Lakshya: प्रिती झिंटा-हृतिक रोशनची लव्ह केमिस्ट्री पुन्हा पडद्यावर, 20 वर्षानंतर 'लक्ष्य' चित्रपटगृहात

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

लक्ष्य पुन्हा थिएटरमध्ये होणार प्रदर्शित 

point

लक्ष्यची गाणी आजही चाहत्यांच्या आवडीची 

Hritik Roshan Lakshya Movie : कारगिल युद्धावर आधारित बॉलिवूडचा प्रसिद्ध चित्रपट 'लक्ष्य'ला (Lakshya) 20 वर्षे पूर्ण झाली आहेत. या खास प्रसंगी अमिताभ बच्चन, हृतिक रोशन आणि प्रीती झिंटा यांनी सांगितले की, या चित्रपटाचे यश साजरे करण्यासाठी ते पुन्हा मोठ्या पडद्यावर येण्यास तयार आहेत. हा चित्रपट येत्या शुक्रवारी 21 जून रोजी पुन्हा चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. (hrithik roshan preeti zinta love chemistry is back again lakshya movie screen after 20 years

ADVERTISEMENT

2004 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'लक्ष्य' या चित्रपटात हृतिक रोशनने साकारलेली करण शेरगिल ही व्यक्तिरेखा चाहत्यांच्या आजही पसंतीस उतरते. फरहान अख्तर दिग्दर्शित या चित्रपटाची कहाणी तुम्हाला आवडली असेल तर आता हा चित्रपट पुन्हा एकदा चित्रपटगृहात पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा : Member of Parliament Salary: खासदारांना असतो गलेलठ्ठ पगार, पेन्शन किती मिळते?

लक्ष्य पुन्हा थिएटरमध्ये होणार प्रदर्शित 

लक्ष्य चित्रपटाने 20 वर्षे पूर्ण केली आहेत. त्यामुळे निर्माते हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित करणार आहेत. चित्रपटात हृतिकशिवाय प्रीती झिंटा, अमिताभ बच्चन आणि अमरीश पुरी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. अनेक चाहत्यांचा असा विश्वास आहे की कर्णधार करण शेरगिलच्या भूमिकेत हृतिक रोशनने आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली आहे. 

हे वाचलं का?

हेही वाचा : MLC Election 2024 : आमदार फुटण्याचा धोका! महायुती-मविआ किती जागा जिंकणार?

 

यानिमित्ताने हृतिकने आता ट्वीटरवर चित्रपटातील काही अविस्मरणीय क्षण शेअर केले आहेत. तसंच, अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री प्रीती झिंटानेही खास पोस्ट शेअर केली आहे. 'लक्ष्य' हा फरहान अख्तर दिग्दर्शित आणि रितेश सिधवानी निर्मित बॉलीवूड वॉर ड्रामा चित्रपट आहे. 

हेही वाचा : मराठा आरक्षणासाठी तरूणाची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये पंकजा मुंडे, भुजबळ, शेंडगे, तायवाडेंची नावे

 

लक्ष्यची गाणी आजही चाहत्यांच्या आवडीची 

लक्ष्यमधील गाण्याची तुलना 'दिल चाहता है'शी करण्यात आली, ज्याने चाहत्यांना अनेक हिट चार्टबस्टर गाणी दिली. उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांनी गायलेले 'मैं ऐसा क्यों हूं' आणि 'अगर मैं कहूं' आजही चाहत्यांच्या म्यूझिक प्ले लिस्टमध्ये आहेत. प्रीती आणि हृतिकची ही केमिस्ट्री आजही चाहत्यांच्या पसंतीस उतरते. दोघे एकत्र खूप छान दिसत होते. फरहान आणि रितेश सिधवानी यांच्या एक्सेल एंटरटेनमेंट निर्मित, "लक्ष्य" मध्ये अमिताभ बच्चन आणि आमरिश पुरी यांच्याही भूमिका आहेत. 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT