"माझ्या भावाला सोडा, काही करू नका...", धनंजय देशमुखांनी कुणाला फोन केले? जबाबात समोर आलं
Santosh Deshmukh Case: आरोपी विष्णू चाटेनेच संतोष देशमुख यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. खंडणीच्या आड येऊ नकोस असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली होती असं धनंजय देशमुख यांनी जबाबात म्हटलंय.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

संतोष देशमुख यांना सोडवण्यासाठी धनंजय देशमुखांनी कुणाला फोन केले?

9 डिसेंबरला धनंजय देशमुखांनी काय केलं? पोलीस जबाबात समोर

धनंजय देशमुख यांनी पोलिसांना दिलेला जबाब समोर
9 डिसेंबर 2024 ला संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. त्यांच्या हत्येला आता 4 महिने पूर्ण झालेत. गेल्या चार महिन्यात या प्रकरणात अनेक धक्कादाय गोष्टी समोर आल्या. संपूर्ण बीड जिल्ह्यात घडलेल्या अनेक हादरवून सोडणाऱ्या घटनाही यादरम्यान समोर आल्या. मात्र, आता पहिल्यांदाच या प्रकरणाचा पाठपुरावा करणारे संतोष देशमुखांच्या भावाचा जबाब समोर आलाय. माध्यमांसमोर येऊन आपल्या कुटुंबाची बाजू मांडणाऱ्या धनंजय देशमुख यांनी अनेक धक्कादायक गोष्टी पोलीस जबाबात सांगितल्या आहेत. हा संपूर्ण जबाब या प्रकरणात महत्वाचा ठरणार आहे.
हे ही वाचा >> जावयासोबत वाद, सासऱ्यानं झोपेत असतानाच डोक्यात कुऱ्हाड घातली, वादाचं कारण ऐकून...
विष्णू चाटेला फोन...
संतोष देशमुख यांचं अपहरण करुन घेऊन गेल्याची माहिती मिळताच धनंजय देशमुख यांनी विष्णू चाटेला फोन सुरू केले. भावाला सोडा, काही करू नका असं म्हणत त्यांनी विष्णू चाटेला अनेक फोन केले. दहा मिनिटात सोडतो, वीस मिनिटात सोडतो, अर्ध्या तासात सोडतो म्हणत विष्णू चाटे धनंजय देशमुखांना बोलत राहिला. संतोष देशमुख यांची हत्या करण्या अगोदर, अनेक वेळा विष्णू चाटेला धनंजय देशमुख यांनी फोनवरून विनंती केली होती.
वाल्मिक कराडलाही केला होता फोन...
आरोपी विष्णू चाटेनेच संतोष देशमुख यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. खंडणीच्या आड येऊ नकोस असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली होती असं धनंजय देशमुख यांनी जबाबात म्हटलंय. संतोष देशमुख यांची सुटका करण्यासाठी धनंजय देशमुख यांनी आरोपी वाल्मिक कराडलाही फोन केला होता असं जबाबात म्हटल्याचं समोर आलंय.
हे ही वाचा >> लातूर हादरलं! डोंगराच्या पायथ्याशी ड्रग्ज फॅक्ट्रीवर DRI चा छापा, आरोपींमध्ये पोलीस?
दरम्यान, संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला 4 महिने उलटल्यानंतरही या प्रकरणातला आरोपी कृष्णा आंधळे हा फरार आहे. या आरोपीचा शोध कधी लागणार असा सवाल देशमुख कुटुंबीय वारंवार उपस्थित करत आहेत. तर दुसरीकडे याप्रकरणातल्या आरोपींचा तुरूंगातही धुडगूस सुरू असल्याची गोष्टी बाहेर येत आहेत. त्यामुळे संतोष देशमुख यांना न्याय मिळणार का? यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.