PM Modi : "मी सात वेळा...", निकालाआधी मोदींचं पंतप्रधान पदाबद्दल मोठं विधान
Modi Statement : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होण्याआधी मोठे विधान केले आहे. आपण तीन नाही, तर पाच वेळा, सात वेळा निवडणूक जिंकू असे त्यांनी म्हटले आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
लोकसभा निवडणूक २०२४ निकाल
मोदींचे पंतप्रधान पदाबद्दल मोठे विधान
सात वेळा निवडणूक जिंकेल, असे मोदी म्हणाले
PM Modi Interview : लोकसभा निवडणुकीचे निकाल ४ जून रोजी जाहीर होत असून, त्यापूर्वीच दोन-तीन मुद्द्यावरून चर्चा सुरू आहे. यात मोदींच्या निवृत्तिचाही मुद्दा आहे. दरम्यान, आपण अजून पाच ते सात वेळा लोकसभा सत्तेत येऊ शकतो, असे विधान केले आहे. मोदींच्या या विधानाची जोरात चर्चा सुरू आहे. (Prime Minister said that Modi will win thrice, five times or even seven times)
ADVERTISEMENT
काही दिवसांपूर्वी अरविंद केजरीवाल यांनी मोदींच्या निवृत्तीबद्दल विधान केले होते. ७५ वर्षांचे झाल्यानंतर मोदी निवृत्त होतील. त्यानंतर अमित शाह पंतप्रधान होतील, असे केजरीवाल म्हणाले होते. त्यामुळे मोदींच्या निवृत्तीचा मुद्दा चर्चेत आला होता. अशात मोदींनी एनडीटीव्ही वृत्तवाहिनीला दिलेल्या विधानाची सगळीकडे चर्चा होत आहे.
हेही वाचा >> सावकाराकडून ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा...; व्हायरल व्हिडीओने महाराष्ट्रात खळबळ
चार जून निकाल येतील. इतिहास घडवण्याच्या वळणावर तुम्ही आहात. कारण पंडित नेहरूच आहेत, ज्यांनी सलग तीन वेळा सत्ता मिळवली होती. तुम्ही या विक्रमाची बरोबरी करू शकतात, याबद्दल शक्यता सर्वेक्षणातून सांगितले जात आहे. तिसरी टर्म मोठी जबाबदारी असेल, आव्हानात्मक असेल का? याकडे कसे बघता? असा प्रश्न मोदींना विचारण्यात आला.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
मोदींनी काय मिळवलं, हे माझं काम नाहीये
त्याला उत्तर देताना मोदी म्हणाले की, "बघा गुजरातमध्ये माझ्यासाठी लिहिलं जायचं की, गुजरातची सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री राहिलेली व्यक्ती. आता हे विश्लेषण करणाऱ्या लोकांचं काम आहे. माझे काम मोदीने काय मिळवलं, कुठे पोहोचले, हे नाहीये."
मोदी तर सात वेळा जिंकेल, कारण...
"माझी तुलना करायची असेल, तर अशी करा की, मोदींच्या कालखंडात देश कुठे पोहोचला. चर्चा देशाची करा. मोदी तर तीन वेळा जिंकेल, पाच वेळा जिंकेल, सात वेळा जिंकेल. १४० कोटी देशवासीयांचे आशीर्वाद आहेत, तर हे चालत राहणार आहे."
ADVERTISEMENT
हेही वाचा >> सुट्टीचा दिवस, 99 रुपयांची स्कीम अन् 27 जणांचा जळून कोळसा, काय घडलं?
पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या या विधानानंतर वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. भाजपमध्ये ७५ वर्षांनंतर निवृत्तीचा नियम आहे. लालकृष्ण आडवाणींपासून अनेक नेते त्यामुळे सक्रिय राजकारणापासून दूर झाले. ते मोदींच्या बाबतीत घडेल का, असा मुद्दा होता. त्यालाही अप्रत्यक्षपणे मोदींनी उत्तर दिले आहे.
ADVERTISEMENT
तीन, पाच, सात वेळा पंतप्रधान...
या मुलाखतीत 'मोदी तर तीन वेळा जिंकेल, पाच वेळा जिंकेल, सात वेळा जिंकेल', असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. पंडित नेहरू हे सलग तीन वेळा पंतप्रधान राहिले आहेत. आता पंतप्रधान झाल्यानंतर ते नेहरूंची बरोबरी करतील.
इथे मोदींनी महत्त्वाचे विधान केले आहे. म्हणजे नेहरूंनी सलग तीन वेळा सत्ता मिळवली होती. म्हणजे ते तीन वेळा पंतप्रधान झाले. मोदी असं म्हणताहेत की, पाच, सात वेळा जिंकेन म्हणजेच पाच ते सात वेळा पंतप्रधान होईल. दुसरं त्यांनी हेही स्पष्ट केलं की, "काशी ही अविनाशी आहे. मी काशीचा आहे म्हणून मी अविनाशी आहे."
ADVERTISEMENT