Madha Lok Sabha : माढ्यात प्रचंड राडा! भाजप कार्यकर्त्यांनीच अडवली गिरीश महाजनांची गाडी

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

madha lok sabha constituency mohite patils residence meeting in akluj ranjitsingh nimbalkar bjp akluj solapur
धैर्यशील मोहिते पाटील लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे भाजपसमोर मोठं संकट उद्भवणार आहे.
social share
google news

Madha Lok Sabha Constituency : माढ्याचे खासदार रणजितसिंह निंबाळकरांना लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर झाल्याने भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील चांगले नाराज झाले आहेत. या नाराजीतून मोहिते पाटलांनी आज अकलूजमधील शिवरत्न बंगल्यावर एक बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर धैर्यशील मोहिते पाटील लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे भाजपसमोर मोठं संकट उद्भवणार आहे. हे संकट टाळण्यासाठी भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन अकलूजमध्ये दाखल झाले होते. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांची गाडी अडवून ठेवत जोरदार घोषणाबाजी केली होती.  (madha lok sabha constituency bjp party workers stopped girish mahajan car and shout dhairyshil mohite patil ranjitsingh nimbalkar)  

ADVERTISEMENT

माढा लोकसभा मतदार संघात आज सकाळपासूनच राजकीय घडामोडींना वेग आला आहे.  सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील मोहिते पाटील यांच्या शिवरत्न बंगल्यावर अत्यंत महत्वाची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला रामराजे निंबाळकर त्यांचे बंधू संजीव राजे निंबाळकर, शेकापचे जेष्ठ नेते व इंडिया आघाडीचे महाराष्ट्राचे प्रमुख भाई जयंत पाटील, रघुनाथराजे नाईक निंबाळकर हे शिवरत्नवर दाखल झाले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील माजी आमदार आणि महत्वाच्या नेत्यांनाही या बैठकीचे निमंत्रण देण्यात आले आहे. 

हे ही वाचा : निवडणूक आयोग औरंगाबाद आणि उस्मानाबाद नाव का वापरतोय?

माढा लोकसभा मतदार संघातून भाजपने रणजितसिंह निंबाळकरांना उमेदवारी घोषित केली होती.  त्यामुळे माढ्यातून मोहिते पाटलांना डावलण्यात आल्यानंतर कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. मोहिते पाटलांनी लोकसभा लढवावी यासाठी कार्यकर्ते आग्रही देखील आहेत. तसेच गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर 'माढा आणि निंबाळकरांना पाडा' अशी मोहिम राबवली जात आहेत. यातूनच या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. 

हे वाचलं का?

महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देण्याची कामगिरी अकलूजच्या भूमीने केली आहे. येत्या दहा ते पंधरा दिवसात महाराष्ट्राच्या राजकारणात फार मोठे बदल घडतील,असे भाकीत जयंत पाटील यांनी बैठकीनंतर केले. विधान परिषदेचे रामराजे नाईक निंबाळकर बैठकीनंतर म्हणाले, विजयसिहं मोहिते पाटील यांनी आम्हाल स्नेहभोजनासाठी बोलावले होते. आज कुठेही राजकीय चर्चा झाली नाही. दरम्यान या बैठकीनंतर आता मोहिते पाटील लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. मोहिते पाटील समर्थकांनी या संदर्भात स्टेटस आणि सोशल पोस्ट ठेवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे या चर्चांना उधाण आले आहे. 

हे ही वाचा : "तुमची धुणीभांडी करण्यासाठी शिवसेनेची स्थापना केलेली नव्हती"

दरम्यान शिवरत्नवर या सर्व घडामोडी घडत असताना भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन सोलापूरच्या अकलूजमध्ये धैर्यशील मोहिते पाटलांची नाराजी दुर करण्यासाठी दाखल झाले होते. यावेळी शिवरत्न बंगल्या शेजारी गिरीश महाजन दाखल झाले असता भाजप कार्यकर्त्यांनी त्यांची गाडी अडवून जोरदार घोषणाबाजी दिल्या. संतप्त कार्यकर्ते अखेर वाट सोडत नसल्याने गिरीश महाजनांना गाडीचा सन रुफ टॉप वर येऊन कार्यकर्त्यांना विनंती करावी लागली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांच्यासाठी वाट सोडली होती. 

ADVERTISEMENT

विद्यमान उमेदवारांना पुन्हा उमेदवारी देण्यात आल्याने विजयदादांची नाराजी आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळेंनी मला त्यांची नाराजी जाणून घेण्यासाठी पाठवले होते. मी नाराजी दुर करायला आलो नाही, तर त्यांच्या भावना काय आहेत. हे जाणून घेण्यासाठी आलो आहे. आता मी त्यांच्या भावना जाणून घेतल्या आहेत, त्या मी आता देवेंद्र फडणवीसांपर्यंत पोहोचवेण. तसेच उमेदवारी माझ्या हातात नाही आहेत हे निर्णय दिल्लीत होतात, असे गिरीश महाजन यांनी भेटीनंतर सांगितले. 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT