Ravindra Waikar : "दबाव होता... तुरुंगात जाणं किंवा पक्ष बदलणं हे दोनच पर्याय होते"

मुंबई तक

ADVERTISEMENT

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर रवींद्र वायकर यांचा मोठा गौप्यस्फोट.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करतानाचे रवींद्र वायकर यांचे छायाचित्र.
social share
google news

Ravindra Waikar Latest News : उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेलेल्या रवींद्र वायकर यांनी पक्षांतराबद्दल खळबळ उडवून देणार विधान केले आहे. उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेल्या रवींद्र वायकरांनी दबावामुळे शिवसेना सोडल्याचे सांगितले. (Ravindra Waikar big statement. he said that I Had Pressurized for quit uddhav Thackeray's shiv sena)

'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्राला रवींद्र वायकर यांनी मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी चौकशी यंत्रणांच्या कारवाईबद्दल पहिल्यांदाच स्फोटक भाष्य केले. 

रवींद्र वायकर यांनी काय केला गौप्यस्फोट?

वायकर म्हणाले, "चुकीच्या प्रकरणात मला गोवले गेले. त्यानंतर तुरुंगात जाणे किंवा पक्ष बदलणे हे दोनच पर्याय माझ्यापुढे उरले होते. जड अंतःकरणानेच मी पक्ष बदलला. दबाव तर होताच, परंतू पत्नीचेही नाव गोवले गेल्यावर माझ्यापुढे पर्याय नव्हता. माझ्यावर नियतीने जी वेळ आणली, ती कुणावरही येऊ नये."

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा >> दाभोलकर हत्या प्रकरणात दोघांना जन्मठेप! तिघे निर्दोष

"माझ्या हातातील शिवबंधन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वेळेपासून आहे. खांद्यावरचे शिवधनुष्यही... बाळासाहेबांच्या शिवसेनेत ५० वर्षे राहिल्यानंतर मला उद्धव ठाकरे यांची साथ सोडावी लागली, तेव्हा एखाद्या कुटुंब सदस्याला आपण पारखे होतो, तशीच माझी भावना होती. परंतु नियतीने माझ्यासमोर यक्षप्रश्न निर्माण करून ठेवला व नियतीच कसा बदल घडवून आणू शकते, ते सर्वांनीच पाहिले", असे वायकर यांनी सांगितले.

कुणीच हमी देत नव्हते, म्हणून...

वायकर म्हणाले, "माझ्याबद्दल तक्रार फौजदारी स्वरुपाची नव्हतीच. मला सर्वोच्च न्यायालयापर्यंत दरवाजे ठोठवावे लागले. माझे प्रकरण राजकीयच आहे, असे वकिलांनीही मला सांगितले. कुणीच मला काही हमी देत नव्हते. साहजिकच माझ्यापुढे काही पर्याय नव्हते."

ADVERTISEMENT

हेही वाचा >> "तुतारीचा एवढाच पुळका असेल, तर मंत्रि‍पदाचा राजीनामा द्या", शिंदेंच्या आमदाराने भुजबळांना सुनावलं

"भाजप नेते किरीट सोमय्या यांना मी प्रचारासाठी बोलावलेले नाही. मात्र, अलिकडेच पक्षात आलेल्या संजय निरुपम यांचे सहकार्य मिळत आहे आणि ते मी घेतही आहे. तसेच जोगेश्वरीबाहेर भाजपचे पूर्ण सहकार्य मिळत आहे. त्याचबरोबर राज ठाकरेंसह दिल्लीच्या काही नेत्यांच्या सभेची मागणी करण्यात आली आहे", असे रवींद्र वायकर म्हणाले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT