D Gukesh: करोडपती बनला 18 वर्षीय डी. गुकेश, विश्वविजेता होताच किती मिळाली रक्कम?
Gukesh Dommaraju: भारताचा डी गुकेश हा बुद्धिबळाचा नवा विश्वविजेता बनला आहे. विश्वविजेते पद पटकवल्यानंतर त्याला बक्षिसाची रक्कम ही कोट्यवधी रुपयांमध्ये मिळाली आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
भारताचा डी गुकेश हा बुद्धिबळाचा नवा विश्वविजेता
विश्वविजेते पद पटकवल्यानंतर डी गुकेश मिळालं कोट्यवधी रुपयांचं बक्षीस
डी गुकेश ठरला सर्वात तरूण विश्वविजेता
सिंगापूर: भारताचा डी गुकेश हा बुद्धिबळाचा नवा आणि सर्वात तरुण विश्वविजेता ठरला आहे. जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन 2024 च्या अंतिम फेरीत त्याने चीनच्या बुद्धिबळ मास्टर डिंग लिरेनचा पराभव केला.
ADVERTISEMENT
सिंगापूरमध्ये गुरुवारी झालेल्या या सामन्यात गुकेशने काळ्या मोहऱ्यांसह खेळताना लिरेनच्या 6.5 गुणांविरुद्ध आवश्यक 7.5 गुण मिळवले आणि विजेतेपद पटकावले.
हे ही वाचा>> Vinod Kambli : विनोद कांबळीची अवस्था पाहून अनेकांनी हळहळ व्यक्त केली, पण कपिल देव म्हणाले..
किती पैसे मिळणार डी गुकेशला?
18 वर्षीय गुकेश हा बुद्धिबळातील सर्वात तरुण विश्वविजेता ठरला आहे. अशी कामगिरी करणारा तो विश्वनाथन आनंदनंतरचा दुसरा भारतीय बुद्धिबळपटू ठरला आहे.
हे वाचलं का?
या विजयासह गुकेश हा करोडपती झाला आहे. वास्तविक, विजेतेपदासह, त्याला बक्षीस म्हणून 1.35 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 11.46 कोटी रुपये) मिळाले आहेत.
हे ही वाचा>> Sachin Tendulkar meets Vinod Kambli : स्टेजवर विनोद कांबळीला पाहताच भेटायला गेला 'सचिन'; राज ठाकरेंनी...
बुद्धिबळ चॅम्पियनशिपची बक्षीस रक्कम 2.5 दशलक्ष डॉलर्स म्हणजे अंदाजे 21 कोटी रुपये आहे. मात्र, विजेत्याला ही संपूर्ण रक्कम मिळत नाही.
ADVERTISEMENT
अंतिम सामना खेळणाऱ्या खेळाडूला प्रत्येक सामना जिंकण्यासाठी 20 हजार डॉलर (सुमारे 1.69 कोटी रुपये) मिळतात. तर उर्वरित रक्कम दोन्ही खेळाडूंमध्ये समान प्रमाणात विभागली जाते.
ADVERTISEMENT
चॅम्पियन होण्यापूर्वी गुकेशची एकूण संपत्ती 8.26 कोटी रुपये होती. ज्याने आता 20 कोटींचा आकडा पार केला आहे. फायनल जिंकल्यानंतर गुकेश खूपच भावूक दिसत होता.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT