अभिनेता सिद्धार्थ जाधवचं ‘ते’ स्वप्न झालं अखेर पूर्ण

मुंबई तक

मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधवने त्याच्या कॉमेडी आणि एक्टिंग स्किल्सने लोकांची मनं जिंकली आहेत. केवल मराठी सृष्टीत नाही तर बॉलिवूडमध्येही त्याने आपलं नाणं खणखणीत वाजवलं आहे. सिद्धार्थ जाधव लवकरच सलमान खानच्या राधे या सिनेमात झळकणार आहे. या सिनेमात काम केल्यानंतर सिद्धार्थने आपलं एक स्वप्न पूर्ण झाल्याचं म्हटलं आहे. सिद्धार्थने यासंदर्भात इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधवने त्याच्या कॉमेडी आणि एक्टिंग स्किल्सने लोकांची मनं जिंकली आहेत. केवल मराठी सृष्टीत नाही तर बॉलिवूडमध्येही त्याने आपलं नाणं खणखणीत वाजवलं आहे. सिद्धार्थ जाधव लवकरच सलमान खानच्या राधे या सिनेमात झळकणार आहे. या सिनेमात काम केल्यानंतर सिद्धार्थने आपलं एक स्वप्न पूर्ण झाल्याचं म्हटलं आहे.

सिद्धार्थने यासंदर्भात इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये सिद्धार्थ प्रभूदेवासोबत उभा आहे. या फोटोला कॅप्शन देताना सिद्धार्थ म्हणतो, “प्रभूदेवा….त्याचं ‘हम से है मुकाबला’ मधलं चित्र असलेलं दप्तर घेऊन शाळेत जायचो. दप्तरावरचं चित्र जिवंत होऊन समोर येईल असं कधी स्वप्नातही पाहिलं नव्हतं. पण यावेळेस दप्तरावरचं स्वप्न घेऊन जगणाऱ्या मला दप्तराच्या बाहेरचं खूप काही शिकायला मिळालं. कलाकार म्हणून नेहमीच वेगवेगळ्या दिग्दर्शकांच्या मार्गदर्शनाखाली काम करायची संधी मिळत असते. आणि मी ती संधी सहसा सोडत नाही.”

दरम्यान एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत बोलताना सिद्धार्थ जाधव म्हणाला, “बॉलिवूडमधील कोरियोग्राफर प्रभूदेवा याचा मी मोठा फॅन आहे. प्रभूदेवासोबत काम करणं हे माझं स्वप्न होतं. प्रभूदेवा आणि सलमान खान यांच्यासोबत काम करण्याची संधी मला मिळाल्याचा मला खरचं फार आनंद आहे.”

सलमान खानच्या ‘राधे- युअर मोस्ट वॉन्टेड भाई’ या सिनेमात सिद्धार्थ जाधव झळकणार आहे. यापूर्वी देखील अजय देवगण तसंच रणवीर सिंग या मोठ्या कलाकारांसोबत बॉलिवूडच्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. राधे या सिनेमात सिद्धार्थची भूमिका पाहण्यासाठी त्याचे फॅन्स मात्र फार उत्सुक आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp