Sanjay Raut : "भाजपला राज्यात संध्याकाळपर्यंत...", देशमुखांवरील हल्ल्यानंतर राऊतांचा गंभीर आरोप
शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर संजय राऊत भाजपसह देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
देशमुखांवर हल्ला, फडणवीसांवर आरोप
देशमुखांवरील हल्ल्याबद्दल काय म्हणाले राऊत?
देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका
Sanjay Raut on Anil Deshmukh Attack Case : अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या हल्ल्यावरुन संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या जिल्ह्यात माजी गृहमंत्र्यांना ठार मारण्याचा प्रयत्न होतो, कायदा सुव्यवस्था पुर्णपणे रसातळाला गेली आहे. उद्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्हाला चिंता वाटते की, विरोधी पक्षातल्या किती नेत्यांवर हल्ले होतील असं म्हणत राऊतांनी चिंता व्यक्त केली आहे. तसंच जिहाद वगैरे उद्या संपून जाईल, भाजपला दंगली घडवायच्या आहेत, पण तसं होणार नाही असं राऊत म्हणाले.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >>Anil Deshmukh Attack Case : अनिल देशमुखांवर हल्ला, सलील देशमुखांचे फडणवीसांवर गंभीर आरोप
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
अनिल देशमुख यांच्यावर झालेला हल्ला हा अत्यंत निघृण असून, हा हल्ला होताना भाजपच्या नावाने घोषणा होत होत्या. मुंबईत बाबा सिद्दीकी यांची हत्या झाल्यानंतर आता अनिल देशमुखांवर असा हल्ला होणं म्हणजे कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे आहेत असं राऊत म्हणाले. निवडणूक आयोग हे भाजपच्यात हातात असा टोलाही राऊतांनी मारला. पुढे बोलताना ते म्हणाले की, अनिल देशमुख यांच्याशी उद्धव ठाकरेंनीही फोनवरुन चर्चा केली. विरोधी पक्षातल्या आणखी किती नेते, कार्यकर्त्यांवर हल्ले होतील अशी चिंता त्यांच्याकडून व्यक्त करण्यात आल्याचंही राऊतांनी सांगितलं. महाराष्ट्रात असं वातावरण कधीही झालं नव्हतं, पण आता देवेंद्र फडणवीस आणि अमित शाहांच्या काळात हे सगळं होतंय. तसंच या घटनेला स्टंट म्हणणाऱ्या भाजपवर टीका करताना राऊत म्हणाले की, स्टंटबाजीचे रजनिकांत तर पंतप्रधान मोदी आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
राज ठाकरेनी केलेल्या टीकेला राऊतांचा उत्तर
राज ठाकरे हे भाजपने दिलेलं स्क्रिप्ट वाचतात. त्यांना फार गांभीर्यानं घ्यायची गरज नाही. त्यांनी सध्या मोदी-शाहांच्या मदतीची भूमिका घेतल्यामुळे त्यांना कुणी फार गांभीर्यानं घेतं असं मला वाटत नसल्याचं ते म्हणाले. तुम्हाला लोक वापरुन घेतायत, मला त्यांच्याबद्दल वाईट वाटतं असंही संजय राऊत म्हणाले.
अनिल देशमुखांसोबत काय घडलं?
नरखेड येथील सांगता सभा आटोपून माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे काटोल येथे तीनखेडा भिष्णूर मार्गाने परत येत असताना काटोल जलालखेडा रोडवरील बेलफाट्याजवळ काही व्यक्तीने त्यांच्या गाडीवर अचानक मोठ्या प्रमाणात दगडफेक केली. या घटनेत अनिल देशमुख हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ADVERTISEMENT