Uddhav Thackeray : ''इंडिया आघाडी सरकार स्थापन करणार''
Uddhav Thackeray Reaction On Lok Sabha Election 2024 : देशातील सर्वसामान्य माणसांनी, सर्वसामान्यांची ताकद काय असते ती दाखवून दिली आहे. त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. सत्ताधारी कितीही मस्तवाल झाले तरी त्यांना त्यांची जागा एका बोटाने दाखवून देऊ शकतो, हे या निवडणुकीत दिसून आल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
ADVERTISEMENT

Uddhav Thackeray Reaction On Lok Sabha Election 2024 : 'देशातील सर्वसामान्य नागरीकांची ताकद काय असते ती त्यांनी आज दाखवून दिली आहे. सत्ताधारी कितीही मस्तवाल झाले तरी त्यांना त्यांची जागा एका बोटाने दाखवून देऊ शकतो, हे या निवडणुकीत दिसून आल्याची'' प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. (uddhav thackeray reaction on lok sabha election result 2024 maharashtra lok sabha result maha vikas aghadi mahayuti)
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरे माध्यमांशी बोलत होते. इंडिया आघाडीने सत्ता स्थापणेचा दावा केला पाहिजे. तसेच इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी उद्या दुपारनंतर दिल्लीत जाणार असल्याची माहिती देखील उद्धव ठाकरे यांनी दिली. तसेच इंडिया आघाडीचा पंतप्रधान पदाचा चेहरा कोण असेल? याबद्दल उद्याच्या बैठकीत चर्चा होणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
हे ही वाचा : Maharashtra Result: तुमचा खासदार कोण.. कोण विजयी, कोण पराभूत?
देशातील सर्वसामान्य माणसांनी, सर्वसामान्यांची ताकद काय असते ती दाखवून दिली आहे. त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. सत्ताधारी कितीही मस्तवाल झाले तरी त्यांना त्यांची जागा एका बोटाने दाखवून देऊ शकतो, हे या निवडणुकीत दिसून आल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.