Akshay Kumar: अखेर अक्षय कुमार झाला भारतीय! स्वातंत्र्यदिनी मिळालं मोठं गिफ्ट

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

akshay kumar got indian citizenship share information in twitter 77th indepedence day
akshay kumar got indian citizenship share information in twitter 77th indepedence day
social share
google news

Akshay kumar got Indian Citizenship : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारला (Akshay kumar)  अखेर भारतीय नागरिकत्व (Indian Citizenship) मिळालं आहे. अक्षय कुमारने ट्विट करुन याबाबतची माहिती दिली आहे. अक्षयने ट्विटरवर एक कागदपत्र शेअर केला आहे.या कागदपत्रासोबत आता हृदय आणि नागरिकत्व दोन्ही हिंदुस्तानी असल्याचे त्याने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. अक्षयला भारताचे नागरिकत्व मिळाल्यानंतर तो खूप खूश आहे. यासोबत अक्षय कुमारच्या या ट्विटरवर आता चाहते त्याला शुभेच्छा देत आहेत. ( akshay kumar got indian citizenship share information in twitter 77th indepedence day)

ADVERTISEMENT

अक्षय कुमारकडे भारतीय नागरिकत्वता नव्हते. यामुळे अक्षयला सोशल मीडियावर ट्रोलिंगला सामोरे जावे लागायचे. अनेक ट्रोलर्स त्याला कॅनडा कुमारचा टॅग देऊन ट्रोल करायचे. अक्षय कुमारला ट्रोल करताना ट्रोलर्स म्हणायचे, तु भारतात काम करतोस, इथे तुझी कमाई होते. पण भारताचे नागरिकत्व तुझ्याजवळ नाही आहे. तुझ्याजवळ दुसऱ्या देशाचे नागरिकत्व आहे,असे म्हणत त्याला ट्रोल केले जायचे. मात्र या ट्रोलर्सना अक्षय कुमार दिल है हिंदुस्तानी असे म्हणत उत्तर द्यायचा. मात्र आता अक्षयच्या हृदयासोबत त्याचे नागरिकत्व देखील हिदुस्तानी झाले आहे.अक्षयने ट्वीट करून याबतची माहिती दिली आहे.

हे ही वाचा : Seema haider : सीमावर चित्रपट बनवणाऱ्या अमित जानीला मनसेने का दिलीये धमकी?

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

सोशल मीडियावरील ट्रोलिंगनंतर अक्षय कुमारने भारताचे नागरिकत्व मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते. आणि आज अखेर भारताच्या स्वातंत्र्याच्या दिवशी अक्षय कुमारला भारताचे नागरिकत्व मिळाले आहे. अक्षय कुमारने ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे.

कॅनडाचे नागरिकत्व कसे मिळाले?

1990-2000 सालचा काळ अक्षय कुमारसाठी खुप वाईट होता. या काळात अक्षय कुमारचे सिनेमे बॅक टू बॅक फ्लॉप ठरत होते.अक्षयचे सलग 11 सिनेमे फ्लॉप ठरले होते. त्यामुळे अक्षयने वैतागून कॅनडात जाऊन काम करायला सुरुवात केली होती.आणि कॅनडाच्या नागरिकत्वासाठी अर्ज केला होता.

ADVERTISEMENT

याबाबत एका मुलाखतीत अक्षय कुमार म्हणाला की, मी विचार केला की, माझे सिनेमे बॉक्स ऑफिसवर चालत नव्हते. त्यामुळे मी कॅनडात जाऊन काम करण्याचा निर्णय घेतला होता. माझ्या एका मित्राने मला कॅनडात बोलावले होते.यावेळी मी कॅनडाच्या नागरिकत्वासाठी अर्ज केला होता. या दरम्यान माझे दोन सिनेमे रिलीज व्हायचे बाकी होते. हे दोन्ही सिनेमे सुपरहिट ठरले. त्यानंतर माझ्या मित्राने पुन्हा भारतात जाण्याचा सल्ला दिला. यानंतर मी पुन्हा भारतात आलो आणि काम करायला सुरूवात केली. मला काही सिनेमे मिळाले. नंतर मी थांबलोच नाही आणि काम करत गेलो असे अक्षय कुमार म्हणाला आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Veer Savarkar : सावरकरांवरील बायोपिकमधून महेश मांजरेकरांची माघार, कारण…

वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, अक्षय कुमारचा नुकताच ओएमजी 2 सिनेमा बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला आहे. या सिनेमाने 4 दिवसात 55 करोड कमाई केली आहे. हा सिनेमा आता आणखीण किती कमाई करतो, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT