Lok Sabha Election 2024 : ''अमित शाहांवर आमचा विश्वास'', मुंबई TaK चावडीवर शंभूराज देसाईंचं मोठं विधान

मुंबई तक

ADVERTISEMENT

shambhuraj desai on lok sabha seat sharing mumbai tak Chawadi shiv sena eknath shinde amit shah narendra modi mahayuti ajit pawar
अमित शाहा यांच्यावर आमचा विश्वास आहे आणि आम्हाला सन्मानजनक जागा देतील,
social share
google news

Shambhuraj Desai, Mumbai Tak Chavadi : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने बुधवारी दुसरी उमेदवारी यादी जाहीर केली आहे. या यादीत महाराष्ट्रातील 20  जागांचा समावेश होता. या 20 जागांवर भाजपने त्यांचेच उमेदवार जाहीर केले होते. त्यामुळे आता महाराष्ट्रातील महायुतीच्या 28 जागांवर उमेदवारी जाहीर होणे बाकी आहे. या 28 जागांमधून शिवसेना-राष्ट्रवादीच्या वाट्याला किती जागा येतात? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. असे असतानाच आता अमित शाहा यांच्यावर आमच्यावर विश्वास आहे आणि आम्हाला सन्मानजनक जागा देतील, असा विश्वास राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री शंभूराजे देसाई यांनी व्यक्त केला. ( shambhuraj desai on lok sabha seat sharing mumbai tak Chawadi shiv sena eknath shinde amit shah narendra modi mahayuti ajit pawar)  

ADVERTISEMENT

मुंबई तकच्या चावडीवर आज राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री शंभूराजे देसाई यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी आगामी लोकसभेच्या जागावाटपासह इतर अनेक मुद्यांवर दिलखुलास उत्तरं दिली. लोकसभेच्या जागावाटपावर बोलताना शंभूराज देसाई म्हणाले की, भाजपसोबत आम्ही युतीत असताना 22 जागा लढतो होतो, त्यापैकी 18 जागांवर आम्ही विजय मिळवला होता. त्यामुळे लोकसभेत आम्हाला 22 जागा मिळाल्याच पाहिजेत, अशी ठाम भूमिका शंभूराजे देसाई यांनी मांडली. 

हे ही वाचा : Pankaja Munde: 'प्रीतम ताईंना विस्थापित करणार नाही', पंकजा मुंडेंनी दिला शब्द

कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात आम्ही 50 आमदार आणि 13 खासदार असा एकत्र उठाव केला होता. असा उठाव देशात कुठेच झाला नव्हता. त्यामुळे शिंदेंच्या नेतृत्वात आम्ही केलेल्या धाडसाचा योग्य मानसन्मान राखलाच पाहिजे. तसेच मुख्यमंत्री शिंदे यांनी इतकी मोठी भूमिका घेतली. भाजप-शिवसेना युती तुटू दिली नाही. हिंदुत्ववादी मतं फुटु दिली नाही. या सगळ्या गोष्टी लक्षात घेता आम्हाला विश्वास आहे.अमित शाह आमचा योग्य मानसन्मान राखतील, असा विश्वास शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला. 

हे वाचलं का?

दरम्यान मध्यंतरी अमित शाह यांनी जागावाटपाआधीच संभाजीनगरमधून भाजप लढवणार असल्याचे जाहीर केले होते. यावर बोलताना शंभूराज देसाई म्हणाले की,  मोदींना पंतप्रधान करण्यासाठी इथून कमळ फुलवायचे आहे.  दिल्लीत कमळ फुलवण्यासाठी इथूनही कमळ पाठवायचंय असा त्याचा अर्थ आहे. तसेच घटक पक्षाची गरज संपली तर भाजप त्यांना बाजुला करतो, असा आरोप नेहमी नेत्यांकडून होत असतो.यावर शंभूराज देसाई म्हणाले, भाजपकडून मित्रपक्षांना बाजूला ठेवण्याचा विषय असता, तर आम्ही शिंदेंसोबत 50 आमदार होतो, भाजपचे 107,ते म्हणू शकले असते ना...आम्ही 107 आहोत, आम्ही मुख्यमंत्रीपद घेतो, तुम्ही उप मुख्यमंत्री घ्या, पण भाजपने मनाचा मोठेपणा दाखवला, हा देखील विचार करणे गरजेचे असल्याचे शंभूराज देसाई यांनी नमूद केले. 

हे ही वाचा : Ajit Pawar : 'निलेश लंकेंची आमदारकी जाईल, पक्षांतरबंदी...'

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT