Weight Loss Tips: सुटलेलं पोट अन् मांड्यांची चरबी मेणासारखी वितळेल! हिवाळ्यात फक्त 'हा' डाएट फॉलो करा

मुंबई तक

ADVERTISEMENT

 How can I lose weight in 7 days at home
How can I lose weight in 7 days at home
social share
google news

बातम्या हायलाइट

point

हिवाळ्यात कसं कराल झटपट वजन कमी?

point

वजन कमी करण्यासाठीचा बेस्ट डाएट प्लॅन कोणता?

point

वजन कमी करण्याच्या ट्रिक्सबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती

Best Tips For Weight Loss : हिवाळी हंगामात लोकांना वजन वाढण्याची समस्या नेहमीच सतावत असते. हिवाळ्यात अनेक लोक व्यायामशाळेत किंवा मॉर्निंग-इव्हिनींग वॉकला जाण्याचा कंटाळा करतात. फिजिकल अॅक्टिव्हीटीची कमतरता, डाएट फॉलो न करणे आणि व्यायामाचा आळस केल्याने लोकांना वजन वाढण्याच्या समस्येला सामोरं जावं लागतं. तुम्हीही या समस्येने ग्रस्त असाल, तर आम्ही तुम्हाला वजन कमी करण्याच्या या जबरदस्त ट्रिक्स सांगणार आहोत. या ट्रिक्सचा वापर करून तुम्ही घरबसल्या वजन कमी करून फिट राहू शकता.

ADVERTISEMENT

भरपूर पाणी प्या

शरीरासाठी पाणी खूप महत्त्वाचं आहे. पाणी पिल्याने शरीराचं मेटाबॉलिज्म वेगवान होतं. त्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते. जर तुम्हाला अनहेल्दी फूड्स खाण्याची इच्छा झाली, तर त्याचवेळी तुम्ही एक ग्लास पाणी प्या. यामुळे क्रेविंग नियंत्रणात येईल आणि तुम्हाला भूख कमी लागेल. तसच यामुळे शरीर हायड्रेटेड तर राहीलच. पण डायजेशन व्यवस्थित होण्यासाठीही पाण्याच्या सेवनाचा फायदा होईल. तसच यामुळे शरीर डिटॉक्स होण्यास मदत होईल. त्यासाठी दिवसभरात 8-10 ग्लास पाणी नक्की प्या. 

हे ही वाचा >> Jitendra Awhad: "शरद पवारांमध्ये काही बदल..."; अजितदादा-शरद पवार भेटीवर जितेंद्र आव्हाडांचं मोठं विधान

लो कॅलरी फूडचं सेवन करा

तुम्हीही जेव्हा ब्रेकफास्ट, लंच किंवा डिनर करत असाल, त्यावेळी लो कॅलरी फूडचा तुमच्या डाएट प्लॅनमध्ये समावेश करा. तुम्ही मैद्याची रोटी खाणे टाळा. सकस आहारासाठी तुम्ही दिवसभारतून 4-5 चपात्यांचं सेवन करू शकता. तसच जेवणासोबत तुम्ही पालेभाज्या आणि ग्रीन सॅलाडचंही सेवन करू शकता. 

हे वाचलं का?

दुधाच्या चहाऐवजी 'हर्बल टी'चा समावेश करा

अनेक लोकांना दुधाचा चहा प्यायला खूप आवडतो. परंतु, थंडीच्या दिवसात काही लोक चहाचं खूप जास्त सेवन करतात. यामुळे शरीराचं वजन वाढतं. तुम्ही दिवसभरात एक दोन कप हर्बल चहा (ग्रीन टी) पिऊ शकता. हर्बल टी पिल्याने शरीरात गरमी तयार होते. तसच शरीरातील मेटाबॉलिजम वाढल्याने पचनक्रीया सुधारण्यास मदत होते. तुम्ही ग्रीन टी, दालचिनीचा चहा, ब्लॅक टी, कॅमोमाईल टी आणि जिंजर टी चं सेवन करू शकता.

हे ही वाचा >> फडणवीसांच्या राजवटीत शिंदेंपेक्षा अजितदादांना का मिळतंय जास्त महत्त्व? | Opinion

फळे आणि भाज्यांचं सेवन वाढवा

तुम्ही तुमच्या आहारात फळे आणि भाज्यांचा समावेश करा. दिवसभरात 300-400 ग्रॅम फळे आणि भाज्यांचं सेवन करा. यामुळे तुम्ही लो कॅलरीत जास्त फूड खाऊ शकता. यामध्ये डाएटरी फायबर असतात. ज्यामुळे शरीराला अनेक फायदे मिळतात. 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT