Udayanraje Bhosale: 'तर मी राजीनामा देऊन पंकजाला साताऱ्यातून...', उदयनराजे का रडले?

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

'पंकजाला निवडून दिलं नाही तर राजीनामा देईन आणि...'- उदयनराजे भोसले

point

भाषणावेळी उदयनराजेंना का आलं रडू?

point

पंकजा मुंडेंसाठी जनतेसमोर उदयनराजेंची भावनिक साद 

Lok Sabha Election 2024 Beed Pankaja Munde : बीड: लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Election 2024) साठी आतापर्यंत महाराष्ट्रात तीन टप्प्यातील मतदान पार पडलं आहे. अशात आता सोमवारी (13 मे) चौथ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. यामध्ये सर्वात चर्चेत असणारा मतदारसंघ बीड (Beed) आहे. येथून महायुतीकडून पंकजा मुंडे (Pankaja Munde) तर महाविकास आघाडीकडून (MVA) बजरंग सोनवणे निवडणूक लढवत आहेत. चौथ्या टप्प्यात प्रचार करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. त्यामुळेच पंकजा मुंडे यांच्यासाठी भाजप नेते उदयनराजे यांची जाहीर सभा पार पडली. ज्यामध्ये उदयनराजेंनी भावनिक आवाहन करत मतदारांना साद घातली. याचवेळी उदयनराजेंना अश्रूही अनावर झाले.(Udayanraje Bhosale in Pankaja Munde's Beed Campaign Rally he said If Pankaja is not elected I will resign and get her elected from Satara)

ADVERTISEMENT

आज (11 मे) चौथ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. यावेळी महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी खासदार उदयनराजे भोसले यांनी परळी येथे हजेरी लावली. याशिवाय अजित पवार हे देखील याठिकाणी उपस्थित होते. या सर्वात आता चर्चेचा विषय ठरत आहे ते म्हणजे उदयनराजे भोसले यांचं भाषण... 

'पंकजाला निवडून दिलं नाही तर राजीनामा देईन आणि...'- उदयनराजे भोसले

'आता पंकजाला खासदार केलं नाही तर मी राजीनामा देऊन तिला साताऱ्यातून निवडून आणेन.' असं वक्तव्य भाजपचे नेते आणि सातारा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी केलं आहे. पंकजा मुंडेंना निवडून द्या असं आवाहन त्यांनी बीडकरांना केलं आहे. 'खासदार म्हणून त्या निवडून आल्या की त्यांच्या मंत्रिपदासाठी मोदींकडे शिफारस करणार.' असंही ते यावेळी म्हणाले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा : PM मोदींचं 'ते' वाक्य लागलं ठाकरेंच्या प्रचंड जिव्हारी!

भाषणावेळी उदयनराजेंना का आलं रडू?

'माझे वडील वारल्यानंतर मुंडे साहेबांनी माझं बोट धरलं.' भाषणावेळी गोपीनाथ मुंडेंबद्दल बोलताना उदयनराजे भावूक झाले. 'मी मनापासून सांगतो पंकजाला मतदान केलं नाही, तिला जर निवडून दिलं नाही, तर मी राजीनामा देईन आणि साताऱ्यातून तिला निवडून आणेन हे लक्षात ठेवा. पण तसं होत नाही. मी येताना बघत होतो चोहो बाजूंनी कंपाऊंडला कुलूप लावतो. हो म्हणालात तर सोडतो. नाहीतर नाही सोडत.' असंही उदयनराजेंनी बीडकरांना मतदानाचं आवाहन करत गंमत केली. 

हेही वाचा : देशात कुणाची सत्ता येणार? भेंडवळचं भाकित काय?

 

पंकजा मुंडेंसाठी जनतेसमोर उदयनराजेंची भावनिक साद 

'एका जीवाभावाच्या व्यक्तीला मदत करायची की नाही. तिला संधी मिळाली पाहिजे की नाही? ती काळ्याची पांढरी झाल्यानंतर तिला संधी मिळणार का?', असा सवाल उदयनराजे यांनी जनतेला विचारला. तसंच, 'मी कुणाचे कौतुक करायला आलो नाही. महाराजांचे नाव घेऊन विकास करत आहेत. गरिबी हटाव म्हणून काम करत आहे.', असं देखील त्यांनी सांगितलं.

ADVERTISEMENT

हेही वाचा : उज्वल निकम आणि करकरेंबद्दलचं 'ते' वक्तव्य वडेट्टीवारांना भोवलं, गुन्हा दाखल!

'एक सांगतो कृपा करा, माझ्या बहिणीला निवडून द्या. तलवार उपसा आता. मी आलो हिच्याकरता नीट वागा. आता वाकून नमस्कार करतो तुम्हाला तुमचं आमचं नातं काय जय भवानी जय शिवराय.' असं म्हणत उदयनराजेंनी पंकजा मुंडेंसाठी जनतेसमोर भावनिक साद घातली.

ADVERTISEMENT

 

 


 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT