Lok Sabha 2024 : वाराणसी ते बारामती... 19 हाय व्होल्टेज जागांवर निवडणूक कधी?

मुंबई तक

ADVERTISEMENT

पंतप्रधान मोदी, राहुल गांधी यांच्या मतदारसंघात कोणत्या दिवशी होणार मतदान?
देशातील महत्त्वाच्या मतदारसंघांमध्ये कोणत्या दिवशी होणार मतदान?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

लोकसभा निवडणूक २०२४

point

देशातील महत्त्वाच्या जागांवर कधी निवडणूक?

point

राहुल गांधींच्या मतदारसंघात पहिल्या टप्प्यात मतदान

Lok Sabha election Voting Date : केद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी (16 मार्च) लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. ७ टप्प्यात संपूर्ण निवडणूक होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिलला होणार आहे. देशभरात ४३ दिवस निवडणूक प्रक्रिया सुरू राहणार आहे. तर 4 जून रोजी नवीन सरकार सत्तेवर येणार आहे.

ADVERTISEMENT

देशात सात टप्प्यात मतदान होणार असले, तरी सगळ्याच्या नजरा आहेत हॉट सीटवर. तर या मतदारसंघांमध्ये कोणत्या दिवशी मतदान होणार तेही पाहुयात...

प्रतिष्ठा पणाला

या मोठ्या आणि चर्चेत असलेल्या जागांवर निवडणूक कधी होणार हे जाणून घेणंही खूप रंजक आहे, कारण एकीकडे या जागांवर सात टप्प्यांत निवडणुका होत असताना, दुसरीकडे ही जागा प्रसिद्धीच्या झोतात येणार आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मतमोजणीदरम्यान या जागांचे निकाल एकप्रकारे दिसणार असून पक्ष आणि त्यांच्या उमेदवारांचीही लिटमस टेस्ट असणार आहे. कोण आपली जागा टिकवून ठेवू शकेल आणि कोण आपली प्रमुख जागा गमावेल हे सर्व 'प्रतिष्ठेचं' ठरणार आहेत. जसे की अमेठीतून राहुल गांधींचा पराभव आणि गेल्या निवडणुकीत स्मृती इराणींचा विजय ही मोठी बातमी होती. याशिवाय, सर्वात महत्त्वाचा मतदारसंघ आहे वाराणसी. या मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन वेळा खासदार बनले आहेत. 

वाराणसीत सातव्या टप्प्यात होणार मतदान

वाराणसीमध्ये १ जून रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीचा हा शेवटचा म्हणजे सातवा टप्पा असेल. याआधी 20 मे रोजी अमेठीमध्ये मतदान होणार आहे, जी स्मृती इराणी आणि काँग्रेस परिवारासाठी महत्त्वाची जागा आहे. निवडणुकीचा हा पाचवा टप्पा असेल. 

ADVERTISEMENT

तिसऱ्या टप्प्यात सपासाठी महत्त्वाच्या असलेल्या मैनपुरी (डिंपल यादव) आणि बदायूं (शिवपाल यादव) येथे ७ मे रोजी मतदान होणार आहे. १९ एप्रिलला वायनाडमध्ये पहिल्या टप्प्यातच मतदान होणार आहे. वायनाड हा राहुल गांधींचा मतदारसंघ आहे. 

ADVERTISEMENT

कोणत्या VIP सीटवर मतदान केव्हा मतदान होणार, ते जाणून घ्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी - 1 जून 2024 - वाराणसी

स्मृती इराणी- 20 मे 2024 - अमेठी 

राहुल गांधी - 19 एप्रिल 2024 - वायनाड

शिवपाल यादव - 07 मे 2024 - बदाऊन

डिंपल यादव - 07 मे 2024 मैनपुरी

राजनाथ सिंह - 20 मे 2024 लखनौ

शशी थरूर - 19 एप्रिल 2024 - तिरुवनंतपुरम

केसी वेणुगोपाल - 19 एप्रिल 2024 - अलप्पुझा 

नकुल नाथ - 19 एप्रिल 2024 - छिंदवाडा 

शिवराज सिंह चौहान - 7 मे 2024 - विदिशा

ज्योतिरादित्य शिंदे - 7 मे 2024 - गुणा 

भूपेश बघेल - 26 एप्रिल 2024 - राजनांदगाव

अमित शहा - 26 एप्रिल 2024 - गांधी नगर 

मनोहर लाल खट्टर - 25 मे 2024 - कर्नाल

तरुण गोगोई - 19 एप्रिल 2024 - जोरहाट

सुप्रिया सुळे - 07 मे 2024 - बारामती 

पियुष गोयल - 20 मे 2024 - मुंबई उत्तर 

नितीन गडकरी - 19 एप्रिल 2024 - नागपूर 

वैभव गेहलोत - 26 एप्रिल 2024 - जालोर

देशात कधी आणि किती जागांवर मतदान होणार

यावेळीही लोकसभा निवडणूक सात टप्प्यात होणार आहे. 19 एप्रिलपासून मतदानाला सुरुवात होत असून, 4 जून रोजी निकाल जाहीर होणार आहेत. 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीतही एकूण सात टप्प्यांत मतदान झाले.

पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यामध्ये 21 राज्यांतील 102 जागांवर मतदान होणार आहे.

26 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. 13 राज्यांतील 89 जागांवर मतदान होणार आहे.

तिसऱ्या टप्प्यात 7 मे रोजी मतदान होणार आहे. 12 राज्यांतील 94 जागांवर मतदान होणार आहे.

चौथ्या टप्प्यात 13 मे रोजी मतदान होणार आहे. 10 राज्यांतील 96 जागांवर मतदान होणार आहे.

20 मे रोजी पाचव्या टप्प्यात मतदान होणार आहे. 8 राज्यांमध्ये 49 जागांवर मतदान होणार आहे.

25 मे रोजी सहाव्या टप्प्यात मतदान होणार आहे. 7 राज्यांतील 57 जागांवर मतदान होणार आहे.

1 जून रोजी सातव्या टप्प्यात मतदान होणार आहे. 8 राज्यांतील 57 जागांवर मतदान होणार आहे.

- 4 जूनला निकाल लागेल.

महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मतदारसंघात मतदान कधी?

चंद्रपूर - 19 एप्रिल
अमरावती - 26 एप्रिल 
यवतमाळ वाशिम - 26 एप्रिल 
रायगड - 7 मे
बारामती - 7 मे 
सोलापूर - 7 मे
माढा - 7 मे
सातारा - 7 मे
रत्नागिरी सिंधुदुर्ग -7 मे
कोल्हापूर - 7 मे
औरंगाबाद - 13 मे
पुणे - 13 मे
शिरूर - 13 मे
अहमदनगर - 13 मे
बीड - 13 मे
नाशिक - 20 मे 
कल्याण - 20 मे 
ठाणे - 20 मे 
मुंबईतील सर्व मतदारसंघ - 20 मे 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT