'Ambani-Adani यांच्याकडून किती 'माल' उचलला?', काँग्रेसवर टीका करताना PM मोदी असं का बोलले?

मुंबई तक

ADVERTISEMENT

काँग्रेसवर टीका करताना PM मोदींना असं का बोलले?
काँग्रेसवर टीका करताना PM मोदींना असं का बोलले?
social share
google news

PM Modi on Ambani-Adani: तेलंगणा: लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Election 2024) जसजशी पुढे जात आहे तसतसे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील आरोप-प्रत्यारोप अधिक तीव्र होत आहेत. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज (8 मे) तेलंगणातील एका जाहीर सभेत थेट अदाणी-अंबानी यांचं नाव घेत काँग्रेस नेते राहुल गांधीवर गंभीर आरोप केले आहेत. पण पंतप्रधान मोदींनी ज्या पद्धतीने अदाणी-अंबानी या उद्योजकांची नावं घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. (lok sabha election 2024 how much money was taken from ambani adani why did pm modi make this statement while criticizing congress)
 
'गेली पाच वर्ष अदाणी-अंबानींच्या नावे ओरडणाऱ्या राहुल गांधींनी निवडणूक जाहीर होताच अदाणी-अंबानी यांचं नाव घेणं का बंद केलं? तुम्ही काळा पैसा किती पोती गमावला? टेम्पो भरून नोटा काँग्रेसपर्यंत पोहोचल्या आहेत का?' असा गंभीर आरोप पंतप्रधान मोदींनी यावेळी केला असून त्यावरून आता अनेक आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. 

हे ही वाचा>> 'पवारांना पक्ष चालवणं शक्य नसावं म्हणून...', देवेंद्र फडणवीसांनी डिवचलं

पंतप्रधान मोदी अदाणी-अंबानीचं नाव घेत असं का म्हणाले?

पीएम मोदी म्हणाले, 'तुम्ही पाहिलं असेल की, गेल्या पाच वर्षांपासून काँग्रेसचे राजपुत्र सकाळी उठल्याबरोबर जपमाळ जपायला सुरुवात करत होते. जेव्हापासून त्यांचे राफेल प्रकरण थंड झालं तेव्हापासून त्यांनी नवीन जपमाळ सुरू केली. ते पाच वर्षे एकच जपमाळ जपायचे. पाच उद्योगपती, पाच उद्योगपती.. मग हळूच म्हणू लागले. अंबानी-अदाणी... मात्र निवडणुका जाहीर झाल्यापासून त्यांनी अंबानी-अदाणींना शिव्या देणं बंद केलं.'

'एका रात्री त्यांची नावं घेणं का केलं बंद?'

पंतप्रधानांनी काँग्रेसला सवाल विचारताना म्हणाले की, 'राजकुमाराने घोषित करावे की, या निवडणुकीत अंबानी-अदाणी यांच्याकडून किती 'माल' उचलला आहे. काळा पैशाच्या किती पोती आणल्या आहेत? टेम्पो भरून नोटा काँग्रेससाठी पोहोचल्या आहेत का? काय डील झालं आहे? तुम्ही एका रात्रीत अंबानी-अदाणींना शिव्या देणे बंद केले. जरूर दाल मै कुछ काला है... पाच वर्षे तुम्ही अंबानी-अदाणींना शिव्या दिल्या. पण एका रात्रीत शिव्या देणं बंद झालं. म्हणजे कोणता ना कोणता चोरीला माल हा टेम्पो भरभरून तुम्हाला मिळाला आहे.   याचं उत्तर तुम्हाला देशाला द्यावं लागेल.'

हे ही वाचा>> पहाटेच्या शपथविधीवरून अजित पवारांचा शरद पवारांवर जोरदार हल्ला

'देश बुडाला तर बुडला, त्यांना काही फरक पडत नाही'

पंतप्रधान म्हणाले, 'तेलंगणाच्या निर्मितीवेळी येथील लोकांनी बीआरएसवर विश्वास ठेवला होता. बीआरएसने लोकांची स्वप्नं धुळीस मिळवली. काँग्रेसचाही तोच इतिहास आहे. स्वातंत्र्यानंतर काँग्रेसनेही तेच केले. देश बुडला तर बुडो पण त्यांच्या कुटुंबाला काही फरक पडत नाही. फॅमिली फर्स्टच्या धोरणामुळे काँग्रेसने पीव्ही नरसिंह राव यांचा अपमान केला. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पार्थिवाला काँग्रेस कार्यालयात प्रवेश दिला गेला नाही. पीव्ही नरसिंह राव यांना भाजप सरकारने भारतरत्न देऊन गौरवले.' असंही मोदी यावेळी म्हणाले.

एनडीए सरकारच्या योजनांचे केले कौतुक 

तेलंगणातील करीम नगर येथे जाहीर सभेला संबोधित करताना पीएम मोदींनी एनडीए सरकारच्या योजनांचेही कौतुक केले. ते म्हणाले, 'गेल्या 10 वर्षांत एनडीएने प्रत्येक क्षेत्राला पुढे नेण्याचे काम केले आहे. आम्ही शेती क्षेत्राचे आधुनिकीकरण करत आहोत. नैसर्गिक शेती, नॅनो इंडिया आणि ड्रोनला प्रोत्साहन दिलं आहे.' असंही मोदी यावेळी म्हणाले. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT