Maharashtra Lok Sabha : महाराष्ट्रात भाजपचे 'मिशन 45' फसणार? काय आहे कारण?
Maharashtra Lok Sabha Election 2024 : एकीकडे उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पक्ष आणि शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष यांना पक्षफुटीनंतर सहानुभूती मिळताना दिसत आहे. तर दुसरीकडे अजित पवारांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे पक्षाचे अधिकृत 'घड्याळ' आणि 'धनुष्यबाण' अशी चिन्हे आहेत. पण जरी अशी परिस्थिती असली तरी महाराष्ट्रात महाविकास आघाडीच वरचढ ठरताना दिसत असल्याचा अंदाज संजय कुमार यांनी सांगितले आहे.
ADVERTISEMENT
Lokniti-CSDS Sanjay Kumar Prediction : महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागांसाठी मतदान पाच टप्प्यात पार पडले आहे. आणि आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष 4 जूनला येणाऱ्या निकालाकडे लागले आहे. असे असताना महाराष्ट्रातील (Maharashtra Lok Sabha) निकालाबाबत अनेक अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यात आता लोकनिती-सीएसडीएसचे प्रोफेसर आणि राजकीय विश्लेषक संजय कुमार यांनी महाराष्ट्रातील लोकसभेच्या (Lok Sabha Election 2024) निकालाबाबत धक्कादायक अंदाज वर्तवले आहेत. या अंदाजानुसार भाजपचे (BJP) महाराष्ट्रातील 45 पारचे मिशन फसताना दिसते आहे. (maharashtra lok sabha election 2024 lokniti csds political analyst sanjay kumar prediction maha vikas aghadi vs mahayuti)
ADVERTISEMENT
न्युज तकवर बोलताना राजकीय विश्लेषक संजय कुमार यांनी महाराष्ट्रातील निकालावर मोठं भाकित वर्तवलं. संजय कुमार म्हणाले की, महाराष्ट्रात खूप कन्फ्युजन आहे. एकीकडे उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पक्ष आणि शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष यांना पक्षफुटीनंतर सहानुभूती मिळताना दिसत आहे. तर दुसरीकडे अजित पवारांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे पक्षाचे अधिकृत 'घड्याळ' आणि 'धनुष्यबाण' अशी चिन्हे आहेत. पण जरी अशी परिस्थिती असली तरी महाराष्ट्रात महाविकास आघाडीच वरचढ ठरताना दिसत असल्याचा अंदाज संजय कुमार यांनी व्यक्त केला आहे.
हे ही वाचा : सुप्रिया सुळे की, सुनेत्रा पवार... सट्टा बाजाराचा अंदाज काय सांगतोय?
भाजपला शिंदे-पवारांचं होणार नुकसान?
राजकीय पक्षाच्या परफॉमन्सवर बोलताना संजय कुमार म्हणाले, काँग्रेसचं प्रदर्शन 2019 च्या तुलनेत चांगलं आहे, तर भाजपचं 2019 तुलनेत जागांचं प्रदर्सन थोडसं खराब आहे. तसेच देशात ना मोदींची लाट आहे, ना भाजपची लाट आहे, असे संजय कुमार यांनी सांगितले.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
भाजपच्या मित्रपक्षाची संख्या कमी झाली आहे तर काँग्रेसच्या मित्र पक्षांची संख्या जास्त आहे. अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेससोबत आले आहेत. विशेष म्हणजे, जे पक्ष काँग्रेसला पाठिंबा देत नाहीयेत, ते पक्ष भाजपसोबत नसल्याचेही चित्र आहे. त्यामुळे 2019 च्या तुलनेत भाजपच्या पार्टनरची संख्या कमी झाली आहे. महाराष्ट्रात काँग्रेसला जितका ठाकरे,पवारांचा फायदा होतोय, तितका फायदा भाजपला शिंदे-अजित पवारांचा होत नाही, असे संजय कुमार यांनी सांगितले आहे.
महायुतीला किती जागा मिळणार?
महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीला 48 पैकी किती जागा मिळणार? असा सवाल विचारण्यात आला होता. यावर संजय कुमार म्हणाले महाराष्ट्रात 48 जागांवर काँटे की टक्कर होणार आहे, इतकं मात्र नक्की आहे. पण महाविकास आघाडीला 48 पैकी 25-26 जागा येतील, तर महायुतीला 21-22 जागा येतील. त्यामुळे 2019 च्या तुलनेत महायुतीला नुकसान होताना दिसते आहे. कारण 2019 मध्ये भाजपने 48 पैकी 41 जागा जिंकल्या होत्या. यामुळे भाजपचं मिशन 45 पारचा स्वप्नही भंगताना दिसत आहे.
ADVERTISEMENT
दरम्यान आता 4 जूनला येणाऱ्या निकालात महाविकास आघाडी आणि महायुतीला इतक्याच जागा मिळतात की काही फेरबदल होतो. हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : शिंदेंच्या शिवसेनेच्या जागेवर भाजपचा दावा, अजित पवारांनी उतरवला उमेदवार
ADVERTISEMENT