Lok Sabha Election 2024: भाजपला धक्का! 'हा' नेता शरद पवारांच्या राष्ट्रवादीत करणार प्रवेश
Sanjay Kshirsagar NCP Sharad Pawar: भाजप नेते संजय क्षीरसागर हे भाजप सोडून शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणार आहेत.
ADVERTISEMENT
Sanjay Kshirsagar Leave BJP and Join NCP-Sharad Pawar: सोलापूर: महाराष्ट्रात सध्या नेत्यांच्या पक्ष बदलण्याचा सपाटा सुरूच आहे. सोलापूर जिल्ह्यात विजयसिंह मोहिते पाटील यांनी शरद पवारांनासोबत जात भाजपला धक्का दिला. त्यानंतर आणखी एका नेत्याने भाजपला रामराम केला आहे. मोहोळ तालुक्यातील भाजपचे नेते संजय क्षीरसागर यांनी भाजपमधून बाहेर पडत असल्याची घोषणा केली. त्याचबरोबर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश करणार असल्याचेही जाहीर केले. (lok sabha election 2024 sanjay kshirsagar a leader close to devendra fadnavis will join NCP sharad pawar party big blow to bjp in solapur)
ADVERTISEMENT
'मला कायम अपमानास्पद वागणूक दिली'
"गेल्या दहा वर्षात मला कायम अपमानास्पद वागणूक दिली गेली आहे. त्यामुळे मी पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहे. भाजपकडून आजपर्यंत मला कधीच निधी दिला गेला नाही. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना भेटायला मुंबईत गेल्यानंतर आम्हाला तीन-तीन दिवस भेट मिळू शकली नाही. शेवटी तीन ते चार दिवस मुंबईत राहून परत मोहोळला यायचो. मतदारसंघातील 140 गावांचा दौरा केला. तेव्हा लोकांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा सल्ला दिला." असं क्षीरसागर यावेळी म्हणाले.
हे ही वाचा>> भर पावसात ठाकरेंची सभा.. मोदींवर हल्ला, भाषण जसंच्या तसं
संजय क्षीरसागर हे फडणवीसांचे निकटवर्तीय नेते म्हणून ओळखले जातात. पण, पक्षाकडून त्यांना डावललं असल्याची चर्चा सुरू होती. 2009 पासून मोहोळ विधानसभा मतदारसंघ राखीव झाला. त्यानंतर झालेल्या तिन्ही निवडणुकांत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला कडवी झुंज दिली होती.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
2014 मध्ये भाजपकडून संजय क्षीरसागर यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यांना 53 हजार 753 मते मिळाली होती. तर राष्ट्रवादीच्या रमेश कदम यांचा 8 हजार 337 मतांनी विजय झाला होता. मोहोळ तालुक्यात राजकीय प्रभाव असलेल्या क्षीरसागरांनी ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत भाजपला धक्का दिला आहे.
हे ही वाचा>> 'महाराष्ट्रात एवढ्या जागा मिळतील', पवारांनी आकडाच सांगितला
संजय क्षीरसागर यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत थेट राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार पक्षात जाण्याचा निर्णय घेतल्याने भाजपला मोठा फटका बसू शकतो. सोलापूर आणि माढा मतदारसंघात भाजपला विजय मिळू नये यासाठी शरद पवार दररोज नवनवी रणनिती आखताना दिसत आहेत. त्याचाच भाग म्हणून आता संजय क्षीरसागर यांना गळाला लावण्यात शरद पवार गटाला यश आलं आहे. जो एक प्रकारे भाजपला मोठा धक्का मानला जात आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT