BJP Candidates 2024 : भाजपच्या खासदारांची धडधड वाढली; पक्ष देणार झटका?
BJP Lok Sabha Candidates Update : भाजपकडून महाराष्ट्रातील काही खासदारांची तिकिटे कापली जाणार, हे जवळपास निश्चित झाल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
मुंबईतील लोकसभा मतदारसंघावर भाजपची नजर
पाच जागांवर भाजप देऊ शकतो उमेदवार
शिवसेनेला एक जागा मिळणार असल्याची चर्चा
Maharashtra Lok Sabha Candidates 2024 : ज्यांच्याकडे जिंकून येण्याची ताकद, त्यालाच तिकीट, असे सरळ सूत्र भाजपने लोकसभा उमेदवारीसाठी ठरवले आहे. त्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्रातील भाजपच्या काही खासदारांची धडधड वाढली आहे. मुंबईतील तीन विद्ममान खासदारांचे पत्ते कट होणार, अशी माहिती समोर आली. भाजपने पहिल्या यादीत केंद्रीय मंत्र्यांसह 35 विद्यमान खासदारांची तिकिटे कापली आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातही हे दिसणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
ADVERTISEMENT
महायुतीची लोकसभा जागावाटपाबाबत चर्चा सुरु आहे. महाराष्ट्रात 31-32 जागा लढण्याचे प्रयत्न भाजपचे आहेत. त्यामुळे शिवसेनेला (शिंदे गट) 12-13 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 4 जागा असा प्राथमिक फॉर्म्युला ठरल्याचे सुत्रांकडून समजते. मात्र, ऐनवेळी भाजपकडून मित्रपक्षांना धक्का दिला जाऊ शकतो, अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे. त्यामुळे मित्रपक्षातील खासदारही सध्या चिंतेत आहेत.
शिवसेनेच्या जागेवर भाजपचा उमेदवार?
भाजपने मुंबईतील लोकसभेच्या जागा जिंकण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. त्यासाठी जास्तीत जास्त जागा लढण्याचे प्रयत्न भाजपचे आहेत. शिवसेनेचे सध्या 13 खासदार आहेत. पण, महायुतीत त्यांना तितक्या जागा मिळण्याची शक्यता कमी आहे.
हे वाचलं का?
हेही वाचा >> शिंदेंना झटका तर ठाकरेंना मोठा दिलासा! 'या' पोलने ठरवलं कोण मारणार बाजी?
मुंबईतून गजानन कीर्तीकर आणि राहुल शेवाळे शिंदेंच्या सेनेत आहेत. पण, कीर्तीकर खासदार असलेल्या मतदारसंघातून उद्धव ठाकरेंनी अमोल कीर्तीकरांना उमेदवारी घोषित केली आहे. त्यामुळे ही जागा भाजपसाठी सोडावी आणि कीर्तीकर यांना विधान परिषदेवर पाठवायचे, असा प्रस्ताव दिल्याची माहिती समोर आली आहे. या जागेवरून भाजप अमित साटम यांना उमेदवारी दिली जाऊ शकते.
भाजप खासदारांची तिकिटे कापली जाणार?
भाजपने पहिल्या यादीत 30 पेक्षा अधिक विद्यमान खासदार आणि मंत्र्यांची तिकिटे कापली आहेत. महाराष्ट्रातील काही खासदारांचेही पत्ते कट होतील, अशी माहिती आहे. राजकीय वर्तुळात असे बोलले जात आहे की, भाजपा उत्तर मध्य मुंबई पूनम महाजन यांचे तिकीट कापू शकते.
ADVERTISEMENT
2019 च्या विधानसभा निवडणुकीत पूनम महाजन यांचे मताधिक्य तब्बल 50 हजारांनी कमी झाले आहे. या मतदारसंघातील मतांची समीकरणे बघून भाजपकडून मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांना उमेदवारी दिली जाऊ शकते.
ADVERTISEMENT
हेही वाचा >> ओमराजे आणि राणांचं वैर! ‘ही’ गणितं ‘धाराशिव’मध्ये खेळ बिघडवणार?
त्याचबरोबर ईशान्य मुंबईतून मनोज कोटक यांच्या ऐवजी पराग शहा, तर दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून राहुल नार्वेकर यांना तिकीट मिळू शकते, अशी चर्चा आहे. महत्त्वाचे म्हणजे मुंबईतील पाच जागा भाजप लढवू शकते आणि ठाण्याची जागा शिवसेनेला द्यायची, अशीही एक चर्चा आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT