एग्जिट पोल

Devendra Fadnavis: महाराष्ट्रात राजकीय भूकंप... फडणवीसांची पत्रकार परिषदेत BJPला हादरवून टाकणारी घोषणा

मुंबई तक

ADVERTISEMENT

देवेंद्र फडणवीसांची पत्रकार परिषदेत भाजपला हादरवून टाकणारी घोषणा
देवेंद्र फडणवीसांची पत्रकार परिषदेत भाजपला हादरवून टाकणारी घोषणा
social share
google news

मुंबई: महाराष्ट्रात महायुतीला आणि विशेषत: भाजपला लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Election) मध्ये मोठा धक्का बसला आहे. भाजपचे केवळ 9 उमेदवार यावेळी निवडून आलेले असताना आता या सगळ्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. काल (4 जून) निकाल जाहीर झाल्यानंतर आज (5 जून) देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. ज्यामध्ये त्यांनी एक अशी घोषणा केली त्याने महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप झाला आहे. (lok sabha election 2024 political earthquake in maharashtra devendra fadnavis shocking announcement in press conference)

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचा जो दारुण पराभव झाला होता त्याची जबाबदारी स्वीकारत देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की, 'आपल्याला आता सरकारमधून मोकळं करण्यात यावं अशी विनंती आपण शीर्षस्थ नेतृत्वाला करणार आहे.'

पत्रकार परिषदेत 'ती' घोषणा देवेंद्र फडणवासांनी भाजपला दिला हादरा 

'जरी आम्हाला जागा कमी मिळाल्या असल्या तरी देखील मी महाराष्ट्र आणि मुंबई भाजपच्या दोन्ही अध्यक्षांचं अभिनंदन करतो की, त्यांनी अतिशय चांगलं काम त्यांनी केलंय.' 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

'शेवटी मी कितीही गणितं मांडली तरी हे खरं आहे की, जागा कमी आलेल्या आहेत हे आपल्याला मान्य करावं लागेल. एकूणच या निवडणुकीचं नेतृत्व हे एकप्रकारे भाजपमध्ये मी करत होतो. त्यामुळे या ठिकाणी जो काही पराभव झाला असेल, ज्या काही जागा आल्या असतील याची सगळी जबाबदारी ही माझी आहे. ती मी स्वीकारतो... मी हे मान्य करतो की, कुठेतरी मी स्वत: यामध्ये कमी पडलेलो आहे. ती कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न करणार आहे.' 

'त्यामुळे हा जो काही भाजपला सेटबॅक महाराष्ट्रात सहन करावा लागला त्याची सगळी जबाबदारी देवेंद्र फडणवीस.. मी.. या ठिकाणी स्वीकारतो.' 

ADVERTISEMENT

मी पक्षाला एक विनंती अजून करणार आहे. अर्थात भाजपमध्ये पक्ष सगळे निर्णय करतो. आता मला विधानसभेकरता पूर्ण वेळ याठिकाणी उतरायचं आहे. त्यामुळे मी भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वाला ही विनंती करणार आहे की, त्यांनी मला सरकारमधून मोकळं करावं आणि पक्षामध्ये पूर्ण वेळ काम करण्याची त्यांनी संधी द्यावी. जेणेकरून ज्या काही कमतरता राहिल्या आहेत त्या कमतरता पूर्ण करण्याच्या दृष्टीने मला माझा पूर्ण वेळ देता येईल. 

'अर्थात बाहेर राहिलो तरी सरकारमध्ये आम्हाला जे काही करायचं ते आमची टीम करेल. त्यांच्यासोबत आमची टीम करणारच आहे. त्यांच्यासोबत मी असणार आहेच. या संदर्भात मी लवकरच पक्षाच्या वरिष्ठांना भेटणार आहे आणि त्यांच्या सल्ल्याने ते जे सांगतील त्यानुसार मी पुढची कारवाई करेन.' असं देवेंद्र फडणवीस हे यावेळी म्हणाले.

ADVERTISEMENT

देवेंद्र फडणवीस यांच्या याच घोषणमुळे महाराष्ट्रातील भाजपमध्ये एकच खळबळ माजली आहे. कारण त्यांच्या निर्णयाचा नेमका परिणाम काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT