Ranbir Kapoor च्या ‘रामायण’मध्ये शूर्पणखेच्या भूमिकेत दिसणार सेक्रेड गेमची ‘ही’ अभिनेत्री?
दिग्दर्शक नितेश तिवारी यांचा ‘रामायण’ (Ramayana Movie) हा चित्रपट सतत चर्चेत आहे. या चित्रपटाच्या कास्टिंगबाबत एकामागून एक अपडेट्स येत आहेत. बॉबी देओल, सनी देओल आणि लारा दत्ता यांच्यानंतर आता अभिनेत्री कुब्रा सैतचे नाव या प्रोजेक्टशी जोडले गेले आहे.
ADVERTISEMENT
Ramayana movie : दिग्दर्शक नितेश तिवारी यांचा ‘रामायण’ (Ramayana Movie) हा चित्रपट सतत चर्चेत आहे. या चित्रपटाच्या कास्टिंगबाबत एकामागून एक अपडेट्स येत आहेत. बॉबी देओल, सनी देओल आणि लारा दत्ता यांच्यानंतर आता अभिनेत्री कुब्रा सैतचे नाव या प्रोजेक्टशी जोडले गेले आहे. माहितीनुसार, ‘सेक्रेड गेम्स’मध्ये कुकूची भूमिका साकारणारी अभिनेत्री कुब्रा सैत हिने या चित्रपटातील महत्त्वाच्या भूमिकेसाठी ऑडिशन दिले आहे. (Is it true that actress kubrra sait auditioned to play surpnakha roel in nitesh tiwari ramayana movie)
ADVERTISEMENT
कुब्रा कोणत्या भूमिकेत दिसणार?
मिळालेल्या माहितीनुसार, कुब्ब्रा सैतने ‘रामायण’मधील रावणाची बहीण शूर्पणखाच्या भूमिकेसाठी ऑडिशन दिले आहे. अभिनेत्रीला ही भूमिका मिळण्याची आशा असल्याचे सांगण्यात येत आहे. या चित्रपटात ‘केजीएफ’ स्टार यश तिचा भाऊ रावणाची भूमिका साकारणार आहे असं म्हटलं जात आहे.
वाचा : पाच जणांसोबत डेटिंग? बॉलिवूडच्या Orry ने कहरच केला; कॉफी विथ करणमध्ये इंटरेस्टिंग खुलासे
कुब्ब्रा सैत ही बॉलिवूड आणि ओटीटी प्लॅटफॉर्मची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ‘सेक्रेड गेम्स’ व्यतिरिक्त तिने ‘जवानी जानेमन’ चित्रपटासह इतर प्रोजेक्टमध्ये काम केले आहे. काजोलची सिरीज ‘ट्रायल’ आणि शाहिद कपूरची ‘फर्जी’ यामध्ये ती उत्तम काम करताना दिसली. याशिवाय अॅपल टीव्हीच्या ‘फाउंडेशन’ या शोमध्येही ती वेगळ्या अवतारात दिसली आहे.
हे वाचलं का?
नुकत्याच आलेल्या बातमीनुसार, बॉबी देओलला नितेश तिवारीच्या ‘रामायण’मध्ये कुंभकर्णाची भूमिका ऑफर करण्यात आली आहे. मात्र, मुलाखतीत त्याने ही बातमी साफ फेटाळून लावली. सध्या बॉबी सुपरस्टार सूर्यासोबत त्याच्या ‘कुंगवा’ चित्रपटात काम करत असल्याची बातमी आहे. याशिवाय त्याच्याकडे आर्यन खानची ‘स्टारडम’ ही वेबसीरिजही आहे.
वाचा : ‘मुंबईत काही रेडे मोकाट सुटलेत…’, राऊतांवर टीका करताना देवेंद्र फडणवीसांची जीभ घसरली!
बॉबीचा मोठा भाऊ सनी देओलला ‘रामायण’मध्ये भगवान हनुमानाची भूमिका साकारण्याची ऑफर आल्याचे बोलले जात आहे. रणबीर कपूरलाही सनीने ही भूमिका करावी असे वाटते. तर लारा दत्ता राजा दशरथची तिसरी पत्नी कैकेयीच्या भूमिकेत दिसणार आहे. मार्च 2024 मध्ये सुरू होणाऱ्या चित्रपटाच्या पहिल्या शेड्यूलमध्ये लारा रणबीर कपूरसोबत शूट करणार आहे. नितेश त्याचे ‘रामायण’ तीन भागात बनवणार आहे. यामध्ये साऊथ अभिनेत्री पल्लवी आई सीतेची भूमिका साकारत आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT