Poonam Pandey जिवंत आहे… Video च केला शेअर; म्हणते कशी मी तर…

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Poonam pandey Fake Death News She iS alive her new Video Viral on social media
Poonam pandey Fake Death News She iS alive her new Video Viral on social media
social share
google news

Poonam Pandey Fake death News : आपल्या बोल्डनेससाठी ओळखली जाणारी अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडेच्या (Poonam Pandey) मृत्यूच्या बातमीने लोकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. शुक्रवारी (02 जानेवारी) तिच्या अकाउंटवरून शेअर केलेल्या पोस्टमुळे तिचा गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळे (Cervical Cancer) मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. मात्र आज (03 जानेवारी) पूनम पांडे जिवंत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. (Poonam pandey Fake Death News She iS alive her new Video Viral on social media)

ADVERTISEMENT

पूनमच्या मृत्यूच्या बातमीनंतर प्रश्न उपस्थित होऊ लागले होते. लोक म्हणत होते की, हा नक्कीच पब्लिसिटी स्टंट आहे. तिचा मृतदेह कुठे आहे? तिला कर्करोग झाला हे कोणालाच कसं कळलं नाही? आता लोकांना पडलेले हे प्रश्न आणि त्यांच्या शंका खऱ्या ठरल्या आहेत. कारण पूनम जीवंत आहे.

वाचा : Ganpat Gaikwad: ‘… तर माझा जगून काय फायदा?’, शिंदेंच्या नेत्यावर गोळ्या झाडल्यानंतर भाजप आमदार काय म्हणाला?

पूनमच्या टीमने शेअर केलेल्या पोस्टमध्ये पूनमचा मृत्यू गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळे झाल्याचे स्पष्टपणे लिहिले होते. पण आता पूनमने स्वत: तिच्या मृत्यूच्या बातमीवर स्पष्टीकरण देत एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती म्हणताना दिसत आहे की, ‘मी जिवंत आहे. मी गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाने मरणार नाही. पण खेदाची गोष्ट म्हणजे या आजाराचा सामना कसा करायचा याची माहिती नसल्यामुळे या आजाराने हजारो महिलांचा जीव जात आहे.’

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

 

View this post on Instagram

 

A post shared by Poonam Pandey (@poonampandeyreal)

‘इतर कर्करोगांच्या तुलनेत, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग पूर्णपणे टाळता येण्याजोगा आहे. लवकर या कर्करोगाचं निदान होणं आणि त्यावर HPV लस घेणं हा त्यावरचा उपाय आहे. या आजारामुळे कोणालाही आपला जीव गमवावा लागणार नाही, याची खात्री आपण केली पाहिजे.’

ADVERTISEMENT

वाचा : BJP MLA Ganpat Gaikwad: शिंदेंच्या नेत्यावर झाडल्या 4 गोळ्या, पोलीस ठाण्यात घडलं काय?

पूनम पुढे म्हणाली की, ‘या जागरूकतेने एकमेकांना सशक्त बनवूया आणि प्रत्येक स्त्रीला कोणती पावले उचलायची याची जाणीव आहे याची खात्री करूया. यावर कोणते उपाय केले जाऊ शकतात याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी बायोमधील लिंक क्लिक करा. चला या रोगाचा विनाशकारी प्रभाव संपवण्याचा प्रयत्न करूया आणि #DeathToCervicalCancer चा अवलंब करुया.’

ADVERTISEMENT

पूनमच्या ‘त्या’ पोस्टनंतर सोशल मीडियावर उडाली होती खळबळ

पूनम पांडेच्या अकाउंटवरून 2 फेब्रुवारी रोजी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये लिहिलं होतं, ‘आजची सकाळ आपल्या सर्वांसाठी खूपच धक्कादायक आहे. कर्करोगाशी झुंझ देणारी आपली लाडकी पूनम आपल्याला सोडून गेली. तिला गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग (Cervical Cancer)होता.’ असं तिच्या अकाउंटवरील पोस्टमध्ये लिहिलं होतं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Poonam Pandey (@poonampandeyreal)

वाचा : Lal Krishna Advani यांना भारतरत्न जाहीर, PM मोदींनी स्वत: केली घोषणा

पूनम पांडेच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर एकीकडे चाहत्यांना मोठा धक्का बसला तर काहींनी हा पब्लिसिटी स्टंट आहे, अशी शक्यता वर्तवली होती. तसंच जागतिक कर्करोग दिनानिमित्त (World Cancer Day) तिने ही पोस्ट केली असेल, असाही अंदाज बांधला जात होता. आता अभिनेत्रीने व्हिडीओ शेअर करत या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. ती जीवंत असल्याचं तिने सांगितलं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT