Sharad Pawar : "फोडायला अक्कल लागत नाही", फडणवीसांवर वार, पवारांनी काय सुनावलं?
Sharad Pawar Latest News : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या फुटीच्या मुद्द्यावरून शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र डागलं.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
शरद पवारांची देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका
सातारा लोकसभा निवडणूक २०२४
शिवसेना, राष्ट्रवादीच्या फुटीवरून टीका
Sharad Pawar Devendra Fadnavis : 'मी दोन पक्ष फोडून आलो', या देवेंद्र फडणवीस यांच्या विधानावर बोट ठेवत शरद पवारांनी खडेबोल सुनावले. 'देशात पक्ष फोडणे हा महत्त्वाचा उद्योग झालाय', असे सांगत पवारांनी भाजपवर हल्ला चढवला. (Sharad Pawar criticizes Devendra Fadnavis)
ADVERTISEMENT
शरद पवार यांनी वाई येथे झालेल्या सभेत देवेंद्र फडणवीस यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर टीका केली.
पवार म्हणाले की, "देशात पक्ष फोडणे हा महत्त्वाचा उद्योग झालाय. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून ज्यांनी काम केले, ते गृहस्थ देवेंद्र फडणवीस, एक दिवशी जाहीरपणे बोलले, की दोन पक्ष फोडून मी याठिकाणी आलो. काही उभं करायला अक्कल लागते, फोडायला अक्कल लागत नाही", अशा शब्दात पवारांनी फडणवीसांना सुनावले.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
हेही वाचा >> "महाराष्ट्राचा महानालायक उद्धव ठाकरे", भाजपचे ठाकरेंवर टीकास्त्र
"तुम्ही दोन पक्ष फोडले, काय झालं त्यातून? काही लोकांना तुम्ही संधी दिली, पण या देशाचे सबंध राजकारण उद्धवस्त करण्याची भूमिका तुम्ही घेतली हे लोकांना पसंत नाही. काही लोक आपल्यातलेही गेले. त्यांनी काही वेगळी भूमिका घेतली. हा देश एकसंघ ठेवायचा असेल, देशातील लोकशाही मजबूत ठेवायची असेल राजकीय पक्ष व्यवस्थित चालतील, याची काळजी घेतली पाहिजे", असे आवाहन पवारांनी भाजपवर टीका करताना मतदारांना केले.
मोदी-शाहांवर पवारांचं टीकास्त्र
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचा उल्लेख करत पवारांनी टीका केली. ते म्हणाले, "मोदी आणि त्यांचे जोडीदार अमित शाहा महाराष्ट्रात हिंडतात, भाषण करतात. त्यांनी भाषणात विचारलं की शरद पवार यांनी काय केलं? मोठी गंमतीची गोष्टंय."
ADVERTISEMENT
"हे गृहस्थ अख्ख्या देशाचे गृहमंत्री आहेत. आणि ते राज्याराज्यांत जाऊन लोकांसमोर आपण काय दिवे लावले हे सांगत नाहीत. दुसऱ्याने काय केलं हाच प्रश्न विचारतात. मोदी जातील तिकडे भाषणात सांगतात की, दहा वर्षे ज्यांच्या हाती सत्ता होती त्या सत्तेचा वापर मी महागाईची स्थिती बदलणार."
ADVERTISEMENT
हेही वाचा >> पूनम महाजन यांचे तिकीट 'या' दोन कारणामुळे गेले
"यांनी इंधनाचे, गॅस सिलेंडरचे भाव वाढवले, ते कमी केले नाही. ते जी धोरणं आखतायंत, ती देशातील महागाई कमी करण्याची नाही, तर महागाई वाढवण्याची आहेत. म्हणून जो महागाई वाढवतो, त्याला सत्तेवर बसण्याचा अधिकार नाही. हा निकाल आपल्याला घ्यावा लागेल", असे पवार म्हणाले.
ADVERTISEMENT