homepage_banner

मुंबई Tak Exclusive: 'मी ठरवलं मला भाजपसोबत जायचंय.. तर कोण थांबवू शकेल मला?', प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान

साहिल जोशी

ADVERTISEMENT

प्रकाश आंबेडकर यांचं मोठं विधान
प्रकाश आंबेडकर यांचं मोठं विधान
social share
google news

बातम्या हायलाइट

point

प्रकाश आंबेडकरांची एक्स्क्लुझिव्ह मुलाखत

point

मुंबई तकसोबत बोलताना केलं मोठं विधान

point

भाजपसोबत गेल्यावर मला कोण थांबवणार?

Prakash Ambedkar VBA: मुंबई: लोकसभा निवडणूक 2024 ला आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. मात्र, अद्यापही महाविकास आघाडीच्या जागांचा तिढा काही सुटलेला नाही. त्यातही वंचित बहुजन आघाडी पक्ष हा महाविकास आघाडीसोबत राहणार की नाही याविषयीही अद्याप सस्पेन्स कायम आहे. याचविषयी मुंबई Tak चे संपादक साहील जोशी यांनी आज (23 मार्च) प्रकाश आंबेडकर यांची एक्स्क्लुझिव्ह मुलाखत घेतली. ज्यामध्ये प्रकाश आंबेडकर यांनी एक मोठं विधान केलं आहे. (mumbai tak exclusive i have decided to go with bjp so who can stop me prakash ambedkar big statement)

'उद्या मी ठरवलं मला भाजपसोबत जायचंय.. कोण थांबवू शकेल मला? शरद पवार थांबवणार आहेत?, उद्धव ठाकरे थांबवणार आहेत? की, राहुल गांधी थांबवणार आहेत?' असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी आपण पक्ष म्हणून कोणलाही बांधिल नाही असं यावेळी नमूद केलं आहे.

पाहा प्रकाश आंबेडकर नेमकं काय म्हणाले: 

'मला असं म्हणायचंय की, या तिघांचं ठरलेलं नाही.. अडीच वर्ष ते एकत्र होते. अडीच वर्षात ते 48 जागा स्वत:मध्ये वाटून घेऊ शकले नाही? 15 जागांवर त्यांच्यात वाद आहे.. मीडियाने हे दाखवलंय का? की, त्यांच्यात 15 जागांवरून वाद आहे. पण मीडिया मला सारखं विचारतंय तुम्ही किती जागा मागणार, तुम्ही किती देणार.. ज्यावेळेस त्यांचंच ठरलेलं नाही तेव्हा तुम्ही आम्हाला का आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करताय. त्यांचंच ठरलेलं नाही तर आम्ही काय करणार आहोत?'

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

'मागच्या वेळेस सगळ्या मीडियाने असा प्रचार केला की, आम्ही बी टीम आहोत. त्यावेळेस कोणाच्या लक्षात आलं नाही की, प्रकाश आंबेडकर ही व्यक्ती अशी आहे की, ज्याच्या बरोबर जायचं त्याच्या बरोबर जाऊ शकते.' 

'उद्या मी ठरवलं मला भाजपसोबत जायचंय.. कोण थांबवू शकेल मला? शरद पवार थांबवणार आहेत?, उद्धव ठाकरे थांबवणार आहेत? की, राहुल गांधी थांबवणार आहेत?'

 

'मला कोण थांबवू शकतं?, माझ्या पक्षाला कोण थांबवू शकतंय? आम्हाला दोन बैठकांना बोलावलं नाही हे मीडियात दाखवलं नाही.'  

'प्रत्येक मीडिया हाऊस.. तुम्ही किती जागा लढवणार असा सवाल विचारतं.. आम्ही 10 किंवा 100 लढवू.. तुम्हाला का एवढा रस आहेत?' असं प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले.

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> Lok Sabha Election 2024 : शरद पवारांची PM मोदींवर जोरदार टीका, ''संविधानावर हल्ला...''

दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनीही यावेळी प्रश्न विचारला...

ADVERTISEMENT

प्रकाश आंबेडकर: 'दोन बैठकामध्ये आम्हाला बोलावलं नाही.. याच्या बातम्या तुम्ही चालवल्या का?'

साहिल जोशी: वंचित आघाडीला दोन बैठकीला बोलावलं नाही.. याच्या बातम्या वेळोवेळी झाल्या आहेत. तुमचे प्रतिनिधी ज्या प्रतिक्रिया देतात त्या आमच्या चॅनलवरून वारंवार प्रसिद्ध झालेल्या आहेत.

दरम्यान, यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी असाही दावा केला की, अद्याप महाविकास आघाडीचंच जागा वाटपाबाबत काहीही ठरलेलं नाही. त्यामुळे जोवर त्यांचं काही ठरत नाही तोवर आम्ही त्यामध्ये कसं बोलणार.

हे ही वाचा>> 'माझ्यासाठी त्यांनी अजूनही एक काम केलेलं नाही'; अमित ठाकरेंनी 'त्या' गोष्टीची व्यक्त केली खंत!

यामुळे महाविकास आघाडी आणि वंचित आघाडी यांच्यात कोणतीही बोलणी अद्याप पक्की झालेली नाही. एकीकडे पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्जाचा शेवटचा दिवस हा 27 मार्च आहे. म्हणजेच उमेदवारी अर्ज भरण्यासाठी केवळ चारच दिवस शिल्लक आहेत. असं असतानाही महाविकास आघाडीने आपले उमेदवार जाहीर केलेले नाहीत.

 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT