदार विनायक राऊत हे ठाकरे गटाबरोबर असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये ताकद नाही. मी किरण सामंत यांच्याविरोधात नाही, पण भाजपने उमेदवारी दिली तर मी लोकसभा निवडणूक लढवीन आणि जिंकून येईन", असे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी म्हटले होते. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

किरण सामंत यांची माघार... 

नारायण राणे यांनी थेट आणि स्पष्ट भूमिका मांडल्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील नेत्यांमध्ये नाराजी आहे. मात्र, राणेंच्या भूमिकेनंतर शिवसेनेचे इच्छुक उमेदवार किरण सामंत यांनी आपण माघार घेत असल्याची घोषणा केली.

हेही वाचा >> ठाकरेंचा भाजपला मोठा झटका! विद्ममान खासदाराचा पक्षप्रवेश ठरला

Lok Sabha election data
मागील तीन लोकसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाने किती जिंकल्या होत्या जागा?

 

ADVERTISEMENT

किरण सामंत यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून म्हटलं की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होण्याकरिता आणि अब की 400 पार होण्याकरिता रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून माघार घेत आहे."

ADVERTISEMENT

किरण सामंत पोस्ट केली डिलीट

किरण सामंत यांनी माघार घेतल्याने ही जागा भाजप लढवणार, हे स्पष्ट झाले. पण, किरण सामंत यांनी ही पोस्ट डिलीट केली. त्यामुळे नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. किरण सामंत यांनी पोस्ट डिलीट केल्याने त्यांचा मतदारसंघावरील दावा कायम आहे का? अशी चर्चा सुरू झाली आहे. 

Kiran samant post on lok Sabha election 2024
किरण सामंत यांची सोशल मीडियावरील पोस्ट

दरम्यान, सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार किरण सामंत यांनी माघार घेतल्याची पोस्ट केली. पण, पोस्ट केल्यानंतर त्यांना शिवसेनेतील नेत्यांनी ती डिलीट करायला सांगितले. महायुतीचे जागावाटप अंतिम होईपर्यंत शिवसेनेला या मतदारसंघावरील दावा कायम ठेवायचा आहे. त्यामुळे सामंत यांना पोस्ट डिलीट करायला सांगण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT