Kangana Ranaut: PM नरेंद्र मोदी का भेटतात बॉलिवूड सेलिब्रिटींना? कंगना राणौतनं दिलं खळबळजनक उत्तर, म्हणाली...

मुंबई तक

ADVERTISEMENT

Kangana Ranaut On PM Narendra Modi
Kangana Ranaut On PM Narendra Modi
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौतचं मोठं विधान

point

पीएम मोदी बॉलिवूड सेलिब्रिटींना का भेटतात?

point

कंगना राणौतनं म्हणाली, "इंडस्ट्री अनाथ...""

Kangana Ranaut On PM Narendra Modi:  बॉलिवूड इंडस्ट्रीची लोकप्रिय अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अजेंडा आजतक 2024 शोमध्ये कंगनाने पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत मोठं विधान केलं आहे. पीएम मोदी बॉलिवूड सेलिब्रिटींना का भेटतात? याबाबत कंगनाने खळबळजनक प्रतिक्रिया दिली आहे. कंगना म्हणाली, "मला वाटतं ही इंडस्ट्री पूर्णपणे अनाथ आहे. कारण त्यांच्याकडे मार्गदर्शन नाहीय. मग तो जिहादी अजेंडा असो किंवा फिलिस्तीनी अजेंडा..त्यांना कोणीही कॅप्चर करतो. त्यांचं कोणत्याच प्रकारचं मार्गदर्शन नाहीय. कुठे जायचं आहे, हे त्यांना माहितच नाही".

ADVERTISEMENT

कंगना पुढे म्हणाली, मला वाटतं आपल्या फिल्म इंडस्ट्रीला मार्गदर्शनाची गरज आहे. ही सॉफ्ट पावर आहे आणि अंडरयूटिलाइज्ड आहे. आत पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आमचे मार्गदर्शक असले पाहिजेत. इन्फॉर्मेशन ब्रॉडकास्ट मिनिस्ट्री असो किंवा आणखी काही कार्यक्रम असो, मी देखील 20 वर्षांपासून इंडस्ट्रीत सामील आहे. मला वाटतं ही इंडस्ट्री पूर्णपणे अनाथ आहे. कारण त्यांच्याकडे गायडन्स नाहीय. थोडे पैसे दिल्यावर ते काहीही बोलतात. त्यांना दाऊत त्यांच्या पार्टीत घेऊन जातो. हे लोक अनेकदा ड्रग्ज प्रकरणात समोर येतात. खूप वल्नरेबल आहे.

हे ही वाचा >> Allu Arjun Released : तुरूंगाबाहेर येताच अल्लू अर्जुन म्हणाला ज्या कुटुंबातल्या महिलेचा मृत्यू झाला, त्यांना...

प्रधानमंत्री आपल्याला भेटतात आणि आपलं काम पाहतात, असं त्यांनाही वाटलं पाहिजे. मोदीजी आपल्याबद्दल विचार करतात. त्या ठिकाणी अशा प्रकारच्या गोष्टी होत नाहीत. त्यांना काहीही वाटतं की, आम्ही लोक गँगस्टर्सच्या पार्टीत जाऊन डान्स करतो. त्यांना वाटतं की, आम्हा लोकांना कुणीही पाहत नाही. ही खूप चांगली गोष्ट आहे की, ते मेन स्ट्रीमला पाहत आहेत. आपल्याला इतर लोकांच्या इंडस्ट्रीसारखी ट्रीटमेंट मिळत नाही. आपण किती चित्रपट बनवतो, किती रेव्हेन्यू जनरेट करतो. मी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेण्याचा विचार करत आहे. एक दिवस ते बोलावतील आणि मी त्यांना भेटेल, अशी आशा आहे, असंही कंगना म्हणाली.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> 14 December 2024 Gold Rate: जबरदस्त! सोन्याच्या भावात मोठी घसरण; मुंबई ते दिल्लीपर्यंतचे दर वाचा एका क्लिकवर

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT