Alka Yagnik यांना व्हायरल अटॅकमुळे बहिरेपणा, सेंसरी नर्व हियरिंग लॉस आजार काय?
Alka Yagnik viral attack: सुप्रसिद्ध गायिका अलका याज्ञिक हिने व्हायरल अटॅकमुळे तिची श्रवणशक्ती गमावली आहे. जाणून घ्या सेंसरी नर्व हियरिंग लॉस आजार नेमका काय आहे?
ADVERTISEMENT
Alka Yagnik singer lost her hearing: मुंबई: बॉलिवूडमधील अनेक लोकप्रिय आणि आयकॉनिक गाण्यांना आवाज देणारी सुप्रसिद्ध गायिका अलका याज्ञिक यांना न्यूरोच्या दुर्मिळ समस्येने ग्रासले आहे. ही माहिती सोशल मीडियावर शेअर करताना अलका म्हणाली की, आता तिला अजिबात ऐकू येत नाही... तिने शेअर केलेल्या या बातमीमुळे तिच्या चाहत्यांना प्रचंड धक्का बसला आहे. (alka yagnik lost hearing due to viral attack what is sensory nerve hearing loss disease)
ADVERTISEMENT
अलकाने सांगितले की, व्हायरल अटॅकनंतर तिला हा त्रास झाला आणि एके दिवशी फ्लाइटमधून बाहेर पडताना तिला कळले की तिला ऐकू येत नाही. आपल्या समस्येबद्दल माहिती देताना अलकाने तिच्या चाहत्यांना आणि सहकलाकारांना सल्ला दिलाय की, त्यांनी मोठ्या आवाजातील संगीतापासून दूर राहावं..
हे ही वाचा>> रिव्हर्स गिअर, दरीत कार... Reel च्या नादात तरूणी जागीच ठार! Viral Video
नेमकं काय घडलं? अलकाने स्वत: केलं शेअर
इंस्टाग्रामवर या समस्येचे वर्णन करताना अलकाने लिहिले, 'माझे सर्व चाहते, मित्र, फॉलोअर्स आणि हितचिंतक. काही आठवड्यांपूर्वी, जेव्हा मी फ्लाइटमधून बाहेर पडत होतो, तेव्हा मला अचानक जाणवले की मला काहीही ऐकू येत नाही. या घटनेनंतर काही आठवड्यांत थोडी हिंमत आल्यानंतर आता मी माझ्या मित्र आणि हितचिंतकांच्या फायद्यासाठी या विषयावर मौन सोडायचे ठरवले आहे.'
हे वाचलं का?
अलका पुढे म्हणाली, 'माझ्या डॉक्टरांनी या प्रकाराला दुर्मिळ सेंसरी नर्व हियरिंग लॉस असे निदान केले आहे. जे व्हायरल अटॅकमुळे झाले आहे. या अचानक झालेल्या प्रकारामुळे मला मोठा धक्का बसला आहे. मी आता ही गोष्ट स्वीकारण्याचा प्रयत्न करत आहे, कृपया मला लक्षात ठेवा.'
हे ही वाचा>> EVM News : ईव्हीएम खरंच हॅक केलं जाऊ शकतं का? तज्ज्ञांचं उत्तर काय?
अलका याज्ञिकने दिला 'हा' सल्ला
चाहत्यांना आणि तिच्या सहकारी गायकांना सल्ला देत अलकाने लिहिले की, 'माझे चाहते आणि तरुण सहकाऱ्यांना मी हेडफोन्स आणि मोठ्या आवाजातील संगीताबद्दल एक इशारा द्यायचा आहे. एखाद्या दिवशी मी माझ्या व्यावसायिक जीवनात आरोग्याला होणाऱ्या हानीबद्दल नक्कीच बोलेन. तुमच्या सर्व प्रेमाने आणि पाठिंब्याने, मी माझे आयुष्य पुन्हा रुळावर आणण्याची आशा करते आणि लवकरच तुम्हाला पुन्हा भेटण्याची अपेक्षा करते. या कठीण काळात तुमचा पाठिंबा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.'
ADVERTISEMENT
अलका केवळ बॉलिवूडच नाही तर देशातील सर्वात लोकप्रिय गायकांपैकी एक आहे. 25 हून अधिक भाषांमध्ये 21 हजारांहून अधिक गाणी रेकॉर्ड केलेल्या अलका याज्ञिक यांना दोनदा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. 2022 मध्ये, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने त्यांना जगभरातील सर्वाधिक स्ट्रिम केले जाणारे कलाकार म्हणून ओळखले जाते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT