homepage_banner

Maharashtra Election: माजी आमदार दिलीप मानेंसह मुलगा पृथ्वीराजची निवडणुकीतून माघार, नेमकं कारण काय?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Dilip Mane And Prithviraj Mane Withdrew Form
Dilip Mane And Prithviraj Mane Latest News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

आमदार दिलीप मानेंसह मुलगा पृथ्वीराज मानेंनी अर्ज घेतला मागे

point

सोलापूर दक्षिण मतदारसंघात राजकीय चर्चांना उधाण

point

धर्मराज काडादी यांच्या गंगा निवासस्थानी पार पडली बैठक

Dilip Mane And Prithviraj Mane Latest News: राज्याच्या विधानसभा निवडणुकीचे पडघम येत्या 20 नोव्हेंबरला वाजणार असून 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर करण्यात येणार आहे. या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे राजकीय वर्तुळात बंडखोर उमेदवारांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. अशातच सोलापूर दक्षिण मतदारसंघातून मोठी बातमी समोर आली आहे. माजी आमदार दिलीप माने आणि त्यांचा मुलगा पृथ्वीराज मानेंनी विधानसभा निवडणूक लढवण्यात माघार घेतलीय. 

सिद्धेश्वर साखर कारखान्याचे चेअरमन धर्मराज काडादी अपक्ष निवडणूक लढवणार आहेत. धर्मराज काडादी यांच्या गंगा निवासस्थानी खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली माजी आमदार दिलीप माने, सिद्धेश्वर परिवाराचे नेते धर्मराज काडादी, सुरेश हसापुरे, बाळासाहेब शेळके, राजशेखर शिवदारे यांची बैठक पार पडली. त्या बैठकीनंतर माजी आमदार दिलीप माने यांनी भरलेला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला. तर   दिलीप माने हे धर्मराज काडादी यांना पाठिंबा देणार असल्याचं बोललं जात आहे.  

हे ही वाचा >> Sada Saravankar: 'अमित ठाकरे जिंकून येणं कठीण', 'ते' समीकरण समजवून द्यायला सरवणकर गेले राज ठाकरेंच्या घरी!

काडादी व माने प्रणिती शिंदे यांच्यासोबत निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात दाखल झाले होते. त्यांच्यासोबत सोलापूर दक्षिण मतदारसंघातील कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते. या राजकीय घडामोडीनंतर प्रणिती शिंदे सोलापूरच्या दक्षिण तहसील कार्यालयात पोहोचल्या. त्यावेळी त्यांनी नो कमेंट म्हणत माध्यामांना प्रतिक्रिय देणं टाळलं. धर्मराज काडादी यांना काँग्रेसने पुरस्कृत उमेदवारी दिली आहे, असं बोललं जात आहे. दक्षिण मतदार संघातून महाविकास आघाडीचे अमर पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. जर काँग्रेसने काडादी यांना पुरस्कृत करण्याचा निर्णय घेतला असेल, तर याचा थेट परिणाम शिवसेना उमेदवारावर होणार असल्याचं बोललं जात आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Election 2024: "माझी राजकीय आत्महत्या...", बंडखोर नाना काटेंची निवडणुकीतून माघार, नेमकं काय घडलं?

दरम्यान, कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. या मतदारसंघात महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार मधुरिमा राजेंनी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे या मतदारसंघात पुढचा उमेदवार कोण असेल, याची उत्सुकता आहे. महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमा राजे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT