Raj Thackeray: मनसैनिक पाहणार आणखी वाट, मनसे लोकसभेच्या रिंगणातून आऊट; राज ठाकरेंनी स्पष्टच..
Raj Thackeray Lok Sabha Election: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. पण याशिवाय त्यांचा पक्ष लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
ADVERTISEMENT
Lok Sabha Election 2024 MNS: मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज (9 एप्रिल) मुंबईतील शिवतीर्थावर जाहीर पाडवा मेळावा निमित्त जाहीर सभा घेतली. ज्यामध्ये त्यांनी लोकसभा निवडणूक 2024 साठी त्यांची भूमिका जाहीर केली. ज्यामध्ये त्यांनी पंतप्रधान मोदींसाठी महाराष्ट्रात भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. पण याच राज ठाकरेंच्या निर्णयाचा त्यांच्या नेते आणि कार्यकर्त्यांना मोठा फटका बसणार आहे.
ADVERTISEMENT
राज ठाकरेंनी भाजपला पाठिंबा जाहीर करताना असं म्हटलं की, 'माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना हे सांगायचं आहे की, विधानसभेच्या तयारीला लागा.. जोरात विधानसभेच्या तयारीला लागा.. पुढच्या गोष्टी पुढे..' म्हणजे याचा अर्थ असा की, मनसे यंदाही लोकसभा निवडणूक लढवणार नाही.
हे ही वाचा>> ''उद्धव सारखं मुख्यमंत्री पद मिळालं नाही म्हणून मी मोदींना...'', राज ठाकरे कडाडले!
राज ठाकरेंच्या याच निर्णयाचा मनसेतील अनेक नेत्यांना फटका बसू शकतो. 2019 पासून राज्यातील राजकारण हे पूर्णपणे बदलून गेल्याने मनसेतील अनेक नेत्यांनी लोकसभेसाठी तयारी सुरू केली होती. मात्र, राज ठाकरेंच्या निर्णयाने आता त्यांना हादरा बसू शकतो. कारण त्यासाठी त्यांना थेट पाच वर्ष वाट पाहावी लागू शकते..
हे वाचलं का?
मनसे आणि लोकसभा निवडणुका..
1. 2009 लोकसभा निवडणूक - मनसे पक्ष स्थापन झाल्यानंतर 2009 ही त्यांच्यासाठी पहिलीच लोकसभा निवडणूक होती. ज्यामध्य मनसे राज्यभरात अनेक ठिकाणी त्यांचे उमेदवार उभे केले होते. या निवडणुकीत राज ठाकरेंनी मराठीच्या मुद्द्यावर तुफान प्रचार केला होता. ज्याची परिणिती म्हणून त्यांच्या अनेक मतदारांनी लाखो मतं घेतली होती.
मात्र, त्या निवडणुकीत त्यांचा एकही उमेदवार निवडून आला नव्हता. पण मनसेच्या उमेदवारांचा थेट फटका हा भाजप-शिवसेनेच्या तत्कालीन युतीला बसला होता आणि काँग्रेस-राष्ट्रवादीला फायदा झाला होता.
ADVERTISEMENT
2. 2014 लोकसभा निवडणूक - 2014 लोकसभा निवडणूक ही सर्वाथाने मोदींचीच होती. त्यातच 2009 ला मनसेला जो प्रतिसाद महाराष्ट्रातील मतदारांनी दिला होता तो 2014 पर्यंत पूर्णपणे ओसरला होता. पण तरीही जनतेत जाण्याचा आणि निवडणूक लढवण्याचा निर्णय हा मनसेने घेतला होता. पण त्यावेळी महाराष्ट्रातील जनतेने त्यांना पूर्णपणे नाकारलं होतं. मनसेच्या एकाही उमेदवाराला त्यांनी त्यावेळी निवडून दिलं नव्हतं.
ADVERTISEMENT
3. 2019 लोकसभा निवडणूक - 2014 लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने मनसेला दिलेला कौल हा मनसे पाच वर्षानंतरही विसरली नव्हती. त्यामुळेच 2019 साली मनसेने लोकसभा निवडणूक लढवायचीच नाही असा निर्णय राज ठाकरेंनी घेतलेला.
मात्र, असं असलं तरी राज ठाकरेंनी मोदी-शाहांना विरोध करण्यासाठी संपूर्ण राज्यात जाहीर सभा घेतल्या होत्या. एवढंच नव्हे तर त्यांचं लाव रे तो व्हिडिओ हा फॉरमेट देखील प्रचंड चर्चेत आला होता.
हे ही वाचा>> मोठी बातमी, राज ठाकरेंकडून 'यांना' बिनशर्त पाठिंबा जाहीर
पण राज ठाकरेंनी या विरोधी सभा घेऊनही फारसा फरक मतदारांवर पडला नव्हता. कारण तेव्हा भाजपने राज्यात पुन्हा 23 जागा जिंकल्या होत्या.
4. 2024 लोकसभा निवडणूक: 2019 विधानसभा निवडणुकीवेळी राज ठाकरेंनी जी भूमिका घेतली होती त्याच्या अगदी विरुद्ध भूमिका ही आता त्यांनी यंदाच्या निवडणुकीसाठी घेतली आहे. 2019 ला मोदींना राजकीय क्षितीजावरून हटवा असं म्हणणारे राज ठाकरे यांनी 2024 च्या निवडणुकीत केवळ मोदींसाठी आपण बिनशर्त पाठिंबा देत आहोत अशी घोषणा केली आहे.
आता या सगळ्या निर्णयाचा थेट फरक हा मनसेच्या कार्यकर्त्यांवर पडला आहे. त्यामुळे निवडणुकीत या निर्णयाचा नेमका काय परिणाम होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT