Anil Deshmukh Attack Case : अनिल देशमुखांवर हल्ला, सलील देशमुखांचे फडणवीसांवर गंभीर आरोप
अनिल देशमुख यांचे पुत्र आणि काटोल विधानसभेचे उमेदवार सलील देशमुख यांनी देवेंद्र फडणवीसांवर आरोप केला आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
अनिल देशमुखांवर काटोलमध्ये हल्ला
हल्ल्यामध्ये अनिल देशमुख गंभीर जखमी
सलील देशमुख यांचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा
Anil Deshmukh : राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या तोफा काल थंडावल्या, मात्र दुसरीकडे वेगवेगल्या घटनांमुळे राज्यातील वातावरण ढवळून निघालं आहे. माजी गृहमंत्री आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्या गाडीवर काल रात्री तुफान दगडफेक करण्यात आली, असून त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर राज्यभरातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून संतप्त प्रक्रिया येत आहेत. त्यानंतर आता अनिल देशमुख यांचे पुत्र आणि काटोल विधानसभेचे उमेदवार सलील देशमुख यांनी देवेंद्र फडणवीसांवर आरोप केला आहे.
ADVERTISEMENT
सलील देशमुख यांच्या प्रचाराची सभा काल नरखेड येथे आयोजित करण्यात आली होती. प्रचाराची ही सांगता सभा आटोपून अनिल देशमुख हे तीनखेडा भिष्णूर मार्गाने परत येत असताना काटोल-जलालखेडा रोडवरील बेलफाट्याजवळ त्यांच्यावर हल्ला झाला. काही लोकांनी त्यांच्या गाडीवर अचानक मोठ्या प्रमाणात दगडफेक केली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते. त्यावरुन आता सलील देशमुख यांनी गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणावर बोलताना सलील देशमुख म्हणाले की, देवेंद्र फडणवीस स्वत: हे हल्ले घडवतायत. त्यांच्याच वरदहस्ताने या घटना होत असल्याचं त्यांनी म्हटलं. मागच्या काळात
सलील देशमुख काय म्हणाले?
सलील देशमुख यांनी अनिल देशमुख यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. त्यानंतर त्यांनी परिस्थितीबद्दल माध्यमांना माहिती दिली. अनिल देशमुख यांच्या मानेला आणि डोक्याला गंभीर दुखापत आहे. सिटी स्कॅन करण्यात आलं आहे. हल्ला झाला त्यावेळी गाडीत अनिल देशमुख, पीए उज्वल भोयर, अनिल देशमुख यांचे जावई गौरव चतुर्वेदी, ड्रायव्हर हे उपस्थित होते त्यावेळी हा भ्याड हल्ला झाला. सुरक्षा रक्षक आणि त्यांच्या गाडीमध्ये अंतर होतं. देवेंद्र फडणवीस यांच्याच जिल्ह्यात का सगळे गुन्हे घडतायत? अमित शाहांचा दौरा का रद्द झाला? देवेंद्र फडणवीस हे स्वतः हल्ले करवत असल्याचा सलील देशमुख यांचा गंभीर आरोप केलाय. परिणय फुके यांनीे केलेल्या आरोपांवर बोलताना ते म्हणाले की फुके सारख्या दीड दमडीच्या आमदाराला उत्तर देण्यासाठी मी बांधील नाही. भाजप उमेदवार चरणसिंह ठाकूरला देवेंद्र फडणवीस यांचा वरदहस्त आहे, त्यांतूनच हे धंदे होत आहेत. तसंच चरणसिंग ठाकूर यांच्यावर गंभीर आरोप सलील देशमुख यांनी केले आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
अनिल देशमुखांवर हल्ला, पण नेमकी कशी घडली घटना?
अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख काटोलमधून निवडणूक लढवत आहेत. याच मतदारसंघातून अनिल देशमुख हे विधानसभेवर निवडून गेले होते. पण यंदा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने त्यांच्याऐवजी त्यांचा मुलगा सलील देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. सलील देशमुखांविरोधात भारतीय जनता पक्षाने चरणसिंग ठाकूर यांना उमेदवारी दिली आहे. मध्य प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष जितू पटवारी यांनी शनिवारी आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांच्या उपस्थितीत काटोलमध्ये सलीलचा प्रचारही केला. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या मतदानापूर्वी काल प्रचाराचा शेवटचा दिवस होता.
नरखेड येथील सांगता सभा आटोपून माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे काटोल येथे तीनखेडा भिष्णूर मार्गाने परत येत असताना काटोल जलालखेडा रोडवरील बेलफाट्याजवळ काही व्यक्तीने त्यांच्या गाडीवर अचानक मोठ्या प्रमाणात दगडफेक केली. या घटनेत अनिल देशमुख हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT