Uddhav Thackeray: 'शाहांनी फडणवीसांना सांगितलं.. तू खोलीच्या बाहेर बस', ठाकरेंनी सांगितला नवा किस्सा!
Uddhav Thackeray Criticized Devendra Fadnavis: मातोश्रीमध्ये 2019 साली जी बैठक झाली होती त्यावेळी अमित शाह यांनी देवेंद्र फडणवीसांना बाळासाहेबांच्या खोलीच्या बाहेरच बसवलं होतं. असं म्हणत उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर तुफान टीका केली.
ADVERTISEMENT
Uddhav Thackeray Criticized Devendra Fadnavis over Balasaheb Room: मुंबई: 'आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्रीपदासाठी तयार करतो.. आणि मी दिल्लीला जातो..' या उद्धव ठाकरेंच्या दाव्यावर देवेंद्र फडणवीसांनी आज (20 एप्रिल) तुफान टीका केली.. 'उद्धव ठाकरे हे भ्रमिष्ट झाले आहेत.' अशी प्रतिटीका ही देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील आपल्या भाषणात केली. पण फडणवीसांच्या याच टीकेला काही तास उलटत नाहीत तोच शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुंबईतील एका प्रचार सभेत पुन्हा प्रतिहल्ला चढवला. (lok sabha election 2024 amit shah told devendra fadnavis you sit outside the room uddhav thackeray told a new story a criticized in harsh words)
ADVERTISEMENT
'आज ते जे बोलले.. आज ते चरफडले.. कारण मी त्यांचं बिंग फोडलं.. चरफडल्यानंतर ते भरकटले. ते मला भ्रमिष्ट बोलले.. बाळासाहेबांच्या खोलीत अमित शाहांनी तुम्हाला नो एंट्री केली होती. अमित शाहांनी तुम्हाला सांगितलं होतं की.. 'तू बाहेर बस, तू बाहेर बस.. दोन मोठी माणसं बोलतायेत तू बाहेर बस..' असं म्हणत उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना टार्गेट केलंच पण त्याचवेळी त्यांच्यावर जहरी शब्दात टीकाही केलं.
आदित्य ठाकरेंन मुख्यमंत्री ते बाळासाहेबांच्या खोलीचा किस्सा.. पाहा उद्धव ठाकरे जाहीर सभेत नेमकं काय म्हणाले..
'इंडियन एक्सप्रेसमध्ये मी मुलाखत दिली आणि महिला पत्रकार होत्या त्यांनी मला विचारलं की, अडीच-अडीच वर्षाचं ठरलं होतं... तर म्हटलं ठरलंच होतं. शिवसेनाप्रमुखांची खोली मातोश्रीत मी जिथे राहतो तिथे वर आहे. त्या खोलीत अमित शाह आणि मी बसवून ठरवलं होतं. मी माझ्या आई-वडिलांची शपथ घेतलीय.. तुळजा भवानीची शपथ घेतलीय.. आई-वडिलांशिवाय दुसरं दैवत कोणतं.. देव-देवतांची शपथ घेऊन मी बोललो..'
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
'पुढे मी बोललो की, साधारण याच काळात फेब्रुवारी. तो पुलवामा हल्ला झाला होता त्याच अलीकडे-पलीकडे अमित शाह आले होते. त्यांना मी सांगितलं होतं की, अडीच-अडीच वर्षाचं.. ते म्हणाले ठीक आहे. त्यानंतर 2-3 महिन्यांनी लोकसभा निवडणुका होत्या आणि 4-5 महिन्यांनी विधानसभा निवडणुका होत्या. त्या 4-5 महिन्याच्या काळात.. तोवर आदित्यने विधानसभा लढवण्याचा निर्णय घेतला होता. लोकसभेच्या वेळेला विधानसभेचा विचारच केला नव्हता. मला देवेंद्र म्हणाले.. म्हणजे कोपराला कसा गूळ लावतात ते बघा..'
हे ही वाचा>> 'फडणवीस म्हणाले होते आदित्यला मुख्यमंत्री बनवतील आणि...'; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट!
'मला म्हणाले.. उद्धवजी मी काय करतो.. आदित्यला चांगला तयार करतो. मग अडीच वर्षानंतर त्याला आपण मुख्यमंत्री करू. म्हटलं काही तरी त्याच्या डोक्यात घालू नका.. लहान आहे तो.. त्याला पहिलं आमदार म्हणून त्याची कारकीर्द सुरू करू दे. तुम्ही त्याला तयार नक्की करा. पण लगेच मुख्यमंत्री पद वैगरे डोक्यात काही घालू नका..'
'पण पुढचा प्रश्न माझा असा होता की, समजा.. आदित्यला मुख्यमंत्री करा तुम्ही म्हणताय.. तुम्ही एवढे ज्येष्ठ नेते.. या मुलाच्या हाताखाली काम करणार तुम्ही? माझ्या प्रश्न बरोबर होता की चूक?'
'तेव्हा ते म्हणाले की, 'अडीच वर्षानंतर मी वरती जाणार..' म्हटलं एवढ्या लवकर? 'नाही तसं नाही.. म्हणजे दिल्लीत जाणार..' म्हटलं असं सांगा मग.. वरती जाणार.. असं नका करू हो.. म्हटलं वर जाऊन काय करणार? पाऊस पाडणार?'
'नाही.. नाही.. आपल्याला कसंय.. अर्थ खात्यातलं बरं कळतं. म्हणजे यांना अर्थमंत्री व्हायचं होतं. हे सगळं ठीक आहे..'
'आज ते जे बोलले.. आज ते चरफडले.. कारण मी त्यांचं बिंग फोडलं.. चरफडल्यानंतर ते भरकटले. ते मला भ्रमिष्ट बोलले.. मी भ्रमिष्ट आहे की नाही लोकं ठरवतील.. पण तुमची हालत जी झालीए देवेंद्रजी ती फार वाईट आहे.'
ADVERTISEMENT
'आज चरफडून ते काय बोलले.. हे उद्धव ठाकरे भ्रमिष्ट झाले आहेत. आधी म्हणाले अमित शाहांना कुठल्या तरी खोलीत घेऊन गेले.. नंतर म्हणाले देवेंद्रने शब्द दिला. अहो देवेंद्र जनाची नाही तर मनाची ठेवा.. दोन्ही तुम्हाला नाहीए लाज-लज्जा सोडलेला कोडगा माणूस आहे..'
'कारण ज्याला तुम्ही कुठली तरी खोली म्हणतायेत.. तुमच्यासाठी कुठल्या तरी खोल्या बऱ्याच असतील.. त्या खोल्यांमध्ये तुम्ही काय करता. आम्ही नाही बघू इच्छित.. पण ज्याला कुठली तरी म्हणातयेत.. ती कुठली तरी नाही.. तर मातोश्रीमध्ये आम्ही ज्याला मंदिर मानतो ती बाळासाहेबांची खोली आहे.'
ADVERTISEMENT
'त्याच खोलीत अमित शाह नाक रगडायला आले होते.. बाळासाहेबांच्या फोटोसमोर.. तीच ती खोली. त्याच खोलीत अमित शाहांनी तुम्हाला नो एंट्री केली होती. मी नाही.. अमित शाहांनी सांगितलं होतं.. 'तू बाहेर बस, तू बाहेर बस.. दोन मोठी माणसं बोलतायेत तू बाहेर बस..'
'त्या खोलीत अटलजी आले होते, अडवाणीजी, राजनाथजी, प्रमोदजी आले होते. पण तुम्हाला तुमच्या नेत्याने बाहेर बस सांगितलं होतं.. मी नव्हतं. त्यामुळे तुम्हाला त्या खोलीचं महत्त्व माहिती नाहीए.. ती खोली आमच्यासाठी मंदिर आहे.'
'त्या खोलीला.. तू ना*#S माणसा.. कुठली तरी खोली म्हणतोस.. होय.. आज मी मुद्दामून ना@^# म्हणतोय.. कोडगा म्हणतोय. कारण माझ्या भावना या बाळासाहेबांच्या खोलीबद्दल अत्यंत संवेदनशील आहेतच..'
हे ही वाचा>> '...म्हणून ठाकरे-पवारांचे पक्ष फुटले', शाह काय म्हणाले?
'कधी कुठे जाताना.. चांगलं कार्य सुरू करताना त्या खोलीत जाऊन आम्ही शिवसेनाप्रमुखांच्या तसबीरीसमोर आणि माझ्या माँचा फोटो आहे तिथे नतमस्तक होतो. एवढं पावित्र्य आम्ही त्या खोलीला दिलं आहे. तिला तुम्ही कुठली तरी खोली म्हणता. जाऊ दे तुमच्या विचाराला खोलीच नाही. तुमचे उथळ विचार आहेत.' असं म्हणत उद्धव ठाकरेंनी 2019 साली काय घडलं होतं ते जाहीर सभेतून सांगितलं
आता उद्धव ठाकरेंच्या या टीकेनंतर देवेंद्र फडणवीस नेमकं काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT