homepage_banner

Raj Thackeray Dombivali : हिंदुहृदयसम्राट काढलं, जनाब लावलं.... पहिल्याच सभेत उद्धव ठाकरेंवर वार, शिंदे-अजितदादांनाही टोले

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

राज ठाकरेंच्या निशाण्यावर उद्धव ठाकरे

point

पक्षफुटीवरून अजित पवार-एकनाथ शिंदेंवरही बरसले

point

युती-आघाड्यांवर राज ठाकरे यांचा हल्लाबोल

Raj Thackeray Sabha : काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या नावासमोर हिंदूहृदयसम्राट लावणं बंद केलं असं म्हणत राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या पहिल्याच सभेत उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. राज ठाकरे आज डोंबिवलीमध्ये प्रचारसभा घेत आहेत. कल्याण पश्चिमचे उमेदवार उल्हास भोईर, उल्हासनगरचे उमेदवार भगवान भालेराव, मुरबाडच्या उमेदवार संगीता चेंदवणकर यांच्यासाठी ही सभा पार पडते आहे. या सभेत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. त्यानंतर त्यांनी चौफेर फटकेबाजी केली. गेल्या काही दिवसात राज्यात घडलेल्या युती आणि आघाड्या, तसंच पक्षफुटीच्या मुद्द्यावर राज ठाकरे यांनी परखड मत मांडलं. 2019 ला तुम्ही मत दिलं ते लोक कुठे आहेत ते सांगून दाखवा असं म्हणत राज ठाकरेंनी उपस्थितांना संबोधित केलं. 

 

राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?

 

हे ही वाचा >>Kolhapur: '%# मारायला... मला तोंडघशी पाडलं, दम नव्हता तर...', सतेज पाटलांचा पारा एवढा का चढला?

 

ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीविरोधात निवडणुका लढल्या, त्यांच्यासोबत जाऊन बसले उद्धव ठाकरे. कारण सांगितलं की अमित शाहांनी शब्द पाळला नाही. पण उद्धव ठाकरेंसमोर नरेंद्र मोदी, अमित शाह सांगितलं होतं की, देवेंद्र फडणवीस आमचे पुढचे मुख्यमंत्री असतील. मग तुम्ही तिथेच आक्षेप का नाही घेतला असं म्हणत उद्धव ठाकरे यांना सवाल केला. जेव्हा उद्धव ठाकरेंना कळालं की, आमच्याशिवाय भाजपचा मुख्यमंत्री होत नाही, तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद द्या, नाही तर आम्ही वेगळी भूमिका घेऊ. पण उद्धव ठाकरे राष्ट्रवादी, काँग्रेससोबत गेल्यावर त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावासमोरचं हिंदुहृदयसम्राट हे नाव काढून टाकलं. काही बॅनरर्सवर जनाब बाळासाहेब ठाकरे लिहिलं. स्वत:च्या स्वार्थासाठी, खुर्चीसाठी एवढ्या खालीपर्यंत गेला तुम्ही? असं म्हणत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला.  

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

 

राजू पाटलांचं कौतुक, शिंदे अजितदादांवर निशाणा

 

ADVERTISEMENT

हे ही वाचा >>Vidhan Sabha Election : अर्ज मागे घेण्याची मुदत संपली, 24 मतदारसंघांमध्ये शेवटच्या क्षणी मोठ्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर

 

ADVERTISEMENT


आमचा राजू विधानसभेत एकटा होता. मला त्याचा अभिमान आहे, कारण तो विकणारा नाही, टीकणारा होता. सहज माझी पक्ष, निशाणी घेऊन गेला असता, पण माझ्या सहकाऱ्यांच्या डोक्यात या गोष्टी येत नाहीत असं राज ठाकरे म्हणाले. शिवसेना आणि धनुष्यबाण ही कुणाची प्रॉपर्टी नाही असं म्हणत शिंदे आणि ठाकरेंवर सोबतच निशाणा साधला. तसंच शरद पवार यांच्याशी कितीही मतभेद असले तरी, राष्ट्रवादी हे शरद पवार यांचंच अपत्य आहे असं राज ठाकरे म्हणाले. 



एकनाथ शिंदेंच्या स्टेजवर भोजपूरी गाण्यावर डान्स 

 

मला कुणीतरी एक क्लिप पाठवली, त्यात मुख्यमंत्र्यांच्या सभेत, त्यांच्या भाषणापूर्वी लोकांचं मनोरंजन व्हावं म्हणून भोजपुरी गाण्यावर एक महिला नाचतेय. त्या स्टेजवर शिंदेंचं नाव होतं... ही लाडकी बहीण योजना आहे का? अशा प्रकारे मुली आणून नाचवणं वगैरे हे आपल्याकडे कधीच नव्हतं... हे तिकडे युपी बिहारकडे चालतं. एकनाथ शिंदेंनी यावर लक्ष घातलं पाहिजे. म्हातारी मेल्याचं दु:ख नाही पण काळ सोकावतो असं राज ठाकरे म्हणाले. 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT