PM Modi : मोदींचा रोड शो झालेल्या मतदारसंघात 'M' फॅक्टर ठरवणार निकाल
Mihir kotecha vs Sanjay Dina patil : ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघात दोन 'एम' फॅक्टर खूप महत्वाचे ठरणार आहेत. त्यातला एक 'एम' फॅक्टर म्हणजे मराठी मतदार आणि दुसरा म्हणजे मुस्लिम मतदार. हो दोन्ही भाषिक मतदार उमेदवाराला तारू शकतात. त्यामुळे दोन्ही उमेदवारांनी या दोन्ही मतांवर लक्ष केंद्रीत केले आहे.
ADVERTISEMENT
Mihir kotecha vs Sanjay Dina patil : ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघात भाजपचे मिहिर कोटेचा आणि शिवसेना ठाकरे गटाचे संजय दिना पाटील या दोघांमध्ये थेट लढत होणार आहे. याच मतदार संघातील घाटकोपर भागात बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा रोड शो पार पडला होता. त्यामुळे हा रोड शो कोटेच्या (mihir kotecha) यांच्यासाठी किती फायद्याचा ठरतो? हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. तत्पुर्वी या मतदार संघात दोन 'एम' फॅक्टर खूप महत्वाचा रोल निभावण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा 'एम' फॅक्टर कुणाला फायद्याचा ठरतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (north east mumbai lok sabha election 2024 m factor mihir kotecha vs sanjay dina patil pm narendra modi road show lok sabha 2024)
ADVERTISEMENT
मुलुंड ते शिवाजीनगर-मानखुर्दपर्यंत पसरलेल्या मतदार संघात मराठी, गुजराती आणि मुस्लिम मतदार आहेत. या मतदारसंघात मानखुर्द-गोवंडी भाग मुस्लिमबहुल आहे तर घाटकोपरमधील गुजराती-मारवाडी बहुल आहे आणि विक्रोळी, कांजूरमार्ग आणि भांडुपमधील मराठी भाषिक मतदार आणि मुलुंडमधील मिश्र लोकसंख्या आहे. द इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या आकडेवारीनुसार, 16 लाखांहून अधिक मतदारांपैकी 7.6 लाख मराठी, सुमारे 2.5 लाख मुस्लिम, 1.96 लाख गुजराती, मारवाडी किंवा पारशी मतदार आहेत आणि उत्तर भारतातील 1.73 लाख लोक हिंदी भाषिक आहेत.
हे ही वाचा : आदित्य ठाकरेंनी कल्याण किंवा ठाण्यातून निवडणूक का लढवली नाही?
या मतदार संघात दोन 'एम' फॅक्टर खूप महत्वाचे ठरणार आहेत. त्यातला एक 'एम' फॅक्टर म्हणजे मराठी मतदार आणि दुसरा म्हणजे मुस्लिम मतदार. हो दोन्ही भाषिक मतदार उमेदवाराला तारू शकतात. त्यामुळे दोन्ही उमेदवारांनी या दोन्ही मतांवर लक्ष केंद्रीत केले आहे. कोटेचा यांनी तर मराठी मतदारांना खूश करण्यासाठी जाहीरनाम्यात मुलुंडमध्ये टर्मिनस बांधणार असल्याचे म्हटले आहे. कारण या मतदारसंघातील मराठी लोकसंख्या कोकणात येत आहे. टर्मिनसवरून धावणारी कोकण एक्स्प्रेस ही पहिली ट्रेन असेल, अशी घोषणाही कोटेचा यांनी केली आहे. इतकंच नाही तर पंतप्रधान मोदींचा घाटकोपरमध्ये रोड शो आयोजित करून मुलुंडमधील मतांचा खड्डा घाटकोपरमध्ये भरण्याचा प्रयत्न केला आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
शिवाजीनगर-मानखुर्द या अल्पसंख्याक बहुल मतदारसंघावर शिवसेनेचे संजय दिना पाटील यांची भिस्त आहे. 2009 मध्ये राष्ट्रवादीतून लढताना पाटील हे शिवाजीनगरमध्ये झालेल्या एकगठ्ठा मतदारसंघातून निवडून आले होते. याच भागात मिहिर कोटेच्या यांच्या प्रचार सभांवर तीनदा दगडफेक झाली होती. कोटेचा यांनी शिवाजीनगर-मानखुर्द मधील मानखुर्द वगळून शिवाजीनगर असे नामकरण करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे तेथील वातावरण अधिक धार्मिक वातावरण बदलल्याचे चित्र बघायला मिळते.
हे ही वाचा : Uddhav Thackeray : 'नवरदेव बनवून किती दिवस बोहल्यावर चढणार...'
आता या मतदार संघातील एम फॅक्टर नेमका कुणाच्या पथ्यावर पडतो, हे आता निकालानंतर स्पष्ट होणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT