Devendra Fadnavis : 'मी स्वत: त्यांची राजकीय कारकीर्द पुन्हा सुरू करेन...', फडणवीसांनी कोणाला दिला शब्द?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

राजू पारवे यांची उमरेडमधून माघार

point

राजू पारवेंच्या निर्णयानंतर काय म्हणाले फडणवीस?

point

उमरेड मतदारसंघातील पेच संपला

राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. आज तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत होती. त्यानंतर आता जवळपास सर्व मतदारसंघातलं चित्र स्पष्ट झालं आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचं जागावाटप पूर्ण झाल्यानंतरही अनेक मतदारसंघांमध्ये  पेच कायम होता. त्यासाठी सर्वच बड्या नेत्यांना नेत्यांची मनधरणी करावी लागली. अशातच फडणवीसांचा गड असलेल्या नागपूर जिल्ह्यातील उमरेडमध्ये महायुतीमध्ये बंडखोरी झाली होती. त्यानंतर महायुतीत मिठाचा खडा पडणार का? असं चित्र होतं, मात्र आता शिंदेंच्या शिवसेनेच्या राजू पार्वे यांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे. (devendra fadnavis reaction after raju parve takes back from vidhan sabha candidature from umred )

 

हे ही वाचा >>Laxman Hake : जरांगेंची विधानसभेतून माघार, लक्ष्मण हाके आक्रमक, म्हणाले, "गनिमी काव्याचा...

 

नागपूर जिल्ह्यातील उमरेड मतदारसंघामध्ये यंदा उमेदवारी कुणाला मिळणार यावर अनेक दिवस चर्चा सुरू होती. महायुतीच्या जागावाटपामध्ये ही जागा भाजपच्या सुधीर पारवे यांना सुटली. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेचे नेते राजू पारवे हे नाराज होते. राजू पारवे यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्जही दाखल केला होता. गेल्या अनेक दिवसांपासून राजू पारवे यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू होते. त्यानंतर आता राजू पारवे यांनी या मतदारसंघातून माघार घेतल्याचं स्पष्ट झालं आहे. स्वत: भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दल माहिती दिली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

 

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? 

 

हे ही वाचा >>Sharad Pawar : मनोज जरांगेंची विधानसभेतून माघार, शरद पवार यांना आनंद, म्हणाले आम्हाला...

राजू पारवे यांनी माझ्या विनंतीला मान देऊन उमरेड मतदारसंघातून आपला अर्ज मागे घेतला, याबद्दल त्यांचे आभार मानतो. जमिनीवरचे कार्यकर्ते, आमदार, समाजसेवक म्हणून त्यांनी उत्तम काम केलं आहे. भविष्यात त्यांच्या थांबलेल्या राजकीय कारकीर्दीला पुन्हा सुरू करण्यासाठी मी स्वत: लक्ष घालेन असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना शब्द दिल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे आता उमरेड मतदार संघातील महायुतीतला पेच संपल्याचं समोर आलं आहे. 

ADVERTISEMENT

 

ADVERTISEMENT

माहिममध्ये तिढा कायम

 

राज्यात चर्चेत असलेला आणखी एक मतदारसंघ म्हणजे मुंबईतील दादर-माहिम मतदारसंघ. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपूत्र अमित ठाकरे स्वत: या मतदारसंघातून मैदानात आहेत. त्यामुळे महायुती नेमकी काय भूमिका घेणार यावर सर्वांचं लक्ष होतं. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना आता ब्रेक लागला आहे. या मतदारसंघातून सदा सरवणकर, अमित ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे महेश सावंत अशी तिरंगी लढत होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. सदा सरवणकर यांनी राज ठाकरे यांची भेट घेण्याचाही प्रयत्न केला. मात्र ती भेट झाली नाही. काहीवेळापूर्वीच अर्थात आज दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत होती. त्यामुळे आता नेमकं काय घडणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.  

    follow whatsapp

    ADVERTISEMENT