'मला नेहमी डावललं जातं', उद्धव ठाकरेंच्या 'त्या' नेत्याचे आरोप! सोडणार साथ?

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Ambadas Danve On Chandrakant Khaire : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) नवनवीन खलबतं सुरू आहेत. आता शिवसेनेत (Shivsena UBT) पुन्हा राजकीय भूकंप येणार का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. कारण आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा बालेकिल्ला म्हटलं जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगरमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत. महाविकास आघाडीतील (MVA) जागावाटपाबाबत अद्याप कोणतीही माहिती नाही आहे. 

ADVERTISEMENT

नुकतेच, शिवसेना नेते (UBT) चंद्रकात खैरे यांनी उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच प्रचार करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे अंबादास दानवेंनी नाराजी व्यक्त केली आहे. 'चंद्रकांत खैरे हे आपल्याला सातत्याने डावलत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. जोपर्यंत उमेदवारी जाहीर होत नाही, तोपर्यंत लोकसभेसाठी आपणही आग्रही' असल्याचे त्यांनी सांगतले.

दानवे आणि खैरेंमधले वाद कसे आले चव्हाट्यावर?

अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्यातील वाद काही नवा नाही. यापूर्वीही ते अंतर्गत वादामुळे चर्चेत आले होते. सध्या त्यांच्यात धूसपूस होण्याचं कारण म्हणजे, लोकसभा प्रचार. चंद्रकांत खैरे यांनी लोकसभा प्रचारासाठी कार्यालय सुरू केले त्यानंतर हा वाद उफाळून आला. पक्षात उमेदवारांची घोषणा होण्यापूर्वीच खैरेंनी प्रचाराला सुरूवात केल्याने दानवेंनी नाराजी व्यक्त केली. त्यांना हे पटलं नाही. खैरेंनी कार्यालयाच्या भूमिपूजनालाही दानवेंना बोलावलं नाही. याची तक्रारही दानवेंनी पक्ष प्रमुखांकडे केली.  

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

 

'...मला काहीही देणं-घेणं नाही', अंबादास दानवेंनी स्पष्टच सांगितलं

'मी गेल्या 10 वर्षांपासून लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक आहे. मी माझी इच्छा लपवून ठेवलेली नाही. हे पक्षप्रमुखांनाही माहित आहे. आता ते कोणाला उमेदवारी देतील हे पाहूयात. एकच बाजू चालत असेल आणि एकांगीपणे कोणी वागत असेल तर त्याची दखल उद्धव ठाकरेंनी घेतली पाहिजे. चंद्रकांत खैरे मला नेहमी डावलत असतात. मी त्यांच्यासाठी नाही तर, उद्धव ठाकरे आणि पक्षासाठी काम करतो. खैरे काय म्हणतात, माझ्याविषयी काय बोलतात याच्याविषयी मला काहीही देणं-घेणं नाही आहे.' असं स्पष्ट मत अंबादास दानवे यांनी मांडलं आहे.

ADVERTISEMENT

अंबादास दानवेंच्या वक्तव्यानंतर संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

अंबादास दानवेंच्या वक्तव्यानंतर संजय राऊत म्हणाले की, 'दानवे अजिबात नाराज नाही आहेत ते शिंदेंच्या संपर्कातही नाही आहेत. त्यांच्यासोबत संभाजीनगरच्या जागेबाबतही चर्चा झाली आहे.'  

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT