Maharashtra Lok Sabha : फडणवीस-पवारांची प्रतिष्ठा पणाला, माढ्यात कोण उधळतंय गुलाल?
Maharashtra Exit Poll : माढा लोकसभा मतदार संघातून भाजपने रणजितसिंह निंबाळकर यांना पुन्हा उमेदवारी दिली होती. तर निंबाळकरांच्या उमेदवारीवरून नाराज असलेल्या धैर्यशील मोहिते पाटलांना शरद पवारांनी उमेदवारी दिली होती. त्यामुळे माढा मतदार संघात कमळ विरूद्ध तुतारी अशी लढत रंगली होती.
ADVERTISEMENT
Maharashtra Exit Poll : लोकसभा निवडणुकीचा निकाल येत्या 4 जूनला लागणार आहे. तत्पुर्वी लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल हाती आले आहेत. या एक्झिट पोलमधून महाराष्ट्राच्या 48 जागांच्या निकाल लागले आहेत. यासह या 48 जागांवर कोणता उमेदवार जिंकणार याचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यात महाराष्ट्रात सर्वांधिक चर्चेत राहिलेल्या माढा लोकसभा (Madha lok sabha) मतदार संघात नेमकी कोणी बाजी मारली आहे. हे जाणून घेऊयात. (maharashtra exit poll 2024 madha lok sabha ranjeet singh naik nimbalkar bjp candidate sharad pawar ncp dhairysheel mohite patil rudra research and tv9 polstrat)
ADVERTISEMENT
एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात सर्वांधिक चर्चेत राहिलेल्या माढा लोकसभा मतदार संघात धैर्यशील मोहिते पाटील (Dhairysheel mohite patil) विजयी होताना दिसत आहेत. तर रणजित सिंह निंबाळकर (ranjeet singh naik nimbalkar) पराभूत होत असल्याचा एक्झिट पोलचा अंदाज आहे. विशेष म्हणजे रुद्र रिसर्च (Rudra Research) या संस्थेने आणि टीव्ही9 च्या पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलने एकच अंदाज वर्तवला होता.
हे ही वाचा : Mumbai Exit poll : मुंबईत कुणाची डरकाळी? 6 जागांचा निकाल कुणाच्या बाजूने?
माढा लोकसभा मतदार संघातून भाजपने रणजितसिंह निंबाळकर यांना पुन्हा उमेदवारी दिली होती. तर निंबाळकरांच्या उमेदवारीवरून नाराज असलेल्या धैर्यशील मोहिते पाटलांना शरद पवारांनी उमेदवारी दिली होती. त्यामुळे माढा मतदार संघात कमळ विरूद्ध तुतारी अशी लढत रंगली होती.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
या मतदार संघात शरद पवार एका मागुन एक डाव टाकत होते. पवारांच्या या प्रत्येक डावाला देवेंद्र फडणवीस शह देत होते.माढ्यातुन सुरुवातीला शरद पवारांनी रासपच्या महादेव जानकर यांना गळाला लावण्याचा प्रयत्न केला होता.मात्र पवारांचा हा डावपेच हाणून पाडत फडणवीसांनी त्यांना एनडीएत सामावून घेतले होते. पण माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांचे पारडे सुरुवातीपासूनच जड असल्याचे पाहायला मिळत होते. आता असेच अंदाज एक्झिट पोलमधूनही समोर येत आहे.एक्झिट पोलनुसार शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील माढ्यातून आघाडीवर आहेत, तर भाजपचे रणजित सिंह निबाळकर पिछाडीवर आहेत.
हे ही वाचा : Exit Poll : महाराष्ट्रात NDA ला जबर झटका, INDIA आघाडीचं काय?
माढा मतदार संघातून शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे 4 जून नंतर येणाऱ्या निकालात कोण गुलाल उधळतो? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT