Abhishek-Aishwarya Divorce Rumours : ऐश्वर्या राय अभिषेक बच्चनचा घटस्फोट होणार?

मुंबई तक

Abhishek-Aishwarya Divorce Rumours : गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या रायचं अभिषेकसह बच्चन कुटुंबात अंतर निर्माण झाल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, याचे अनेक पुरावेही वारंवार समोर येत आहेत, जे त्यांच्या नात्यात सर्व काही आलबेल नसल्याची साक्ष देतात.

ADVERTISEMENT

अनंत अंबानीच्या लग्नात दोघेही वेगवेगळे स्पॉट झाले होते.
aishwarya rai abhishek bachchan divorce rumour abhishek likes divorce post on insta bollywood story
social share
google news

Abhishek Bachchan Aishwarya Rai Divorce Rumours : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Bachchan)आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना सध्या उधाण आले आहे. अभिषेक बच्चन याने घटफोटासंबंधी एक पोस्ट लाईक केली होती. त्यानंतर  अनंत अंबानीच्या लग्नात दोघेही वेगवेगळे स्पॉट झाले होते. त्यामुळे दोघांच्या घटस्फोटांच्या चर्चांना आणखीण बळ मिळालं होतं. दरम्यान अभिषेक बच्चनने नेमकी कोणती पोस्ट लाईक केली होती? आणि घटस्फोटासंदर्भात काय चर्चा सुरु आहे? हे जाणून घेऊयात. (aishwarya rai abhishek bachchan divorce rumour abhishek likes divorce post on insta bollywood story) 

गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या रायचं अभिषेकसह बच्चन कुटुंबात अंतर निर्माण झाल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, याचे अनेक पुरावेही वारंवार समोर येत आहेत, जे त्यांच्या नात्यात सर्व काही आलबेल नसल्याची साक्ष देतात. मागील काही दिवसांतील घडामोडी पाहिल्या असता ऐश्वर्या राय आणि बच्चन कुटुंबीयांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याचं स्पष्ट होत आहे. 

खरं तर अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या रायच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु असताना अभिषेक बच्चनने सोशल मीडियावर एक पोस्ट लाईक केली होती. ही पोस्ट घटस्फोटा संदर्भातली होती. हे पाहून चाहत्यांना धक्का बसला होता. अभिषेक बच्चनने लाईक केलेल्या पोस्टमध्ये तुटलेल्या हृदयाचा फोटो होता, ज्यामध्ये पती-पत्नी वेगळे होताना दिसत आहेत. 

हे ही वाचा : Ajit Pawar: ''विधानसभा महायुतीत लढू, पण...'', अजित पवारांचा कार्यकर्त्यांना ‘मेसेज’

'त्या' पोस्टमध्ये काय? 

'घटस्फोट कुणासाठीही सोपा नसतो. आनंदाने जगण्याचे स्वप्न कोण पाहत नाही किंवा रस्ता ओलांडताना एका वृद्ध जोडप्याचा हात धरून तो हृदयस्पर्शी व्हिडिओ पुन्हा बनवायचा आहे? तरीही कधी कधी आयुष्य आपल्या अपेक्षेप्रमाणे नसते,पण अनेक दशके एकत्र घालवल्यानंतर जेव्हा लोक वेगळे होतात, तेव्हा त्यांच्या आयुष्याचा मोठा भाग लहान-मोठ्या दोन्ही गोष्टींसाठी एकमेकांवर अवलंबून असताना ते कसे सहन करतात? त्यांना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागेल?

अभिषेक बच्चनने ही पोस्ट लाईक केली. ज्यानंतर लोक आता याला त्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी जोडून पाहत आहेत. त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

दरम्यान 12 जुलै रोजी मुंबईतील जिओ कन्व्हेन्शन सेंटरमध्ये झालेल्या अनंत अंबानींच्या लग्नात दोघेही वेगवेगळे पोहोचले होते. तेव्हा या बातम्यांना आणखी बळ मिळाली होती. 

हे ही वाचा : Amit Shah : ''बाळासाहेबांचा वारसा सांगणारे ठाकरे औरंगजेबाचे...'', पुण्यातून शाहा कडाडले!

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाह सोहळ्यात ऐश्वर्याने तिची मुलगी आराध्या बच्चनसोबत स्टायलिश एन्ट्री केली. पण अभिषेक बच्चन त्याची बहीण श्वेता बच्चन, आई जया बच्चन आणि वडील अमिताभ बच्चन यांच्यासोबत पोहोचला होता. अभिषेक किंवा बच्चन कुटुंबातील कोणत्याही सदस्याने मीडियाला पोज दिली नाही किंवा ऐश्वर्यासोबत फोटोही काढले नाहीत.

20 एप्रिल 2007 रोजी अभिषेक आणि ऐश्वर्या विवाहबंधनात अडकले होते. 2011 मध्ये या जोडप्याने त्यांच्या पहिल्या मुलाचे स्वागत केले. आता बातम्या येत आहेत की ऐश्वर्या तिची मुलगी आराध्यासोबत तिच्या आईच्या घरी राहते. ऐश्वर्या आणि बच्चन कुटुंबातील मतभेदाच्या बातम्या तेव्हा सुरू झाल्या, जेव्हा अमिताभ बच्चन यांनी त्यांचा एक बंगला त्यांची मुलगी श्वेता बच्चनच्या नावे केला होता. मात्र, बच्चन कुटुंब किंवा ऐश्वर्या राय या दोघांनीही यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. 

हे वाचलं का?

    follow whatsapp