Narendra Modi : '...तेव्हा नकली शिवसेना तोंडावर कुलूप लावते', PM मोदी ठाकरेंवर बरसले!
Pm Narendra Modi Criticize Uddhav Thackeray :काँग्रेसच्या राजकुमाराकडून वीर सावरकरांबद्दल चार चांगले शब्दही बोलून घ्यावे, असे आवाहन ही मोदी यांनी उद्धव ठाकरे आणि शरदचंद्र पवार गटाला केले. तसेच नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादी काँग्रेस यांनी विनंती केल्यामुळे राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल निवडणुकीच्या काळात वाईट बोलत नसल्याचा दावा केला आहे.
ADVERTISEMENT

Pm Narendra Modi Criticize Uddhav Thackeray : कल्याणच्या सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. 'राहुल गांधीनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला. भव्य व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा नाकारली. काँग्रेसने सावरकरांचाही अपमान केला. तेव्हा ही नकली शिवसेना तोंडावर कुलूप आणि डोळ्यावर पट्टी बांधून बसली होती, अशी बोचरी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. (pm narendra modi criticize udhhav thackeray shiv sena ubt sharad pawar ncp kalyan rallly loksabha election 2024)
महायुतीचे उमेदवार डॉ.श्रीकांत शिंदे, कपिल पाटील आणि नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी यांची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेतून बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला. भव्य व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा नाकारली. या संदर्भातला व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल. तसेच काँग्रेसवाल्यांनी सावरकरांचाही अपमान केला, पण नकली शिवसेना यावर एक शब्द देखील बोलली नाही. नकली शिवसेनेने आता तोंडावर कुलूप आणि डोळ्यावर पट्टी बांधून बसलीय,अशी टीका मोदींनी ठाकरेंवर केली.
हे ही वाचा : बलात्काराचा आरोप, 23 FIR; भिंडेची गुन्ह्याची भलीमोठी कुंडली
काँग्रेसच्या राजकुमाराकडून वीर सावरकरांबद्दल चार चांगले शब्दही बोलून घ्यावे, असे आवाहन ही मोदी यांनी उद्धव ठाकरे आणि शरदचंद्र पवार गटाला केले. तसेच नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादी काँग्रेस यांनी विनंती केल्यामुळे राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल निवडणुकीच्या काळात वाईट बोलत नसल्याचा दावा केला आहे.